Mega Block News: रविवारी माटुंगा - मुलुंड अप व डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक

मुंबई:  मध्य रेल्वे, मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी उपनगरी विभागांवर रविवार, ०७.०९.२०२५ रोजी माटुंगा – मुलुंड अप व डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक परीचालीत करण्यात आला आहे. माटुंगा – मुलुंड अप व डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.०५ वाजेपासून दुपारी १५.४५ वाजेपर्यंत हे काम सुरू राहणार आहे. त्यामुळे, याची तपशीलवार माहिती जाणून घ्या.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून १०.३६ वाजेपासून १५.१० वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद गाड्या माटुंगा स्थानकापासून मुलुंड दरम्यान डाउन धिम्या मार्गावर वळविण्यात येतील व त्यांच्या निर्धारित थांब्यांवर थांबून या गाड्या त्यांच्या गंतव्यस्थानावर अंदाजे १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाण्यानंतरच्या जलद गाड्या मुलुंड स्थानकापासून पुन्हा डाउन जलद मार्गावर वळविण्यात येतील.

ठाणे येथून ११.०३ वाजल्यापासून दुपारी १५.३८ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप जलद गाड्या मुलुंड स्थानकापासून माटुंगा दरम्यान अप धिम्या मार्गावर वळविण्यात येतील व त्यांच्या निर्धारित थांब्यांवर थांबून या गाड्या माटुंगा स्थानकापासून पुन्हा अप जलद मार्गावर वळविण्यात येऊन गंतव्यस्थानावर अंदाजे १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

पनवेल – वाशी अप व डाउन हार्बर मार्गावर ११.०५ वाजल्यापासून १६.०५ वाजेपर्यंत (पोर्ट लाईन वगळून)

पनवेल येथून १०.३३ वाजल्यापासून १५.४९ वाजेपर्यंत सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गवरील गाड्या तसेच

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०९.४५ वाजल्यापासून १५.१२ वाजेपर्यंत सुटणाऱ्या पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील.

पनवेल येथून ११.०२ वाजल्यापासून १५.५३ वाजेपर्यंत सुटणाऱ्या व ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्स-हार्बर मार्गावरील गाड्या तसेच

ठाणे येथून १०.०१ वाजल्यापासून १५.२० वाजेपर्यंत सुटणाऱ्या पनवेलकडे जाणाऱ्या डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील.

ब्लॉकच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि वाशी दरम्यान विशेष लोकल गाड्या चालविण्यात येतील.

ब्लॉकच्या कालावधीत ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर मार्गावर सेवा उपलब्ध राहील.

ब्लॉकच्या कालावधीत पोर्ट मार्गावर सेवा उपलब्ध राहील.
Comments
Add Comment

Santacruz Chembur Link Road Phase 2 : सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज खुला; वाकोला-बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स प्रवास होणार अधिक वेगवान

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज,

Radhakrishna Vikhe Patil : धरण क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विकासासाठी सर्वेक्षण करणार

मुंबई : जलसंपदा विभाग आता मत्स्य व्यवसाय विकास विभागाशी सहक

Bike Rider Riddhi Thakkar: बाईक राइडिंगसाठी गेली, पण काळाने घात केला; मुंबईच्या 24 वर्षीय तरुणीचा भीषण अपघाती मृत्यू

मुंबई :  मुंबईतील (Mumbai) कांदिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात

Weather Update : महाराष्ट्रातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : राज्यात श्रावणाचं आगमन धो धो पावसानं होणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागांत गुरुवार १३ ते शनिवार १५ ऑगस्ट

Nitesh Rane : मच्छीमार बांधवांसाठी आधुनिक व सर्व सुविधांयुक्त वास्तू उभारणार – मंत्री नितेश राणे

· मरोळ मच्छी मार्केटच्या विकासकामांना गती देणार मुंबई, दि. 12: मुंबईतील मच्छीमार बांधवांसाठी महत्त्वपूर्ण

Water Metro : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी; वॉटर मेट्रोसह विविध प्रकल्पांना मिळणार गती

मुंबई : महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने अनेक