मोहित सोमण:अर्बन कंपनीच्या आयपीओने (Urban Company IPO) अखेर शानदार कामगिरी केली आहे. तिसऱ्या म्हणजेच शेवटच्या दिवशीही आयपीओला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे एकूण आयपीओला १०८.७२ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. एकूण सबस्क्रिप्शनपैकी ४०.२६ वेळा सबस्क्रिप्शन किरकोळ गुंतवणूकदार श्रेणीत मिळाले आहे. तर पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (QIB) १४७.३५ वेळा व विना संस्थात्मक गुंतवणूकदार श्रेणीतून (Non Institutional Investors NII) कडून ७७.७० वे ळा कंपनीच्या आयपीओला सबस्क्रिप्शन मिळाले.त्यामुळे आतापर्यंत कंपनीच्या आयपीओला १०१५६५५३४ उपलब्ध शेअरला ८२९००४८५ शेअरसाठी बोली (Bidding) लावता आली आहे. अखेरच्या दिवशी कंपनीला पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून १४७.३ ५ वेळा विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ७७.७० वेळा, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ८६.७५ वेळा सबस्क्रिप्शन मिळाले आहे. आज दुपारी तीन वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्सची जीएमपी (Grey Market Price) ५० रूपये प्रिमियम दराने सुरु होती. ५ ० रूपयांच्या हिशोबाने विचार केल्यास कंपनीचा शेअर १५३ रूपयांपर्यंत बाजारात सूचीबद्ध (Listed) होऊ शकतो. म्हणजेच प्रति शेअर ४८.५४% नफा गुंतवणूकदारांना लिस्टिंगच्या पहिल्या दिवशी मिळू शकतो. आयपीओपूर्वी कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडू न ८२९००४८५ शेअर १०३ रूपयांच्या दराने विकले गेले होते. पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून मिळालेल्या सबस्क्रिप्शनचा ६०% भाग अँकर गुंतवणूकदारांचा आहे.
१९००० कोटींच्या या आयपीओला हा मोठा प्रतिसाद मानला जात आहे. १० ते १२ सप्टेंबर कालावधीत हा आयपीओ बाजारात दाखल झाला होता. ४७२ कोटींच्या फ्रेश इशूसह १४२८ कोटींचे शेअर कंपनीने ऑफर फॉर सेल (OFS) माध्यमातून विक्रीसाठी ठेवले हो ते. कंपनीकडून ९८ ते १०३ रूपये प्रति शेअर इतका प्राईज बँड निश्चित करण्यात आला होता. १७ सप्टेंबरला कंपनी बीएसई व एनएसईवर सूचीबद्ध (Listed) होणार आहे.
मंगळवारी अर्बन कंपनीने प्री-आयपीओ अँकर प्लेसमेंटमध्ये एसबीआय लाईफ इन्शुरन्स आणि आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्ससह इतर प्रमुख गुंतवणूकदारांकडून (Anchor Investors) ८५४ कोटी जमा केले. विद्यमान शेअरहोल्डर्स आणि सु रुवातीच्या समर्थकांमध्ये, ज्यामध्ये एक्सेल इंडिया आणि एलिव्हेशन कॅपिटल यांचा समावेश आहे त्यांनी आयपीओमध्ये १४२८ कोटींचे शेअर्स विकले आहेत. स्पा ते प्लंबिंग दुरुस्तीपर्यंत सेवा देणारी अर्बन कंपनी हाऊसजॉय आणि सुलेखा सारख्या कंपन्यांची स्पर्धे क आहे. गेल्या आर्थिक वर्षात कंपनी नफ्यात आली होती आणि तिचा महसूल ११४४ कोटी झाला, जो इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ३८% वाढला. कंपनी आयपीओमधून मिळणाऱ्या निधीचा वापर नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी, क्लाउड स्पेसमध्ये गुंतव णूक करण्यासाठी, मार्केटिंगसाठी आणि सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरण्याची योजना आखत आहे.