सलग २००० दिवस योगाभ्यास करून हॅबिल्‍डच्या सौरभ बोथरा यांनी घडवला वर्ल्ड रेकॉर्ड

वर्ल्ड रेकॉर्ड युनियनकडून मिळाली मान्यता


मुंबई: बहुतेक लोकांसाठी एक दिवस दिनचर्या चुकणे सामान्य गोष्ट असते. पण हॅबिल्‍डचे (Habuild) सह-संस्थापक आणि योग शिक्षक सौरभ बोथरा यांच्यासाठी आजारपण, प्रवास, कामाचा ताण किंवा वैयक्तिक जबाबदाऱ्या असूनही दररोज योग करणे हे कधी ही टाळता न येणारे राहिले. एक ऐतिहासिक कामगिरीत त्यांनी सलग २००० दिवस योगाभ्यास पूर्ण केला आणि वर्ल्ड रेकॉर्ड युनियनकडून मान्यता मिळवत आपला सहावा वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला. ही उपलब्धी त्यांच्या वैयक्तिक शिस्ती व समर्पणाचे दर्शन घड वतेच शिवाय योग आणि जागरूक सवयी आधुनिक जीवनशैलीचा भाग बनवण्याचे हॅबिल्‍डचे ध्येयही बळकट करते.सौरभ यांच्या सातत्यपूर्ण योगाभ्यासाने हॅबिल्‍डच्या कोट्यवधींच्या जागतिक परिवाराला दाखवून दिले की खरी ताकद सोयीपेक्षा शिस्तीत आणि सा तत्यात दडलेली आहे. सौरभ यांनी रोजच्या साधनेतून हे सिद्ध केले की योग म्हणजे शरीराची तंदुरुस्ती नव्हे, तर मन, आत्मा आणि जीवनाचा संतुलित प्रवास आहे.



आपल्या या उपलब्धीबद्दल सौरभ बोथरा, सह-संस्थापक व योग शिक्षक, हॅबिल्‍ड म्हणाले, '२००० दिवसांचा योग हा फक्त माझा प्रवास नाही, तर आपल्या संपूर्ण हॅबिल्ड परिवाराची सामूहिक साधना आहे. दररोज लाखो लोकांनी योगाभ्यासाची निवड करू न या सा तत्याच्या यात्रेला नवी ऊर्जा दिली. प्रत्येक सहभागी माझ्यासाठी प्रेरणास्थान आहे, कारण तुमच्यामुळेच ही वाट इतकी अर्थपूर्ण झाली. ही आता केवळ माझी गोष्ट राहिलेली नाही, ती आपल्या सर्वांच्या सामर्थ्याची आणि सातत्याची प्रेरणादायी कथा आहे.'ही कामगिरी सौरभ आणि हॅबिल्‍ड यांनी मिळवलेल्या अनेक जागतिक मान्यतांच्या यशस्वी मालिकेतील आणखी एक नवा मैलाचा दगड ठरली आहे. याआधी जानेवारी २०२४ मध्ये हॅबिल्‍डने युट्युबवर योगा लाईव्ह स्ट्रीम पाहणाऱ्या सर्वाधिक प्रेक्षकांचा (२,४६,२५२) गि नीज वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित केला. त्यानंतर वर्ल्ड रेकॉर्डस् युनियनकडून एका दिवसात सर्वाधिक लाईव्ह व्यूअरशिप (५,९९,१६२ प्रेक्षक) आणि सर्वात मोठा वर्चुअल मेडिटेशन क्लास (२,८७,७११ सहभागी) यासाठी किताब मिळवला. २०२३ मध्ये हॅबिल्‍डने वर्ल्ड रेकॉ र्डस् युनिय नकडून सर्वात मोठ्या वर्चुअल योगा क्लासचा (१,३४,०५७ सहभागी) रेकॉर्ड मिळवला. ताज्या कामगिरीत ऑफिशियल वर्ल्ड रेकॉर्डने २०२५ च्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्वात मोठ्या समन्वित वर्चुअल योगा सेशनचा (७,५२,०७४ सहभागी, १६९ देशांतील) किताब प्रदान केला.

Comments
Add Comment

एकनाथ शिंदेंचे विश्वासू मंगेश चिवटेंच्या भावाला बेदम मारहाण

सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मंगेश चिवटे यांचे बंधू आणि शिवसेना जिल्हाप्रमुख

वसईत गॅस पाईपलाईन फुटली

वसई : पालघर जिल्ह्यातील वसईमध्ये वसंत नागरी परिसरात शनिवारी चार ऑक्टोबर रोजी सकाळी धक्कादायक घटना घडली.

मुंबई २०३० पर्यंत रेबीजमुक्त करणार, महापालिकेचा निर्धार

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य संस्थांमधील रेबीज प्रतिबंधक लसीकरण केंद्रे, लसीकरण आणि

गिरगावात आगीच्या दुर्घटनेत फूड स्टॉल जळून खाक

मुंबई: दक्षिण मुंबईतील गिरगाव येथे एका फूड स्टॉलला मोठी आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या दुर्घटनेत हा फूड स्टॉल

HDFC Bank Update: दुसऱ्या तिमाहीत बँकेच्या कर्ज पुरवठ्यात लक्षणीय वाढ

प्रतिनिधी: एचडीएफसी बँकेने आपल्या दुसऱ्या तिमाहीतील आर्थिक माहिती एक्सचेंजला दिली आहे. त्यातील

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द