इन्फोसिसचे BuyBack Share लक्ष्य पूर्ण होणार संचालक मंडळाच्या १८००० कोटींच्या मंजूरीनंतर शेअर उसळला

मोहित सोमण:सप्टेंबर महिन्यात अखेरीस इन्फोसिसने आपले लक्ष पूर्ण केले. प्रस्तावित शेअर बायबॅकला (Share Buyback) इन्फोसिस कंपनीच्या संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. काल उशीरा झालेल्या बैठकीत या १८००० कोटी रूपयांच्या बाय बायबॅक ला अंतिम मंजुरी मंडळाने दिली. गेल्या आठ वर्षांतील पाचवे बायबॅक कंपनीने मंजूर केले. यापूर्वीचे शेवटचे बायबॅक २०२२ मध्ये कंपनीकडून करण्यात आले होते. उपलब्ध माहितीनुसार, सौद्यात इन्फोसिस सुमारे १० कोटी शेअर्स बायबॅक करेल जे १८०० रुपये प्रति शेअर या दराने व्यवहार करणार आहे. प्रस्थापित आकडेवारीनुसार जे एकूण भागभांडवलातील २.४१% इक्विटी हिस्सा (Stake) असणार आहे. सध्याच्या बाजारभावापेक्षा १९% प्रीमियम हा व्यवहार होणार आहे. ज्यामुळे भविष्यात इन्फोसिस शेअर्समध्ये मज बूत तेजी गुंतवणूकदारांना पहायला मिळू शकते.साधारणतः बायबॅक अंतर्गत कंपनी निविदा (Tender) ऑफरद्वारे सामान्यतः विशिष्ट संख्येचे शेअर्स सध्याच्या बाजारभावापेक्षा जास्त असलेल्या निश्चित किमतीत पुनर्खरेदी करण्याची ऑफर देते. ही ऑफर मर्यादि त कालावधीसाठी खुली आहे आणि शेअरहोल्डर त्यांचे शेअर्स कंपनीला देऊ शकतात असे इन्फोसिसने यावेळी स्पष्ट केले.


या ठरवलेल्या बायबॅक व्यवहारात गुंतवणूकदारांना त्यांच्या शेअर्ससाठी मिळणाऱ्या मूल्याबद्दल खात्री देखील मिळते. सामान्यतः जर निविदा केलेल्या शेअर्सची संख्या कंपनी परत खरेदी करू इच्छित असलेल्या संख्येपेक्षा जास्त असेल, तर शेअर्स प्रमाणानुसार स्वी कारले जातात. यापूर्वी कंपनीने २०१७ मध्ये १३००० कोटी, २०१९ मध्ये ८२६० कोटी, २०२१ मध्ये ९२०० कोटी, २०२३ मध्ये ९३०० कोटींचे बायबॅक शेअर व्यवहार केले होते.कंपनीच्या दीर्घकालीन रोख प्रवाह (Cash Flow) आणि वाढीच्या शक्यतांवर व्यवस्थापना चा (Company Managment) विश्वास असल्याचे सध्याचे बायबॅक दर्शवते. विश्लेषकांचे अथवा तज्ञांच्या मते बायबॅकमुळे केवळ ईपीएस (Earning per Share EPS) आणि आरओई (Return on Equity ROE) सारख्या प्रमुख आर्थिक निर्देशकांमध्ये सुधा रणा होणार नाही, तर ते भागधारकांना लाभांशाच्या तुलनेत कर-कार्यक्षम परतावा देखील देईल, तसेच अतिरिक्त रोख साठ्यात भांडवली रचना (Capital Structure) अनुकूल करेल.


अद्याप कंपनीकडून पात्र ठरण्यासाठी अटी शर्तीची घोषणा अद्याप करण्यात आली नाही. तरीही वेळोवेळी पाहिल्यास इन्फोसिसच्या बायबॅकमुळे शेअरच्या किमतीत वाढ होते. आतापर्यंत या प्रकारच्या घोषणेनंतर ३-६ महिन्यांच्या कालावधीत शेअर्समध्ये वाढ दि सून आली आहे, जरी विश्लेषकांचे म्हणणे आहे की अल्पकालीन अस्थिरता कायम राहण्याची शक्यता आहे.संचालक मंडळाच्या बैठकीपूर्वी इन्फोसिसच्या शेअर्समध्ये काही नफा बुकिंग झाली आणि सुमारे १.३% घसरण होऊन ते प्रति शेअर १५१२ रुपयांवर काल स्थिरावले होते या वर्षी शेअरवर गुंतवणूकदारांच दबाव कायम होता. गुंतवणूकदारांनी वाढीच्या दृष्टिकोनाबद्दल सावध राहिल्यामुळे आतापर्यंत सुमारे २०% यावर्षी शेअर्समध्ये घसरण झाली होती. आज सकाळच्या सत्रात १.२३% वाढ झाल्याने प्रति शेअर किंमत १ ५२७.१० रूपयांवर पोहोचली.

Comments
Add Comment

पाऊस पडल्यामुळे मुंबईची हवा झाली एकदम 'स्वच्छ'!

मुंबई : मुंबईत रात्री झालेल्या पावसामुळे मुंबईकरांना काही दिवसांपासूनच्या उष्णतेपासून आणि प्रदूषणापासून थोडा

शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना सवलतीच्या दरात वीज

मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज सवलतीची केली घोषणा मुंबई : राज्य

मुंबईनजिक बांधणार देशातील सर्वाधिक लांबीची भिंत! पण यामागचे कारण काय?

मुंबई : पालघर जिल्ह्यात बांधले जाणारे वाढवण बंदर हा केंद्र सरकारचा एक खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे. या बंदरात

दिवाळी रोजगार मेळाव्यात मोदींनी ५१,००० हून अधिक जणांना दिली नोकरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'रोजगार मेळाव्यात' ५१,००० हून अधिक तरुणांना नोकरीची पत्रे दिली.

मतदारांसाठी निवडणूक आयोगाचे नवे नियम; गरजेच्या किमान सुविधा देणे बंधनकारक

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना एक महत्त्वाचा आदेश दिला आहे.

मनसे दीपोत्सवात ड्रोन उडवणाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुंबई : शिवाजी पार्क पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सव कार्यक्रमात ड्रोन उडवणाऱ्या अनेक