Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीनिमित्त नवी मुंबईत कडक सुरक्षा व्यवस्था, निर्भया पथक आणि राखीव पोलिस तैनात

नवी मुंबई: अनंत चतुर्दशीनिमित्त नवी मुंबई पोलिसांनी गणेश मूर्ती विसर्जनानिमित्त कडक सुरक्षा व्यवस्था जाहीर केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात एक हजाराहून अधिक पोलिस अधिकारी आणि कर्मचारी तैनात केले गेले आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया पथक आणि राखीव पोलिस पथक देखील मैदानावर तैनात आहेत.


शुक्रवारी रात्रीपासूनच नवी मुंबई येथील सुरक्षा व्यवस्था प्रभावी करण्यात आली. अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला विसर्जनादरम्यान आवश्यक तयारी आणि मार्गदर्शक तत्त्वांवर पोलिस उपायुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली.


सोसायटी आणि सार्वजनिक मंडळ तसेच घरगुती गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी शहरात सुमारे ४०० ठिकाणे तयार ठेवण्यात  आली आहेत. निर्भया पथकांसह प्रत्येक पोलिस ठाण्याअंतर्गत दहा पथके सतत देखरेखीसाठी हजर असून, त्याच्यासोबतील दंगल विरोधी वाहन पथक आणि राखीव पोलिस दल देखील मदतीसाठी तैनात करण्यात आली आहेत. वाशीमध्ये विशेष १३२ आणि कोपरखैरणेमध्ये २२५ पोलिस कर्तव्यदक्षतेसाठी सज्ज आहेत.


गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान ध्वनी प्रदूषण, विचित्र नृत्य, मद्यपान इत्यादी गैरप्रकारांवर तातडीने कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. पोलिसांच्या सूचनांचे पालन करून जनतेला गणेश मूर्तींना शांततेत निरोप देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाहतूक व्यवस्थापनासाठी देखील विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. ६ फुटांपेक्षा मोठ्या मूर्तींचे विसर्जन नैसर्गिक तलावांमध्ये केले जाईल.


शहरातील २२ नैसर्गिक आणि १४३ कृत्रिम तलावांवर विसर्जन होईल. ब्लू डायमंड चौक, कोपरी पाम बीच आणि इतर प्रमुख मार्गांवर वाहनांसाठी तात्पुरते निर्बंध लादण्यात आले आहेत. नवी मुंबईत सुमारे ३०० वाहतूक पोलिस कर्तव्यावर असतील.


नवी मुंबई महानगरपालिकेने १६५ विसर्जन स्थळांवर सुरक्षा आणि सुव्यवस्था सुनिश्चित केली आहे. २२ नैसर्गिक आणि १४३ कृत्रिम तलावांवर जीवरक्षक, स्वयंसेवक आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी तैनात केले जातील. या व्यवस्थेअंतर्गत, गणेश विसर्जन सोहळा सुरक्षित आणि पद्धतशीरपणे पार पाडण्यावर भर देण्यात आला आहे. पोलिस आणि महानगरपालिकेचे उद्दिष्ट आहे की अनंत चतुर्दशीच्या दिवशी नागरिकांनी कोणताही अनुचित प्रकार किंवा अपघात न होता आनंदाने गणेश मूर्तींचे विसर्जन करावे.

Comments
Add Comment

“चहाशी माझा संबंध तुम्हाला माहिती आहे, पण आज मी...” मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा खास खुलासा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासीयांशी

MPSC 2026 चे वेळापत्रक जाहीर, सविस्तर वाचा

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

मुंबईजवळ ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, १४ कोटींची ड्रग्स जप्त

वसई : वसईच्या पेल्हार येथे मुंबई पोलिसांच्या झोन सहामधील अँटीनार्कॉटिक्स सेल आणि टिळक नगर पोलिसांनी मिळून

गूगल पे, पेटीएम आणि फोन पे ला टक्कर देणार स्वदेशी झोहो पे

मुंबई : बिझनेस सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात आपली मजबूत ओळख निर्माण केल्यानंतर आता झोहो कंपनी डिजिटल पेमेंटच्या

मुंबई मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, गुंदवलीवरून थेट गाठता येणार मिरा रोड

मुंबई : मुंबईतील मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सध्या गुंदवलीवरून निघालेली मेट्रो दहिसर पूर्व

डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचा फलटण दौरा

सातारा: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना अटक झाली आहे.