मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अखेरच्या सत्रात वाढ झाली आहे. सकाळची वाढ मायक्रो व मॅक्रो कारणांमुळे अखेरच्या सत्रातही कायम राहिल्याने शेअर बाजारात वाढ झाली. तसेच बाजाराला तरण्यात आज पीएसयु व बँक निर्देशांकाची सका रात्मक भूमिका राहिली. सेन्सेक्स १२३.५८ अंकांने वाढत ८१५४८.७३ पातळीवर व निफ्टी ३२.४० अंकांनी वाढत २५००५.५० पातळीवर स्थिरावला.सेन्सेक्स बँक निर्देशांकात २१५.९८ व बँक निफ्टीत १३३.६० अंकांने वाढ झाली.युएस बाजारातील पुढील आठवड्या तील फेड दरकपात तसेच युएस बाजारातील पीपीआय घसरलेली आकडेवारी, याशिवाय युएससह आशियाई बाजारातील अखेरच्या मिश्र संकेतामुळे बाजारात वाढ झाली तर खरी परंतु आयटी शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे मर्यादित राहिली. दुसरीकडे भारता तील शेअर बाजारातील मजबूत फंडामेंटलमुळे घरगुती आकडेवारीत सु़धारणा होण्याची शक्यता आहे. तसेच फिच (Fitch) आकडेवारी गुंतवणूक अपेक्षित करत असल्याने व जीएसटी तर्कसंगतीकरण व दरकपातीमुळे सलग चौथ्यांदा शेअर बाजारात वाढ झाली आहे. विशेषतः मिड स्मॉल कॅप शेअर्समध्ये वाढ झाल्याने बाजारात सपोर्ट लेवल मिळण्यास मदत झाली. दरम्यान आज बीएसई मंथली एक्सपायरी असल्यानेही काही प्रमाणात अखेरच्या सत्रात वाढीचा वेग मंदावला.
एकीकडे शेअर बाजारात वाढ झाली असली तरी दुसरीकडे एनएससईत एकूण ३१५० समभगापैकी १५४१ समभागात वाढ झाली आहे तर १५१६ समभागात घसरण झाली. आज एनएसईत ८७ समभाग (Stocks) अप्पर सर्किटवर कायम राहिले असले तरी ५८ स मभाग लोअर सर्किटवर राहिले आहेत. त्यामुळे बाजारात निफ्टी प्रतिकार पातळी (Resistance Level) जाणवली. आज दिवसभरात सोन्याचा, रूपयांच्या कच्च्या तेलाच्या निर्देशांकात दबाव वाढल्याने संध्याकाळपर्यंत घसरण झाली. आगामी युएस सीपीआय आकडेवारीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष केंद्रित झाले असून आगामी ट्रम्प व मोदी यांच्यातील टॅरिफ वाटाघाटीकडेही गुंतवणूकदारांचे लक्ष केंद्रित झाले आहे.अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ वारी एनर्जीज (७.५३%), अरबिंदो फार्मा (५.६१%), न्यूलँड लॅब्स (५. ०७ %), ज्युपिटर वॅगन्स (४.४६%), चोला फायनांशियल (४.२२%), भेल (४.११%), एसईएमई सोलार होल्डिंग्स (३.५१%), हिन्दुस्तान झिंक (३.१०%), जेल इंडिया (२.१४%), श्रीराम फायनान्स (२.५६%) समभागात झाली आहे.अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण एजंल वन (५.१६%), बीएसई (४.५८%), नेटवेब टेक्नॉलॉजी (४.१४%),गॉडफ्रे फिलिप्स (३.५०%), नुवामा वेल्थ (३.३९%), जेएसडब्लू होल्डिंग्स (३.३५%), गुजरात फ्ल्यूरोटेक (३.११%), झेन टेक्नॉलॉजी (२.९१%), पुनावाला फायनान्स (२.५२%), आधार हाउसिंग फाय नान्स (२.३७%) समभागात झाली आहे.
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,'निफ्टी५० निर्देशांक २५००० पातळीच्या गंभीर मर्यादेच्या वर बंद झाला आहे.अमेरिकेने भारतावर ५०% कर ला दल्यामुळे सुरुवातीला मुख्य निर्देशांक २४४०० पातळीपर्यंत खाली आला. तथापि, या घसरणीतून निर्देशांक हळूहळू सावरत आहे. देशांतर्गत अर्थव्यवस्थेवर मर्यादित परिणाम होण्याची अपेक्षा, अमेरिकेच्या दीर्घकालीन धोरणांना भारत सरकारचा मजबूत धोरणात्म क प्रतिसाद आणि व्यापाराशी संबंधित परिणाम कमी करण्यासाठी जीएसटी सारख्या महत्त्वपूर्ण देशांतर्गत सुधारणांची घोषणा यासारख्या अनेक घटकांमुळे हे पुनरुत्थान होऊ शकते. अलिकडेच, भारतासोबत व्यापार चर्चा पुन्हा सुरू करण्यासाठी अमेरिकेकडून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे निर्देशांकाला एका नवीन श्रेणीत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, ज्याची बाजाराला खूप अपेक्षा होती.'
आजच्या बाजारातील रूपयावर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'परिवर्तनशील गुंतवणूकदारांच्या मिश्र प्रवाहामुळे आणि डॉलर निर्देशांक ९७ च्या जवळ असल्याने दबाव कायम रा हिल्याने रुपया ०.३५% ने कमकुवत होऊन ८८.४० वर व्यवहार करत होता. अमेरिकन सीपीआय डेटावर लक्ष केंद्रित केले आहे, ज्यामुळे डॉलरमध्ये अस्थिरता येऊ शकते आणि परिणामी रुपया घसरू शकतो. कच्च्या तेलाच्या किमती अस्थिर राहिल्या परंतु खा लच्या झोनमध्ये राहिल्या, ज्यामुळे अंशतः आधार मिळाला. बाजारातील भावना अमेरिका-भारत व्यापार करारावरील अद्यतनांशी संबंधित आहे, ज्यामुळे तीक्ष्ण हालचाल होऊ शकते. सध्या, रुपया ८७.८५-८८.१० च्या आत आधार म्हणून आणि ८८.५५-८८.७० च्या आत प्रतिकार म्हणून व्यवहार करताना दिसत आहे.'
आजच्या बाजारातील सोन्याच्या हालचालींवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'पुढील आठवड्यातील फेड धोरणापूर्वी अपेक्षा वाढत असल्याने, सोन्याच्या किमतीत $३६४० आणि १० ९००० रूपयांच्या उच्चांकावरून किरकोळ नफा बुकिंग झाली, ०.२५% किंवा ०.५०% दर कपातीबद्दल अनिश्चितता आहे. गेल्या १५ सत्रांमध्ये १०% वाढ झाल्यानंतर, किमती $३६५० आणि १०९००० रूपयांच्या जवळपास थकल्यासारखे दिसत आहेत.प्रमुख आधार (Main Support) १०५०००–१०६५०० रूपयानवर आहेत, तर १०९५०० रूपयांच्या अजूनही मजबूत प्रतिकार आहे. आता लक्ष आजच्या यूएस सीपीआय डेटा (११ सप्टेंबर) वर आहे, जे जवळच्या काळातील गतीसाठी टोन सेट करेल.'
त्यामुळे उद्याच्या बाजारातील हालचाली या युएस बाजारातील घडामोडीवर अवलंबून राहतील मात्र परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची भूमिका उद्याच्या बाजारातील सपोट लेवल निश्चित करू शकते.