डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्ती चार्ली किर्क यांची गोळ्या झाडून हत्या; अमेरिकेत राजकीय हिंसाचाराची चर्चा

वॉशिंग्टन: अमेरिकेतील प्रसिद्ध पुराणमतवादी (conservative) कार्यकर्ते आणि राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्ती चार्ली किर्क यांची यूटा व्हॅली युनिव्हर्सिटीमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. 'टर्निंग पॉइंट यूएसए' या त्यांच्या संस्थेच्या एका कार्यक्रमात ते बोलत असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. या घटनेनंतर अमेरिकेत पुन्हा एकदा राजकीय हिंसाचाराच्या मुद्द्यावर गंभीर चर्चा सुरू झाली आहे.


ही घटना बुधवारी (स्थानिक वेळेनुसार) दुपारी घडली. चार्ली किर्क हे त्यांच्या टर्निंग पॉईंटकडून आयोजित कार्यक्रमात विद्यापीठाच्या आवारात विद्यार्थ्यांना संबोधित करत होते. यावेळी एका वादविवादादरम्यान एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केला. यात ते जागीच कोसळले. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.


या घटनेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर किर्क यांच्या निधनाची बातमी जाहीर केली आणि त्यांचे वर्णन 'महान' असे केले. ट्रम्प यांनी किर्क यांच्या सन्मानार्थ अमेरिकेतील सर्व राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर खाली ठेवण्याचे आदेश दिले आहेत.


स्थानिक पोलिसांनी सुरुवातीला एका संशयिताला ताब्यात घेतले मात्र अद्याप त्या व्यक्तीची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही. या गोळीबाराचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, अमेरिकेतील राजकारणात वाढलेला वैचारिक संघर्ष आणि राजकीय द्वेष या घटनेसाठी कारणीभूत असल्याचे मत अनेक राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.


चार्ली किर्क (वय ३१) हे 'टर्निंग पॉइंट यूएसए' या तरुण पुराणमतवादी कार्यकर्त्यांच्या संघटनेचे सह-संस्थापक होते. त्यांनी ट्रम्प यांच्या अनेक प्रचार मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या मृत्यूने अमेरिकेतील राजकीय वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे.

Comments
Add Comment

सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी गूगल तयार; बनवले खास डूडल

सर्वत्र नववर्षाची चाहूल लागली आहे. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकजण पार्टीचे आयोजन

पुतिन यांच्या घरावरील हल्ल्यानंतर रशियाकडून घातक ‘ओरेशनिक’ क्षेपणास्त्र तैनात

मास्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या अधिकृत निवासस्थानी ड्रोन हल्ला झाल्यानंतर रशियाने

बांग्लादेशमध्ये दीपू दासनंतर तिसऱ्या हिंदूची गोळ्या झाडून निर्घृण हत्या

ढाका : बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांविरोधातील हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून, मैमनसिंग जिल्ह्यात

Khaleda Zia Death : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन

खालिदा झिया यांनी केवळ राजकारणच नव्हे, तर 'स्टाईल स्टेटमेंट'मधूनही गाजवलं सत्तेचं रणांगण! साधेपणा, काळा चष्मा

बांगलादेशात हिंदूंवर ईशनिंदेशी संबंधित ७१ हल्ले

एकसारखाच पॅटर्न - आधी सोशल मीडियावर आरोप, नंतर जमावाचा हिंदू वस्त्यांवर हल्ला ढाका : बांगलादेशात हिंदू

इंडोनेशियात भीषण दुर्घटना

जकार्ता : इंडोनेशियात एक दुर्दैवी घटना घडली आहे. रविवारी (२८ डिसेंबर) संध्याकाळी एका रिटायरमेंट होमला भीषण आग