माजी उपसरपंचाच्या आत्महत्येनंतर नर्तिका पूजा गायकवाडच्या फॉलोअर्समध्ये वाढ!

बीड: बीडच्या गेवराईतील लुखमासला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी काही दिवसांपूर्वी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. मात्र, ही आत्महत्या आहे की घातपात यावरून सध्या बरीच उलटसुलट चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. दरम्यान, गोविंद बर्गे यांच्या मृत्युमागे पूजा गायकवाड नामक एका नर्तकीचा हात असल्याचा दावा बर्गे यांच्या नातेवाईकांनी केला आहे. यासंदर्भात बर्गे यांच्या नातेवाईकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पूजाविरोधात गुन्हा दाखल करत तिला ताब्यात घेतलं. त्यानंतर न्यायालयीन सुनावणीत या नर्तकीला तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली असून, पोलीस तिची कसून चौकशी करत आहेत.

बर्गे यांच्या मृत्यूप्रकरणातली नर्तिका पूजा गायकवाड हिचं नाव सातत्याने समोर येत असून तिच्या प्रेमात अखंड वेडा झालेल्या बर्गे यांनी तिच्यामुळेच आपले आयुष्य संपवलं असल्याचे काहीचं म्हणणं आहे. या आत्महत्येनंतर पूजा गायकवाड बरीच चर्चेत असून सोशल मीडियावरही तिच्या नावाची खूप चर्चा सुरू आहे. पूजा गायकवाड कोण आहे? हे पाहण्यासाठी लोकं तिच्या सोशल मिडियावर अकाऊंटवर गर्दी करताना पहायला मिळत आहे.

कोण आहे पूजा गायकवाड?





नर्तिका असलेल्या पूजाचे इन्स्टाग्रामवर अकाऊंट असून, त्यावर ती तिचे रील्स टाकत असते. विशेष बाब म्हणजे, ही घटना घडण्यापूर्वी म्हणजेच केवळ २ दिवस आधी पूजाचे  फॉलोअर्स अवघे ५००-७०० इतकेच होते. मात्र गोविंद बर्गे मृत्यूप्रकरण समोर आल्यानंतर तिच्या फॉलोअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. दि. १२ सप्टेंबरपर्यंत तिचे एकूण ३१  हजार फॉलोअर्स झाले आहेत. ज्यात काही दिवसांत आणखीन भर पडण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment

Ganesh Naik : हत्तीसह वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई वाढविण्याचा विचार करा

- वनमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश मुंबई : हत्ती व अन्य वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान

Chandrashekhar Bawankule : सातबारावर नाव नसलेले शेतकरी आता शासकीय रेकॉर्डवर येणार

- २.३१ लाख शेतकऱ्यांच्या 'ॲग्रीस्टॅक'चा मार्ग मोकळा; सर्वांना कर्जमाफी आणि शासकीय योजनांचा मिळणार लाभ - मंत्री

SIR : राज्यात अद्यापही १ कोटी ८० लाख ६० हजार मतदार 'एसआयआर'बाहेर

७७ टक्के मतदारांकडून प्रक्रिया पूर्ण; शहरी भागात अनास्था, १७ ऑगस्टला संपणार मुदत मुंबई : देशभरात सुरू असलेल्या

Chandrashekhar Bawankule : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात प्रतिज्ञापत्रांऐवजी स्वयंघोषणापत्राला प्राधान्य

१० सेवांची पुनर्रचना; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय मुंबई : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात

Viksit Bharat Youth Conclave 2026 : पुण्यात रंगणार ‘विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह-2026’; देशभरातील 1,000 युवकांचा सहभाग

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरातील युवकांना क्रीडा, तंत्रज्ञान, नवोन्मेष, उद्योजकता आणि संस्कृतीच्या माध्यमातून

CSMT : सीएसएमटीच्या प्रत्येक रेल्वेगाडीत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या उद्घोषणेची मागणी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र मुंबई : छत्रपती शिवाजी