अमेरिकेत भारतीय व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोर धारदार शस्त्राने केला हल्ला

डलास: अमेरिकेतील डलास शहरात एका भारतीय वंशाच्या व्यक्तीची क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. 50 वर्षीय चंद्रमौली नागमाल्लैया यांना त्यांची पत्नी आणि मुलासमोर एका व्यक्तीने धारदार शस्त्राने ठार केले. ही घटना टेक्सास येथील एका मोटेलमध्ये घडली असून, आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 सप्टेंबर रोजी ही घटना डाउनटाउन सूट्स मोटेलमध्ये घडली. चंद्रमौली मोटेलमध्ये काम करणाऱ्या योर्डानिस कोबोस-मार्टिनेज नावाच्या व्यक्तीसोबत एका जुन्या वॉशिंग मशीनच्या वापरावरून वाद घालत होते. यावेळी योर्डानिसने रागाच्या भरात चंद्रमौली यांच्यावर हल्ला केला.


घडलेल्या घटनेनुसार, चंद्रमौली यांनी वॉशिंग मशीन वापरू नये असे सांगितले. ही गोष्ट कोबोस-मार्टिनेजला आवडली नाही, कारण चंद्रमौली यांनी थेट त्याच्याशी न बोलता एका महिला सहकाऱ्यामार्फत संदेश दिला होता. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. वाद विकोपाला गेला आणि योर्डानिसने आपल्याकडील धारदार शस्त्राने चंद्रमौली यांच्यावर हल्ला केला.


चंद्रमौली यांनी मोटेलच्या कार्यालयाकडे धाव घेतली, जिथे त्यांची पत्नी आणि मुलगा उपस्थित होते. त्यांनी आपल्या पतीला वाचवण्यासाठी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, परंतु आरोपीने त्यांना बाजूला ढकलून हल्ला सुरूच ठेवला. या हल्ल्यात चंद्रमौली यांचे शीर धडावेगळे झाले.


पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी योर्डानिस कोबोस-मार्टिनेजला अटक केली. त्याच्यावर 'कॅपिटल मर्डर'चा (Capital Murder) आरोप लावण्यात आला आहे. या क्रूर घटनेमुळे अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय समुदायामध्ये शोक आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

Crows pick up cigarette butts : स्वीडनमध्ये सिगारेटची तुकडे उचलण्यासाठी कावळ्यांची मदत

स्वीडनमधील स्टॉकहोमजवळील सोडरटॅल्ये (Södertälje) शहरात कचरा व्यवस्थापनाचा एक अभिनव आणि रंजक प्रयोग केला जात आहे.

US Iran War : अमेरिका-इराण संघर्ष पेटला: अमेरिकेचा जोरदार हवाई हल्ला, तर इराणचे अमेरिकन तळांवर प्रतिहल्ले!

इंधनाचे दर गगनाला भिडण्याची शक्यता मध्यपूर्वेत पुन्हा एकदा युद्धाचे ढग गडद झाले आहेत. अमेरिका आणि इराण

Ukraine - Russia War : युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यांनी रशियाची सागरी वाहतूक विस्कळीत; अझोव समुद्रात तणाव वाढला

काळ्या समुद्रात रशिया आणि युक्रेनमधील सागरी संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. १४-१५ जुलैच्या रात्री युक्रेनने

Iran - America War : इराणकडे जाणारे तेलवाहू जहाज अमेरिकेने अडवले; नौदल नाकेबंदीनंतरची पहिली मोठी कारवाई

वॉशिंग्टन : अमेरिकेने गुरुवारी पहाटे (स्थानिक वेळेनुसार बुधवारी) इराणमधील एका बंदराकडे जाण्याचा प्रयत्न

PoK : पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबारात PoK मध्ये 12 नागरिकांचा मृत्यू

मुझफ्फराबाद : पाकिस्तानव्याप्त काश्मीर (POK)मध्ये सरकारविरोधी आंदोलन अधिक तीव्र झाले असून, मंगळवारी आंदोलक आणि

Iran - America War : इराणच्या तेल नेटवर्कवर अमेरिकेचा मोठा प्रहार; ५० हून अधिक व्यक्ती, कंपन्या ब्लॅकलिस्ट

वॉशिंग्टन : जागतिक भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने इराणविरोधातील आर्थिक कारवाई आणखी तीव्र केली