मोहित सोमण: आरबीआयच्या रिपोर्ट आकडेवारीचा विशेषतः आमच्या ग्राहकांच्या अनुषंगाने कुठलाही परिणाम होणार नाही असे वक्तव्य 'प्रहार' शी बोलताना उज्जीवन बँकेचे कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव नौटियाल म्हणाले आहेत. उ ज्जीवन स्मॉल फायनान्स बँक (Ujjivan Small Finance Bank Ujjivan SFN) ने आज दुपारी आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करण्याची घोषणा केली. या निमित्ताने प्रहारशी बोलताना त्यांनी वरील वक्तव्य केले. प्रामुख्याने बँकेने आपल्या स्थूल कर्ज बूक (Gross Loan Book) मध्ये आर्थिक वर्ष २०३० पर्यंत १ लाख कोटींपर्यंत वाढीचे ध्येय ठेवले होते. २०१७ साली स्थापन झालेल्या बँकेने आपल्या पोर्टफोलिओत गेल्या तीन वर्षात मोठी वाढ केली आहे.आरबीआयच्या नुकत्याच झालेल्या बुलेटिनमधील आकडेवारीनुसार, कॉ र्पोरेट कंपन्यानी बँकाऐवजी निधी उभारणीसाठी कॉर्पोरेट बाँड, तसेच भांडवली बाजार, अथवा परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारकडून अधिक कल दिल्याने पारंपरिक पद्धतीने बँकेकडून कर्ज घेण्याचे प्रमाण आकडेवारीनुसार इयर ऑन इयर बेसिसवर १७% घस रले होते 'प्रहार' ने याचाच हवाला देत आपल्या बँकेच्या ग्राहकांवर विशेषतः एमएसएमई,छोट्या उद्योजकांवर अथवा किरकोळ ग्राहकांवर बदललेल्या भूराजकीय परिस्थितीमुळे फरक पडेल का अथवा बँकेवर या गोष्टीचा आर्थिक परिणाम होईल का असा प्रश्न वि चारला असता उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचे कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव नौटियाल म्हणाले आहेत की,' दुसऱ्या स्त्रोतकडून निधी उभारणी ही बहुतांश मोठ्या व मध्यम आकाराच्या कंपन्या करत आहेत आमचा ग्राहक वर्ग वेगळा आहे. आम्ही साधारण ग्राहकांसह छोट्या आस्थापना, छोटे व्यावसायिक व एमएसएमई सेक्टरवर लक्ष केंद्रित करतो. त्यामुळे आमच्या व्यवसायावर कुठलाही थेट परिणाम होणार नाही.' असे ते म्हणाले आहेत. तसेच ५००० कोटी भागभांडवलापेक्षा अथवा कमी भां डवल असलेल्या एमएसएमई या पारंपरिक स्त्रोताचा वापर करत आहेत त्या परदेशी निधीवर अवलंबून नाही. त्यामुळे एकूणच आमच्या व्यवसायावर कुठलाही फरक पडणार नाही. मोठ्या कंपन्यांच्या खेळत्या भांडवलासाठी त्या कदाचित इतर स्त्रोतांचा वापर क रू शकतील परंतु आमच्या बँकेच्या माध्यमातून आम्ही छोट्या व मध्यम एमएसएमई भांडवली गरजेसाठी सक्षम आहोत.'
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने गेल्या काही वर्षांत आपल्या कर्ज पुस्तकात (Loan Book) मध्ये रणनीतीसह वाढ केली आहे. आर्थिक वर्ष २०१९ मध्ये बँकेच्या कर्ज वाटपाचे प्रमाण १६% होते ते आर्थिक वर्ष २०२६ (Q1FY26) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर ४६ % वाढले आहे. बँकेच्या तारण कर्ज (Secured Loan) मध्ये ६५% ते ७०% वाढ करण्याचे बँकेचे ध्येय आहे. सध्याच्या घडीला बँकेच्या पोर्टफोलिओत विना तारण कर्जाची संख्या अधिक असल्याने बँक आपल्या तारणासहित कर्ज वाटपात वाढ करण्यासाठी इच्छु क आहे असे बँकेने म्हटले. बँकेचा मुख्य ग्राहक वर्ग हा एमएसएमई, छोट्या पातळीवरील कर्ज, वाहन कर्ज, सोने तारण कर्ज, शेतकी कर्ज अश्या छोट्या रक्कमेच्या कर्जासाठी आहे. त्यामुळे पत्रकार परिषदेत बोलताना बँकेने मध्यम आकाराच्या कॉर्पोरेट कंपन्यां नाही कर्ज वाटप करण्याचे लक्ष्य ठेवले असल्याचे बँकेने म्हटले. बँकेच्या कासा ठेवी (Current and Savings Account CASA Deposits) कासा शिल्लक ९३८१ कोटी रुपये इतकी असून, ती एकूण ठेवींच्या २४.३% आहे. बँकेच्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २० ३० पर्यंत कासा ठेवींचा हिस्सा ३५% करण्याचे उद्दिष्ट आहे. या वाढीसाठी शाखांचे जाळे ७५२ वरून सुमारे ११५०पर्यंत वाढवणे, विस्तारित ग्राहकवर्गाला अधिक सेवा पुरवणे आणि आयपीओ- एएसबीए, म्युच्युअल फंड वितरण, पैसे पाठवण्याची सेवा आणि सह-ब्रँडेड क्रेडिट कार्डे यांसारखी नवी उत्पादने उपलब्ध करून देणे यांचा समावेश आहे असे बँकेने आपल्या रणनीती अंतर्गत योजना असल्याचे यावेळी स्पष्ट केले.
आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीअखेर २२.८% इतक्या भांडवली पर्याप्तता गुणोत्तराने आणि २१.२% च्या प्रथम स्तर भांडवलाने (First Step Capital) उज्जीवन बॅंकेची भांडवली स्थिती सक्षम असल्याचे बँकेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत स्पष्ट झाले आ हे. यावेळी बँकेने स्पष्ट केले आहे की,' मालमत्तेच्या पोर्टफोलिओमध्ये सुरक्षित तारणाधारित (Secured Loan) कर्जांचा वाढता वाटा जोखमींचा भार कमी करतो. त्यामुळे भांडवलाचा कार्यक्षम वापर होतो आणि तातडीने भांडवल उभारणीची आवश्यकता न राहता दीर्घकालीन वाढीसाठी भक्कम आधार मिळतो.'
कासा ठेवीच्या बाबतीत बँकेच्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२६च्या पहिल्या तिमाहीअखेर एकूण ३८६१९ कोटी रुपयांच्या ठेवींपैकी ७२% ठेवी या किरकोळ (कासा व मुदतीच्या) ठेवींमधून आहेत. कासा शिल्लक ९३८१ कोटी रुपये इतकी असून, ती एकूण ठे वींच्या २४.३% आहे. वित्त वर्ष २०३० पर्यंत कासा ठेवींचा हिस्सा ३५% करण्याचे उद्दिष्ट आहे. या वाढीसाठी शाखांचे जाळे ७५२वरून सुमारे ११५० पर्यंत वाढवणे, विस्तारित ग्राहकवर्गाला अधिक सेवा पुरवणे आणि आयपीओ-एएसबीए, म्युच्युअल फंड वितरण, पै से पाठवण्याची सेवा आणि सह-ब्रँडेड क्रेडिट कार्डे यांसारखी नवी उत्पादने उपलब्ध करून देणे यांचा समावेश आहे.'
यासह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, ऑपरेशनल खर्चात कपात करण्यासाठी आगामी काळात बँक सक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापर करणार आहे. या निमित्ताने आपल्या आर्थिक विस्तार होत असताना संरचनात्मक लक्ष (Structural Aim) तंत्र आणि डिजिट ल पाया अधिक सक्षम करणे, आकारमानाचा कर्मचारी वर्ग, व्यापक खर्चाचे नियोजन, उत्पादकतेत वाढ तसेच इतर भौतिक सुविधा विवेकीपणे उभ्या राहतील. या उपाय आणि खर्च-उत्पन्न ( Cost to Income) गुणोत्तर सुमारे ५५% आहे. कर्जमंजुरी वसुली (Coll ection) कंपनीच्या प्रक्रियेचे आर्थिक वर्ष २०३० पर्यंत मालमत्ते परतावा (आरओए) १.८ ते २.०% आणि भागभांडवला परतावा (आरओई) १६ ते १८% उद्दिष्ट बँकेने आपल्या विस्तारासाठी ठेवले आहे.बँक आपल्या विस्ताराची अंमलबजावणी वाढवत असताना, तंत्र ज्ञान/डिजिटल स्टॅकच्या चौकटीचे ऑप्टिमायझेशन (क्रियाकलापातील खर्च कपात करण्यासाठी) योग्य आकाराचे कर्मचारी संख्या,ऑपरेशनल खर्चाचे तर्कसंगतीकरण (Rationalisation उत्पादकता वाढवणे, तसेच त्यांच्या शाखा आणि इतर भौतिक पायाभूत सु विधांमधून विवेकीपणे काम सुरू करणे यावर मुख्य लक्ष केंद्रित केले जाईल असे बँकेने म्हटले आहे. यामुळे बँकेला तिचा खर्च-उत्पन्न गुणोत्तर ५५% च्या जवळ आणता येईल. हे तिच्या क्रेडिट अंडररायटिंग आणि कलेक्शन यंत्रणेसह एकत्रित केल्याने आर्थिक वर्ष ३० पर्यंत विवेकपूर्ण (Rational) लीव्हरेजद्वारे १.८%-२.०% आरओए (Return on Assets RoA) आणि १६%-१८% आरओई (Return on Equity RoE) मिळण्यास मदत होईल असे बँकेने यावेळी नमूद केले.
बँकेच्या भांडवल स्थितीबाबत माहितीनुसार २२.८% च्या सीआरएआर (Compound Annual Growth Rate CRAR) सह आणि टियर I २१.२% सह, उज्जीवन Q1FY26 पर्यंत सुस्थितीतील मजबूत भांडवलासह सक्षम असल्याचे बँकेने म्हटले आहे. कमी जो खीम वजन असलेल्या सुरक्षित कर्जांकडे मालमत्ता पुस्तकात होणारा बदल केवळ भांडवली कार्यक्षमता वाढवत नाही तर भांडवल उभारणीची तात्काळ गरज नसताना दीर्घकालीन वाढीस समर्थन देण्यासाठी जागा देखील प्रदान करतो.
बँकेच्या प्रवासाबद्दल बोलताना, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ संजीव नौटियाल म्हणाले आहेत की,'आर्थिक वर्ष ३० पर्यंत १ लाख कोटी रुपयांच्या ग्रॉस लोन बुकचा आमचा रोडमॅप हा लघु वित्त बँक बनल्यापा सून स्थापित झालेल्या पायावर उभा आहे. या कालावधीत, आम्ही आमचे ग्रॉस लोन बुक आर्थिक वर्ष २०१७ मध्ये ७,५६० कोटी रुपयांवरून वाढवून आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या तिमाहीत ३३,२८७ कोटी रुपयांपर्यंत पोहोचवले आहे.आमची रणनीती आमच्या शा खा नेटवर्कचा विस्तार ७५२ वरून सुमारे ११५० पर्यंत करणे, कर्ज बुकचा सुरक्षित हिस्सा ६५%-७०% पर्यंत वाढवणे, CASA ठेवींच्या ३५% पर्यंत वाढवणे आणि शाखा उत्पादकता दुप्पट करणे यावर केंद्रित आहे. आम्हाला २०%-२५% च्या श्रेणीत वार्षिक ग्रॉस लो न बुक वाढ अपेक्षित आहे, ज्याचे उद्दिष्ट आर्थिक वर्ष ३० मध्ये १६%-१८% RoE आणि १.८%-२.०% RoA साध्य करणे आहे. २६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ९७ लाखांहून अधिक ग्राहकांच्या वैविध्यपूर्ण आणि वाढत्या संख्येसह, आम्ही चांगले आहोत. वाढ त्या भारतातील जनसमूह, आकांक्षा आणि उदयोन्मुख समृद्ध वर्गांवर लक्ष केंद्रित करत असताना या प्राधान्यक्रमांना पूर्ण करण्यास सज्ज आहे.'
दरम्यान उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक युनिव्हर्सल बँकिंग परवान्यासाठीच्या अर्जाबाबत सकारात्मक असल्याचे बँकेने पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले आहे. व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव नौटियाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, डिसेंबरपर्यंत रिझर्व्ह बँकेकडून निर्णय मिळण्याची त्यांना आशा आहे.