केसात गजरा माळला म्हणून अभिनेत्री नव्या नायरला १.१४ लाखांचा दंड!

मुंबई: लोकप्रिय मल्याळम अभिनेत्री नव्या नायर हिला ऑस्ट्रेलियात एका साध्या चुकीमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. ओणम सणासाठी ऑस्ट्रेलियाला गेलेल्या नव्याला तिच्या हँडबॅगमध्ये सापडलेल्या चमेलीच्या फुलांमुळे मेलबर्न विमानतळावर तब्बल १,९८० ऑस्ट्रेलियन डॉलर्स (सुमारे १.१४ लाख रुपये)चा दंड ठोठावण्यात आला आहे.


नव्याने दिलेल्या माहितीनुसार, तिच्या वडिलांनी कोची विमानतळावरून तिच्यासाठी चमेलीचा गजरा विकत घेतला होता. तिने त्यातील एक भाग केसात माळला, पण तो सुकल्यावर दुसरा भाग एका प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून हँडबॅगमध्ये घेतला. ऑस्ट्रेलियाच्या नियमांनुसार, जैविक वस्तू किंवा वनस्पती सामग्री आणण्यास परवानगी नाही, याची तिला कल्पना नव्हती.


विमानतळावरील तपासणीदरम्यान ऑस्ट्रेलियन सीमा सुरक्षा दलाला तिच्या हँडबॅगमध्ये हा गजरा सापडला. यामुळे तिला लगेच दंड ठोठावण्यात आला. "मला माझी चूक कळली, पण ती जाणूनबुजून केलेली नव्हती. वडिलांनी दिलेल्या गजऱ्यामुळे मला दंड भरावा लागला, याचे वाईट वाटते," असे नव्याने सांगितले.


ऑस्ट्रेलियाच्या नियमांनुसार, रोग, कीटक किंवा जैविक असंतुलन टाळण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या वनस्पती, फुले किंवा बियांसारख्या वस्तू सरकारी परवानगीशिवाय देशात आणण्यास मनाई आहे. त्यामुळेच परदेशात प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी ही घटना एक महत्त्वाचा धडा ठरली आहे.

Comments
Add Comment

Bomb Threat : 'बॉम्ब'च्या धमकीने इंडिगोच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

मुंबई : हैदराबादहून कुवैतकडे जाणाऱ्या इंडिगो (IndiGo) एअरलाईन्सच्या एका विमानाला धमकीचा ई-मेल आल्यानंतर मंगळवारी

डिजिटल अरेस्ट घोटाळ्यांची चौकशी सीबीआयकडे द्या: सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयाने सायबर गुन्ह्यांशी संबंधित 'डिजिटल अरेस्ट' प्रकरणांच्या

केरळच्या मुख्यमंत्र्यांना ईडीची नोटीस

तिरुवनंतपुरम (वृत्तसंस्था): तिरुवनंतपुरममध्ये केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्यावर नव्या आरोपांची

पाणीपुरी खाल्ली आणि वाचा गेली, महिलेचा जबडा सरकला

ओरैया : उत्तर प्रदेशमधील औरेया जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. पाणीपुरी खाल्ल्यामुळे एका महिलेची वाचा गेली.

दिल्लीसह अनेक प्रमुख विमानतळांवरील जीपीएस स्पूफिंगच्या डेटामध्ये छेडछाड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था ): दिल्लीसह अनेक प्रमुख विमानतळांवरील जीपीएस स्पूफिंगच्या डेटामध्ये छेडछाड करण्यात

Para-athlete...लग्नातील किरकोळ वादातून हरियाणातील पॅरा-अ‍ॅथलिटची निर्घृण हत्या

हरियाणा : रोहतक येथे एका राष्ट्रीय स्तरावरील पॅरा-अ‍ॅथलिटवर झालेल्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याने परिसरात