मंत्रालयातच फसवणूक! सरकारी नोकरीच्या नावाखाली घेतली मुलाखत, आणि...

नागपूर: सरकारी नोकरीचे स्वप्न प्रत्येकांचे असते, त्यासाठी तरुणवर्ग विविध भरती प्रक्रियेची तयारी करतात, मुलाखती देतात. मात्र या दरम्यान, अनेकजण फसवणुकीला देखील बळी पडतात.  सरकारी नोकरीचे आमिष दाखवून लाखों रुपयांची फसवणूक केल्याचे अनेक प्रकार आपल्यासमोर येतात. मात्र चक्क मुंबईच्या मंत्रालयात बनावट आयकार्डच्या आधारे प्रवेश मिळवत मुलाखती घेऊन काही तरुणांना फसवल्याचा अनोखा प्रकार समोर आला आहे. या संबंधित नागपूर पोलिसांनी एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. 


कनिष्ठ लिपिक पदाची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत, आरोपींनी मंत्रालयातच बनावट मुलाखती घेतल्या आणि जेजे रुग्णालयात वैद्यकीय चाचणी देखील घेतली.  या प्रकरणात पोलिसांनी लॉरेन्स हेन्री नावाच्या ४५ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. सदर आरोपी आणि त्याच्या सहा साथीदारांनी मिळून अनेक तरुणांची लाखो रुपयाने फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्याचे सहा साथीदार अद्याप फरार असल्याची माहिती देखील समोर येत आहे. 


धक्कादायक गोष्ट म्हणजे या टोळीने मंत्रालयातच बनावट मुलाखत आयोजित केल्या होत्या. याबद्दल तक्रारदार राहुल तायडे म्हणाले की आरोपी लॉरेन्स हेन्री आणि त्याच्या टोळीतील सदस्यांनी त्याला कनिष्ठ क्लर्कची नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्या बदल्यात त्यांनी त्याच्याकडून हप्त्यांमध्ये मोठी रक्कम वसूल केली. त्याचा विश्वास जिंकण्यासाठी, हेन्री आणि त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला मुंबईच्या जेजे रुग्णालयात नेले आणि त्याची वैद्यकीय चाचणी केली. त्यानंतर, मंत्रालयातील (महाराष्ट्र सरकारचे मुख्यालय) एका केबिनमध्ये त्याची मुलाखत घेण्यात आली, जिथे बाहेर 'शिल्पा उदापुरे' असे नाव असलेली नेमप्लेट होती. या संपूर्ण प्रकरणात गंभीर प्रश्न असा आहे की मंत्रालयाच्या आवारात बनावट मुलाखत कशी झाली? येथे तायडे यांना बनावट ओळखपत्र देखील देण्यात आले होते, ज्यामुळे त्यांना मंत्रालयात प्रवेश मिळाला. त्यांना आश्वासन देण्यात आले होते की हा त्यांच्या नियुक्ती प्रक्रियेचा एक भाग आहे आणि लवकरच त्यांना सरकारी नोकरीसाठी नियुक्ती पत्र मिळेल.



२०० हून अधिक बेरोजगार तरुणांची फसवणूक


अनेक महिने पैसे देऊन आणि सर्व 'औपचारिकता' पूर्ण करूनही तायडे यांना नियुक्ती पत्र मिळाले नाही, तेव्हा त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. नागपूरच्या हुडकेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला, लॉरेन्स हेन्रीला अटक केली. २०० हून अधिक तरुणांवर फसवणूक केल्याचा संशय माध्यमांशी बोलताना राहुल तायडे यांनी दावा केला की या टोळीने केवळ त्यांचीच नाही तर महाराष्ट्रातील २०० हून अधिक बेरोजगार तरुणांचीही फसवणूक केली आहे. या टोळीला बळी पडून अनेक तरुणांनी लाखो रुपये गमावले आहेत. यासंदर्भात नागपूर तसेच चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात तक्रारी दाखल झाल्या आहेत.



पोलिसांची कारवाई


पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेला आरोपी लॉरेन्स हेन्री हा मूळचा नागपूरमधील म्हाळगीनगरचा आहे. पोलिस चौकशीदरम्यान त्याच्याकडून अधिक धक्कादायक माहिती समोर येऊ शकते. बेरोजगार तरुणांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन या टोळीने पूर्णपणे बनावट प्रक्रिया तयार केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

Comments
Add Comment

मराठ्यांना कुणबी दाखले देण्यास सुरुवात

भुजबळांचे गैरसमज दूर करणार, शासननिर्णय व आश्वासनांची पूर्तता करण्याचे मंत्रिमंडळ उपसमितीचे

महापालिका प्रभाग रचनेच्या हरकतींवर उद्या सुनावणी

बालगंधर्व रंगमंदिर सज्ज पुणे : पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग

पुणे मेट्रोचे गणेशोत्सवात साडेपाच कोटींचे उत्पन्न

पुणे : मानाच्या प्रमुख बाप्पांचे दर्शन, देखावे आणि विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी गणेशोत्सवातील दहा दिवसांच्या

जनसुरक्षा विधेयकाविरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांचे उद्या राज्यभर आंदोलन

मुंबई : राज्यातील भारतीय जनता पक्ष युती सरकारने शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्याच्या नावाखाली आणलेल्या जनसुरक्षा

रस्त्यावर खड्डेच खड्डे, मग पोलिसांनी असं काही केलं की...

रायगड : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पनवेलजवळील पळस्पे फाटा परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय करत

ड्रायव्हिंग करताना मोबाईल-हेडफोन वापरल्यास नोकरी जाणार!

पीएमपीएमएल चालकांसाठी  महत्त्वाची बातमी पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (PMPML) अलीकडेच झालेल्या