दारूच्या नशेत मुलाने ८० वर्षीय आईचा घेतला जीव!

कणकवली: माणुसकीला काळिमा फासणारी आणि मन सुन्न करणारी एक घटना कणकवली तालुक्यातील वारगाव, सोरफ-सुतारवाडी येथे घडली आहे. दारूच्या व्यसनाने एका मुलाला इतके हैवान बनवले की, त्याने आपल्या ८० वर्षांच्या वृद्ध आईचा निर्घृण खून केला. या धक्कादायक घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.


प्रभावती सोरफ असे मृत महिलेचे नाव असून, त्यांचा मुलगा रवींद्र सोरफ यानेच हा क्रूर प्रकार केल्याचा आरोप आहे. रवींद्रला दारूचे व्यसन असून, रात्रीच्या वेळी आई आणि मुलामध्ये कोणत्यातरी कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, संतप्त झालेल्या रवींद्रने थेट कोयता घेऊन आपल्या आईवर वार केले. त्याने डोक्यावर आणि शरीरावर अनेक ठिकाणी वार करत तिला गंभीर जखमी केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईला त्याने ओढत घरातल्या हॉलमध्ये आणले.


या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने कणकवली पोलिसांना कळवले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता, प्रभावती सोरफ यांचा जागीच मृत्यू झाल्याचे आढळून आले. पोलिसांनी आरोपी रवींद्र सोरफ याला जागेवरून ताब्यात घेऊन कणकवली पोलीस ठाण्यात आणले आहे. सध्या त्याची कसून चौकशी सुरू आहे. त्याने दारूच्या नशेत हे कृत्य केले की यामागे आणखी कोणते कारण आहे, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेने संपूर्ण गावात भीतीचे आणि दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment

नवीन मोबाईल घेण्याचा विचार करताय का? तर हे तुमच्यासाठी आहेत चांगले ऑप्शन

ओप्पो १५ सप्टेंबरला भारतात नवीन F31 सिरीज स्मार्टफोन करणार लाँच

Health: साखरच नव्हे तर या पदार्थांमुळे तुमचे दात होतात खराब, वेळीच लक्ष द्या नाहीतर...

मुंबई: साखर आणि गोड पदार्थ खाल्ल्याने दातांना कीड लागते हे आपल्याला माहीत आहे. पण असे अनेक पदार्थ आहेत जे गोड

‘मिशन वात्सल्य योजने’चा सर्व विधवा व एकल महिलांना मिळणार लाभ - आदिती तटकरे

मुंबई : कोविड १९ या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांना तसेच विधवा महिलांना

पोलिसांनी १२ मुलांना भीक मागण्यापासून वाचवले

शिर्डी: साईबाबा मंदिराच्या धार्मिक स्थळांवर भीक मागण्यासाठी जबरदस्तीने लावलेल्या १२ मुलांना शिर्डी पोलिसांनी

शिर्डीत बाल हक्कांची पायमल्ली? पोलिसांचा कठोर इशारा!

अल्पवयीन मुलांकडून भिक्षा व विक्री करविणाऱ्या पालकांविरोधात गुन्हे दाखल शिर्डी : जगप्रसिद्ध साईबाबांच्या

बीडमध्ये पत्नीने केलेल्या मारहाणीत पतीचा मृत्यू

बीड : बीडच्या (Beed) अंबाजोगाईमध्ये (Ambajogai) पत्नीने केलेल्या मारहाणीत पतीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.