शेअर बाजार सुसाट ! सेन्सेक्स निफ्टी वाढीत आयटी मिड स्मॉल कॅप शेअरचा मोठा वाटा 

मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अखेरच्या सत्रात चांगली वाढ झाली आहे. सलग शेअर बाजारात तिसऱ्यांदा व निफ्टी ५० मध्ये सलग पाचव्यांदा वाढ झाली आहे. विशेषतः आय टी क्षेत्रातील शेअर्समध्ये होत असलेल्या रॅलीचा फायदा घरगुती गुंतवणूकदारांना झाला आहे. सेन्सेक्स ३२३.८२ अंकांने वाढला असून ८१४२५.१५ पातळीवर स्थिरावला आहे. निफ्टी ५० हा १०४.५० अंकांने वाढत २४९७३.१० पातळीवर स्थिरावला आहे. अखेरच्या सत्रात सेन्सेक्स बँक निर्देशांकात ४११.०७ व बँक निफ्टीत ३१९.९० अंकांने मोठी वाढ झाल्याने बाजारात मोठी रॅली शक्य झाली आ हे. आज अखेरच्या सत्रापर्यंत सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.८४%,०.७२% वाढ झाली आहे व निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये ०.८४%,०.७२% वाढ झाली आहे. निफ्टी क्षेत्रीय नि र्देशांकात ऑटो (१.२८%), मिडिया (०.६३%), कंज्यूमर ड्युरेबल्स (०.३०%) निर्देशांकात घसरण झाली असून सर्वाधिक वाढ मिडस्मॉल आयटी टेलिकॉम (३.२८%), पीएसयु बँक (२.०९%), आय टी (२.६३%) निर्देशांकात वाढ झाली.आज जागतिक पातळीवर अस्थिरतेच्या तोंडावर आयटी शेअर्समध्ये गेल्या तीन सत्रात मोठ्या प्रमाणात वाढ सुरु आहे. मिड स्मॉल कॅप शेअरसह आज ब्लू चिप्स कंपनीच्या स्क्रिपमध्येही वाढ झा ल्याने बाजारात सपोर्ट लेवल मिळाली.


आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ ओरॅकल फिनसर्व्ह (१०.१२%), वेलस्पून लिविंग (९.८७%), वर्धमान टेक्सटाईल (८.१२%), अपार इंडस्ट्रीज (६.८४%), इंटलेक्ट डिझाईन (५.८२%), भारत डायनामिक्स (५.११%), पुनावाला फायनान्स (४.५४%), झेन टेक्नॉलॉजी (४.५०%), हिताची एनर्जी (४.४०%), एसबीआय कार्ड (४.२८%), कोफोर्ज (४.२४%), बँक ऑफ इंडिया (४.१९%), एचसीएल टेक्नॉलॉजी (२.५८%), टीसीएस (१.९९%), होम फर्स्ट फायनान्स (१.९१%), इन्फोसिस (१.८८%) समभागात झाली आहे.


आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण जे एम फायनांशियल सर्विसेस (७.९०%), ब्रेनबीज सोलूशन (४.५१%), विजया डायग्नोस्टिक (३.०५%), कोहान्स लाईफ (२.९४%), स्विगी (२.९२%), बीए सई (३.६८%), एमआरएफ (२.७२%), अव्हेन्यू सुपरमार्ट (२.७०%), टीबीओ टेक (२.०५%), मारुती सुझुकी (१.६७%) समभागात झाली आहे. त्यामुळे आज शेअर बाजारात वाढ झाली असली तरी दुसरीकडे युएस बाजारातील टॅरिफ घडामोडीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष केंद्रित झाले आहे. अस्थिरता असलेल्या कमोडिटीसह गुंतवणूकदार आपली गुंतवणूक राखून ठेऊ शकतील. तत्पूर्वी गुंत वणूकदारांना निफ्टी श्रेत्रीय निर्देशांकात लक्ष केंद्रित करणे फायद्याचे ठरू शकते.

Comments
Add Comment

ठाण्यात मनसे, उबाठा उमेदावारांचे अर्ज बाद

आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात ठाणे : ठाणे महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेला आणि उबाठाला मोठा

कल्याणमध्ये महायुतीत मतदानापूर्वीच विजय

भाजपच्या बिनविरोध नगरसेवकांची संख्या पाचवर कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचे मतदान

ऑपरेशन ‘मनधरणी’ला वेग

नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडूनही संवाद; प्रमुख नेत्यांकडून बंडखोरांशी वाटाघाटी मुंबई : महापालिका

अर्ज भरल्यापासून उमेदवाराला दैनंदिन खर्चाची नोंद ठेवणे बंधनकारक, सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे यांची माहिती

मुंबई (विशेष प्रतिनिधी): उमेदवारी अर्ज सादर केल्यापासून उमेदवारांनी दैनंदिन निवडणूक खर्चाची नोंद ठेवणे

मुंबईत गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये तब्बल ७०२ मतदान केंद्र

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी एकूण १० हजार २३१ मतदान केंद्रे

BMC News : निवडणूक कामात गैरवर्तणूक, महापालिकेने केले अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ कामकाजात गंभीर स्वरूपाचे गैरवर्तणूक