बीड : लग्नाच्या मुद्यावरुन श्याहण्णव कुळी मराठा, क्षत्रिय आणि गावच्या सरपंचपदाची निवडणूक आली की आम्ही ओबीसी आणि मागासवर्गीय असं कसं चालेल ? या शब्दात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांना सुनावले. बीड जिल्ह्यातील गेवराईतील शृंगारवाडी येथे ओबीसी महाएल्गार मेळाव्यात ते बोलत होते. लक्ष्मण हाके यांनी मेळाव्यात बोलताना जरांगेंना उद्देशून ओबीसी समाजातील तरुणांच्या लग्नाचा जाहीर प्रस्ताव मांडला.
आता तुम्ही मागास झाला आहात आता कुणबी प्रमाणपत्राद्वारे तुम्ही ओबीसीमध्ये आला आहात तर आम्ही आमच्यातील ११ पोरं सुचवतो त्यांचा विवाह आपल्यामध्ये ठरवू. आता जात पात राहिली का ? आता तुम्ही श्याहण्णव कुळी मराठा, क्षत्रिय राहिलात का ? त्यामुळे सुरुवात म्हणून ११ विवाह जाहीर करू, या शब्दात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यासमोर लग्नाचा जाहीर प्रस्ताव मांडला.
लग्न ठरवायची वेळ आली की आम्ही श्याहण्णव कुळी मराठा, क्षत्रिय आणि गावच्या सरपंचपदाची निवडणूक आली की आम्ही ओबीसी आणि मागासवर्गीय असं कसं चालेल ? हा मुद्दा आधी एन.डी पाटील यांनी पण मांडला असल्याचे ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले.