ओप्पो १५ सप्टेंबरला भारतात नवीन F31 सिरीज स्मार्टफोन करणार लाँच
मुंबई : चिनी टेक कंपनी ओप्पो भारतात आपली नवीन F31 सिरीज स्मार्टफोन्स १५ सप्टेंबर रोजी लाँच करणार आहे. या सिरीजमध्ये तीन मॉडेल्स – ओप्पो F31 5G, ओप्पो F31 Pro 5G आणि ओप्पो F31 Pro+ 5G असतील, जे मध्यम श्रेणीच्या बजेट सेगमेंटसाठी डिझाइन करण्यात आले आहेत.
कंपनीने अधिकृतपणे ओप्पो इंडिया वेबसाइटवर मायक्रोसाईट लॉन्च केली असून, फोनचे प्रमुख स्पेसिफिकेशन्स आणि वैशिष्ट्ये उघड केली आहेत. या नवीन स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 7 जेन 3 प्रोसेसर असून, ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप व 50MP प्रायमरी सेन्सर दिला जाऊ शकतो. 32MP सेल्फी कॅमेरा आणि 7,000mAh बॅटरीसह 80W सुपरव्हीओसी फ्लॅश चार्जिंग सपोर्टही असेल.
ओप्पोच्या मते, या सिरीजने अँटूटूवर 8,90,000+ गुण प्राप्त केले आहेत. विशेष म्हणजे, 5,219 मिमी सुपरकूल व्हेपर चेंबर सिस्टिममुळे ओव्हरहॉटिंगची समस्या कमी होण्यास मदत होईल, तर IP68/IP69/IP66 रेटिंगमुळे धूळ व पाण्यापासून संरक्षण मिळेल. फोनमध्ये "360 डिग्री डॅमेज-प्रूफ आर्मर बॉडी"ही असेल.
लाँचिंग कार्यक्रम १५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून होणार आहे. किंमतीच्या बाबतीत लीक झालेल्या माहितीनुसार, ओप्पो F31 5G ची किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी, ओप्पो F31 Pro 5G ची किंमत 30,000 रुपयांपेक्षा कमी आणि ओप्पो F31 Pro+ 5G ची किंमत 35,000 रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.
ही सिरीज निळ्या आणि गोल्डन रंगात उपलब्ध होऊ शकतो. बजेट स्मार्टफोन सेगमेंटमध्ये दमदार पर्याय म्हणून ओप्पो F31 सिरीज भारतीय बाजारात पाहायला मिळणार आहे.