रेशनच्या तांदळात आढळला मृत साप

सोलापूर : सोलापूर शहरातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. मागील दोन महिन्यापूर्वी दूषित पाण्यामुळे मोदी परिसरात दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच पुन्हा त्याच भागामध्ये रेशन दुकानामधून आणलेल्या तांदळामध्ये चक्क मेलेला साप आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


रेशनच्या तांदळामध्ये चक्क मेलेला साप आढळून आल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ही घटना मोदी भागामध्ये उघडकीस आली. सर्प मित्र सिद्धेश्वर मिसालेलू आणि शिवसेनेचे जिल्हा युवा प्रमुख प्रियदर्शन साठे यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे.


दरम्यान, ही माहिती सिद्धेश्वर मिसालेलू यांनी सोलापूर शिवसेना प्रदेश प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना फोनद्वारे दिली. त्यांनी लगेच युवा जिल्हा प्रमुख प्रियदर्शन साठे यांना ही माहिती दिली. तेव्हा साठे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी केली असता त्यांना रेशनच्या तांदळामध्ये मृत साप आणि जिवंत अळ्या दिसून आल्या. तेव्हा साठे यांनी पुरवठा अधिकाऱ्याला तातडीने कळवले.


या भागातील विभागीय अधिकारी प्रफुल्ल नाईक यांनी घटनास्थळी घेऊन पंचनामा करून संबंधित तांदूळ जप्त केला आहे.

Comments
Add Comment

रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार: फडणवीस

नाशिक : रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या व्यासपीठावर मनोज जरांगे येणार का?

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे

Sanjay Shirsat : संजय शिरसाटांच्या मनात नेमकं चाललंय काय? निवृत्ती की राजकीय खेळी?

शिंदे गटाच्या आमदाराच्या निर्णयामागे कुटुंबातील 'नवे नेतृत्व' आणण्याची खेळी? मुंबई : राज्याचे समाजकल्याण

मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर दोन महिला अधिकाऱ्यांमध्ये खुर्चीवरून भांडण! नागपूरचे पोस्टमास्टर जनरलपद नेमके कुणाकडे?

एकीने दुसरीच्या अंगावर पाणी ओतलं, चिमटाही काढला नागपूर : नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या

फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला नवं वळण, प्रशांतच्या बहिणीचा मोठा खुलासा

सातारा : साताऱ्यातील फलटण येथे महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याच्या प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळालं आहे. या

फलटणमध्ये महिला डॉक्टरची आत्महत्या, निलंबित PSI बदनेचा शोध सुरू

सातारा : सातारा जिल्हातील फलटण मधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर पोलिसांना २४ तासांच्या आत आरोपी प्रशांत