सलग पाचव्यांदा शेअर बाजारात वाढ सेन्सेक्स निफ्टीत 'इतक्याने उसळला गुंतवणूकदार मालामाल !

मोहित सोमण:शेअर बाजारात आज तुल्यबळ वाढ झाली. अखेरच्या सत्रात बेंचमार्क निर्देशांकात वाढ झाली आहे. सेन्सेक्स ३५५.९७ अंकांनी वाढत ८१९०४.७० पातळीवर व निफ्टी १०८.५० अंकाने वाढत २५११४ पातळीवर स्थिरावला. ब्लू चिप्स कंपनीच्या स्क्रि पसह इतर मिड स्मॉल कॅप शेअर्समध्ये रॅली कायम राहिल्याने आज बाजारात वाढ झाली. प्रामुख्याने रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, बजाज फायनान्स, मारूती सुझुकी, इन्फोसिस,जेबीएम ऑटो, टाटा मोटर्स, टाटा स्टील, टीसीएस अशा समभागात वाढ झाल्याने बा जारात वाढ झाली असली तरी एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, इटर्नल, एसबीआय, एचयुएल अशा समभागात घसरण झाल्याने रॅली मर्यादित स्वरूपात रोखली गेली. सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.०९%,०२७% वाढ झाली असून निफ्टी मिडकॅ प व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.३२%,०.६४% वाढ झाल्याने केवळ बाजाराला सपोर्ट लेवल नाही तर निफ्टीला २५११० पातळीवर जाणे शक्य झाले.दुसरीकडे आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ मेटल (०.९३%), फायनांशियल सर्विसेस २५/५० (०.८२%),मेटल (० .९३%), फायनांशियल सर्विसेस एक्स बँक (१.२८%) निर्देशांकात झाली आहे तर घसरण केवळ पीएसयु बँक (०.२७%), मिडिया (०.३९%), एफएमसीजी (०.७१%). समभागात झाली. आज दिवसभरात सर्वाधिक वाढ जेबीएम ऑटो (१३.९२%),हिंदुस्थान कॉपर (१ २.६६%), जीएमडीसी (१०.७९%), गार्डन रीच (१०.७९%), बीईएमएल लिमिटेड (९.११%), भारत डायनामिक्स (५.७३%), कोचिन शिपयार्ड (५.७२%), डेटा पँटर्न (५.०२%), नुवामा वेल्थ (४.४४%), मदर्सन (३.९९%), बजाज फायनान्स (३.४०%), वेदांता (३.०२ %) समभागात झाली आहे.आज दिवसभरात सर्वाधिक घसरण नेटवेब टेक्नॉलॉजी (३.२३%), रत्न इंडिया (३.१६%), मेट्रोपॉलिस हेल्थ (२.९१%), ज्यूब्लिंएंट फूड (२.५३%), इटर्नल (२.०४%), हिंदुस्थान युनिलिव्हर (१.५८%) समभागात झाली आहे.


आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,'फेडच्या संभाव्य दर कपातीबद्दल जागतिक आशावादामुळे राष्ट्रीय बाजार तीन आठवड्यांच्या उच्चांकावर बंद झाला.रशियाचे तेल खरेदी करण्यासाठी भारतावर अमेरिकेचे शुल्क प्रस्ताव युरोपियन युनियन नाकारू शकते या वृत्तामुळे भावना आणखी सुधारल्या. अमेरिका- भारत व्यापार चर्चेतील प्रगतीमुळे नजीकच्या काळात सकारात्मक गती कायम राहण्याची अपेक्षा आ हे. संरक्षण क्षेत्राने चांगली कामगिरी केली, भारतीय खरेदी अधिकाऱ्यांनी पुढील पिढीतील सहा पारंपारिक पाणबुड्यांसाठी वाटाघाटी सुरू केल्यामुळे.'


सत्रादरम्यान आज सोन्यात उच्चांकी वाढ झाली होती दरम्यान सोन्याच्या हालचालींवर विश्लेषण करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,' सोन्याचा भाव ०.३५% वाढून १०९३५० रुपयांवर स्थिर राहिला. कॉमेक्सने ३६४७ डॉलर्सवर व्यवहार केला. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला पाठिंबा देण्यासाठी पुढील आठवड्यात फेडकडून दर कपात होण्याची अपेक्षा असल्याने सोन्याचा भाव जास्त खरेदीच्या क्षेत्रात असूनही, टॅरिफ अनिश्चितता आणि डॉलरीकरणाच्या विघटनाच्या (Devaluation) थीममुळे सोन्याला प्रीमियम मिळत आहे. या आठवड्यात अमेरिकन सीपीआय आणि बेरोजगारी दाव्यांवर लक्ष केंद्रित असल्याने, बाजार ०.५०% कपातीकडे झुकत आहेत आणि त्याचबरोबर नकारात्मक भूमिकाही घेत आहेत. सो न्याचा कल १०७००० ते ११२००० रुपयांच्या श्रेणीत सकारात्मक राहिला आहे.'


आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसचे हेड ऑफ रिसर्च वेल्थ मॅनेजमेंट सिद्धार्थ खेमका म्हणाले आहेत की,'पुढील आठवड्यात अमेरिकन फेडरलकडून दर कपातीची आशा असल्याने जागतिक पातळीवर तेजी दिसून आली आणि निफ्टीने सलग आठव्या सत्रात १०२ अंकांची वाढ नोंदवत २५,१०८ (+०.४%) वर बंद झाला. निफ्टी मिडकॅप१०० आणि स्मॉलकॅप १०० अनुक्रमे ०.३% आणि ०.६% ने वाढले. क्षेत्रीयदृष्ट्या, वित्तीय सेवा आणि धातू नि र्देशांक प्रत्येकी १% ने वाढले, तर आयटी निर्देशांकाने इन्फोसिसच्या नेतृत्वाखाली माफक वाढ नोंदवली, ज्याने १८,००० कोटी रुपयांच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या बायबॅकला मान्यता दिल्यानंतर तेजी दर्शविली. संरक्षण समभागांनी तेजी दर्शविली, नवीन ऑर्डर जिंकल्यामुळे निफ्टी इंडिया डिफेन्स निर्देशांक ४% पेक्षा जास्त वाढला ज्यामुळे खरेदीची आवड निर्माण झाली. जागतिक स्तरावर, कमकुवत अमेरिकन नोकऱ्यांच्या आकडेवारीनंतर २५bps फेडरल दर कपातीची अपेक्षा आहे. शिवाय, बँक ऑफ इंग्लंड आणि बँ क ऑफ जपानकडून व्याजदर निर्णयांचा जागतिक तरलता आणि जोखीम भावनांवर होणाऱ्या परिणामांवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल. एकंदरीत, मध्यवर्ती बँकेच्या घटनांभोवती संभाव्य अस्थिरता असली तरी, जवळच्या काळात बाजाराचे दृष्टिकोन रचनात्मक राहते, तर भारत-अमेरिका व्यापार वाटाघाटींमधील प्रगती गुंतवणूकदारांच्या आत्मविश्वासाला अतिरिक्त चालना देऊ शकते.'

Comments
Add Comment

महाराष्ट्रातील ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतींसाठी आरक्षण जाहीर

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीआधी

'प्रहार' विशेष: चष्मा खेळणे नसून 'जीवनसाथी' Zeiss च्या मुंबईतील नव्या दालनात १८० डिग्री फेशियल इमेजनिंगचा अनुभव घ्या

मोहित सोमण चष्मा हा लहानांपासून थोरल्यापर्यंत जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. सकाळी उठल्यापासून रात्री

रेशनच्या तांदळात आढळला मृत साप

सोलापूर : सोलापूर शहरातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. मागील दोन

कॉरिडॉरसाठी आमची घरं-दारं पाडण्यापेक्षा विठ्ठल मंदिराचा काही भाग पाडा

दुकानदाराच्या विचित्र वक्तव्याने भाविक संतप्त सोलापूर : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या पंढरपुरातील

अन्न आणि जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईमुळे ऑगस्टमध्ये किरकोळ महागाई २.०७% वर पोहोचली मात्र.....

प्रतिनिधी:भारताच्या किरकोळ महागाईत (Retail Inflation) निर्देशांकात इयर ऑन इयर बेसिसवर ऑगस्टला २.०७% वाढ झाली आहे. सांख्यिकी

Urban IPO Day 3: शेवटच्या दिवशी Urban Company IPO ची शानदार कामगिरी

मोहित सोमण:अर्बन कंपनीच्या आयपीओने (Urban Company IPO) अखेर शानदार कामगिरी केली आहे. तिसऱ्या म्हणजेच शेवटच्या दिवशीही