छत्तीसगड : गरियाबंदमध्ये चकमक, १० नक्षलवादी ठार

नारायणपूर येथे १६ नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण


रायपूर : छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये आज, गुरुवारी चकमक झाली. यात १० माओवादी ठार झाले आहेत. दरम्यान राज्यातील नारायणपूर जिल्ह्यात १६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले.


यासंदर्भातील माहितीनुसार, ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये बालकृष्ण उर्फ मनोज याचा समावेश आहे, मनोजवर सरकारने १ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. गरियाबंदच्या मैनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलांमध्ये नक्षलवादी उपस्थित असल्याची माहिती मिळाल्यानंतर, सुरक्षा दलांनी संयुक्त ऑपरेशन राबवले. या मोहिमेत ई-30, एसटीएफ आणि कोब्रा कमांडोंच्या टीम्स सहभागी होत्या. आतापर्यंत 10 नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून, घटनास्थळी काही स्वयंचलित (ऑटोमॅटिक) शस्त्रास्त्रही सापडली आहेत.


दरम्यान नारायणपूर जिल्ह्यात आज, गुरुवारी १६ नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले. त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केले. नारायणपूरचे पोलीस अधीक्षक रॉबिन्सन गुरिया यांनी सांगितले की, माओवाद्यांची ‘पोकळ’ विचारधारा, निष्पाप आदिवासींवर केलेले अत्याचार, आणि संघटनेतील अंतर्गत मतभेद यामुळे निराश होऊन मुख्य प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतला.


हे सर्व माओवादी खालच्या स्तरावरील कार्यकर्ते होते. ते जनताना सरकार, चेतना नाट्य मंडळी आणि माओवादी पंचायत मिलिशिया यांसारख्या विविध युनिट्सशी संबंधित होते.अधिकाऱ्यांनी सांगितले की, जरी संघटनेतील त्यांची भूमिका निम्न स्तराची होती, तरीही त्यांनी नक्षल चळवळ जिवंत ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Comments
Add Comment

चक्रीवादळ मोंथा धडकणार! "या" राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळू हळू तो आणखी तीव्र होत आहे. हा कमी दाबाचा

“चहाशी माझा संबंध तुम्हाला माहिती आहे, पण आज मी...” मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा खास खुलासा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासीयांशी

तरुणांना नवोन्मेषाचे निर्माते बनवण्यासाठी दिल्लीत 'युवा-एआय' स्पर्धा

विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी यूजीसीकडून सर्व विद्यापीठांना पत्र… ८५ लाखांची बक्षिसं! मुंबई  : भारतातील

संरक्षण दलाच्या तिन्ही दलांसाठी ७९ हजार कोटी

नवी दिल्ली  : भारताच्या तिन्ही सैन्य दलांना अधिक शक्तिशाली आणि आधुनिक बनवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने एक मोठा

अयोध्येतील राम मंदिरावर पंतप्रधान मोदी फडकवणार धर्म ध्वज

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत प्रमुख पाहुणे अयोध्या : अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर होणाऱ्या

तब्बल ५ हजार ५०० किलो वजनाची सोन्याची बुद्ध मूर्ती!

बुद्धांचे अनुयायी जगभरात अब्जावधींच्या संख्येने आहेत, जे अनेक देशांमध्ये पसरलेले आहेत. भगवान बुद्धांना भगवान