Pune Crime: गणेश विसर्जनच्या पूर्वसंध्येला पुण्यात तरुणाची गोळ्या झाडून हत्या, सीसीटीव्ही फुटेजमध्ये आलं समोर

पुणे: गणेश विसर्जनच्या पूर्वसंध्येला पुण्यात धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील नाना पेठेत आयुष (गोविंदा) गणेश कोमकर (Govinda Komkar) या तरूनवर गोळीबार करत त्याची हत्या करण्यात आली आहे. आयुष कोमकर क्लासवरुन परत येताच त्याच्यावर हल्लेखोराकडून गोळ्या झाडल्या गेल्या, ज्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून, हल्लेखोरांना पकडण्यासाठी पुणे पोलिस अॅक्शन मोड वर आहेत.

याबद्दल अधिकृत माहिती अशी की, रात्री पावणेआठच्या सुमाराला आयुष कोमकर या युवकाची क्लासमधून परत आल्यावर अज्ञातांनी त्याच्यावर गोळ्या झाडत हत्या केल्याची माहिती गुन्हे शाखा उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिली आहे. आयुष कोमकरवर गोळ्या झाडल्यानंतर त्याला ससून रुग्णालयात नेण्यात आलं. जिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. गणेश कोमकर हा वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी होता. तो वनराज आंदेकरचा भाचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणी आरोपीच्या शोधासाठी पोलिसांच्या सहा टीम रवाना करण्यात आल्या आहेत. याबाबत काही सुगावे लागल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे.
Comments
Add Comment

पुण्यातील सायकल स्पर्धेनिमित्त सिंहगड किल्ल्यावर जाणारी वाहतूक पुढील ३ दिवस बंद, पर्यटकांना पायी मार्ग वापरण्याचा पर्याय

पुणे: पुण्यातील सिंहगड किल्ला नेहमीच पर्यटकांचे आकर्षण केंद्र राहिला आहे. मात्र आजपासून पुढील ३ दिवस सिंहगड

‘युनेस्को’च्या वर्ल्ड बुक कॅपिटल या दर्जासाठी पुण्याची दावेदारी

पुणे : ‘युनेस्को’च्या ‘जागतिक पुस्तक राजधानी’ (वर्ल्ड बुक कॅपिटल) या दर्जासाठी राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात! ट्रक चालकाचा ताबा सुटला अन् बॅरियर ओलांडत थेट चारचाकीवर उलटला

मुंबई: पुणे–मुंबई द्रुतगती महामार्गावर आज पहाटे एक भीषण अपघात झाला आहे. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील

ताडोबा व्याघ्र प्रकल्प परिसरातील ८०० एकर जागेचे होणार पर्यावरणीय पुनरुज्जीवन

मुंबई : विदर्भातील विविध विकास कामांबरोबरच तेथील जंगल संपदा राखण्यासाठी व त्याच्या वाढीसाठी मुख्यमंत्री

नागपूरमध्ये अतिविशेषोपचार वैद्यकीय अभ्यासक्रमांसह ६१५ खाटांचे रुग्णालय

नागपूर : नागपूर येथे वैद्यकीय उपचाराच्या दर्जेदार सुविधा रुग्णांना उपलब्ध व्हाव्यात आणि वैद्यकीय

शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी एसटीची हेल्पलाईन

धाराशिव (प्रतिनिधी) - शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी - विद्यार्थिनींना घरातून शाळेला जाताना अथवा शाळेतून घरी