माधुरी हत्ती प्रकरण : कोल्हापूरला पाठवण्यावर तुर्तास निर्णय नाही


प्रकरण उच्चस्तरीय समितीकडे वर्ग करण्याबाबत सर्वांचे एकमत


नवी दिल्ली : कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील जैन मठात ३३ वर्षांपासून असलेली माधुरी उर्फ महादेवी हत्ती परत कोल्हापूरला पाठवण्यावर सर्वोच्च न्यायालयात आज, शुक्रवारी सुनावणी झाली. मात्र, तातडीने कोल्हापूरला पाठवण्याबाबत कोणताही निर्णय देण्यात आलेला नाही. हे प्रकरण आता एका उच्चस्तरीय समितीकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे न्यायालयात सर्व पक्षकारांनी मान्य केले आहे.


याप्रकरणाच्या सुनावणीदरम्यान राज्य सरकारच्या वकीलांनी सांगितले की, "माधुरी हत्ती कोल्हापुरातून जामनगरमधील वनतारा पुनर्वसन केंद्रात हलवण्यात आली असून, स्थानिक नागरिकांच्या धार्मिक भावना लक्षात घेऊन तिला परत कोल्हापूरला आणावे, अशी आमची भूमिका आहे." यावर न्यायालयाने हत्तीची प्रकृती चिंताजनक असल्याचे निरीक्षण नोंदवत, "आम्ही वनताराशी संवाद साधू," असे म्हटले. तसेच कोर्टाच्या निर्णयापेक्षा लोकांच्या भावना अधिक महत्त्वाच्या का?" असा थेट सवाल देखील राज्य सरकारच्या वकिलांना विचारण्यात आला.


हायपॉवर कमिटी म्हणजे नेमकं काय ? असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. त्यावर राज्य सरकारने हे प्रकरण त्या समितीकडे वर्ग करण्यात येईल, असे स्पष्ट केले.



पार्श्वभूमी :-


मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार माधुरी हत्तीला जामनगरमधील ‘वनतारा’ पुनर्वसन केंद्रात हलवण्यात आले होते. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. स्थानिक नागरिक, मठाचे संत आणि अनुयायी हत्तीच्या परतीसाठी आग्रही असून, राज्यभर या प्रकरणावरून तीव्र चर्चा सुरू आहे. दुसरीकडे, प्राणीसंवर्धन संस्था आणि कायदेमंडळ हत्तीच्या आरोग्यकल्याणाला प्राधान्य देण्याच्या भूमिकेत आहेत.



प्रकरणाचा मागोवा:-


हत्तीचे नाव : - महादेवी उर्फ माधुरी


स्थान :- जैन मठ, नांदणी (कोल्हापूर)


विवादाचा मुद्दा :- धार्मिक भावना -विरुद्ध- प्राणी कल्याण


कोर्ट निर्णय :- तातडीचा निर्णय नाही, प्रकरण उच्चस्तरीय समितीकडे


Comments
Add Comment

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या

चाउमीन, पिझ्झा-बर्गर.. फास्ट फूडच्या अतिसेवनाने आतड्यांना छिद्र, ११ वीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

अमरोहा : एखाद्या गोष्टीच अतिव्यसन हे नेहमीच जीवघेणं ठरत. अश्याच एका अति फास्ट फूड (जंक फूड) व्यसनाने उत्तर

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत 'रत्नजडित' रामाचे आगमन; १० फूट उंच, ३० कोटींची सुवर्णमूर्ती आणि तंजावर कलेचा अजोड संगम!

अयोध्या : रामजन्मभूमी अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या भक्तीचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. कर्नाटकातील अज्ञात

परिक्षेत प्रश्न विचारला आणि दिल्लीच्या विद्यापीठातील प्राध्यापकाचे थेट निलंबन! काय आहे प्रकरण?

नवी दिल्ली: दिल्लीतील महाविद्यालयं आणि शाळांबाबत नेहमीच काहीतरी विषय चर्चेत असतो. अशाच प्रकारे दिल्लीतील

New Zealand Visa : न्यूझीलंडमध्ये आता भारतीयांची चांदी! ५,००० कुशल व्यावसायिकांना थेट वर्क व्हिसा, विद्यार्थ्यांसाठीही मोठा निर्णय

नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील व्यापारी संबंधांनी आता एक नवं वळण घेतले आहे. दोन्ही देशांनी मुक्त

इस्रोच्या ब्लूबर्ड ब्लॉक-2 चे यशस्वी प्रक्षेपण

श्रीहरिकोटा : भारतीय अवकाश संशोधन संस्थाने नुकतेच एका ऐतिहासिक मोहिमेचे प्रक्षेपण केले आहे. श्रीहरिकोटा येथील