रणबीर कपूरची गुंतवणूक असलेला Prime Focus शेअर आज १०% उसळत अप्पर सर्किटवर

मोहित सोमण: अभिनेता रणबीर कपूरची गुंतवणूक असलेल्या प्राईम फोकस (Prime Focus Limited) कंपनीचा शेअर आज १०% उसळला. त्यामुळे आज शेअर ५२ आठवड्यातील उच्चांकी (All time High) वर पोहोचला आहे. शेअर मधील या मोठ्या का मगिरीमुळे शेअर आज अप्पर सर्किटवर पोहोचला आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या शेअर्समध्ये मोठा ब्लॉक डील आज शेअर बाजारातील सुरूवातीला झाला. ब्लॉक डील विंडोमार्फत कंपनीचे १.५३% भागभांडवल (Stake) खरेदी एक हाती खरेदी केल्यामुळे शेअर अप्पर सर्किटवर पोहोचला आहे.


प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या ब्लॉक डील मध्ये खरेदी करणाऱ्या खरेदीदार विक्रेता यांची अद्याप माहिती समोर आली नाही. त्यामुळे मागील आठवड्यातील शुक्रवारप्रमाणे आजही सलग दुसऱ्यांदा शुक्रवारी कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. स काळी सत्र सुरू झाल्यावरच कंपनीचा शेअर उसळल्याने बीएसईत (Bombay Stock Exchange BSE) मध्ये १५८.१० रूपये प्रति शेअरवर पोहोचला आहे. याशिवाय रॅलीचे महत्वाचे कारण म्हणजे ब्लॉक डीलनंतर कंपनीच्या शेअर विक्रीतील व्हॉल्यूममध्ये वाढ झाली.


प्राईम फोकस ही मिडिया एंटरटेनमेंट क्षेत्रातील जुनी कंपनी असून १९९७ साली नमित मल्होत्रा यांनी कंपनीची स्थापना केली होती. २०१४ साली या कंपनीने व्हिजुअल इफेक्ट कंपनी डीएनईजी (Double Negative DNEG) कंपनीचे अधिग्रहण केले होते. उपल ब्ध माहितीनुसार, स्वतः नमित मल्होत्रा यांच्याकडे कंपनीचे एकूण १.४९ कोटी शेअर म्हणजेच जवळपास कंपनीचा एकूण ४.७१% हिस्सा मल्होत्रा यांच्याकडे आहे. गेल्या महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये विशेष वाढ झालेली नव्हती.


मात्र गेल्या तीन महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये ३६% वाढ झाली असून सहा महिन्यांत कंपनीचा शेअर ६०% पेक्षा अधिक प्रमाणात उसळला होता. सकाळी ११.०२ वाजता कंपनीचा शेअर ९.९९% उसळत १५८.३७ रूपयांवर व्यवहार करत होता.गेल्या तीन व र्षांत या शेअरमध्ये ९५.१९% वाढ झाली आहे, जी याच कालावधीत सेन्सेक्सच्या ३६.५०% वाढीपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहे.


जुलैमध्ये 'रामायण' चित्रपटाचा बहुप्रतिक्षित टीझर प्रदर्शित झाल्यानंतर गुंतवणूकदारांचे लक्ष प्राइम फोकसच्या शेअर्सकडे लागले होते. अनेक अहवालांनुसार, रणबीर कपूरने प्राइम फोकस स्टुडिओमध्ये १५-२० कोटी रुपये गुंतवले आहेत.याबाबत कपूर अथवा कं पनीने यावर पुष्टी केलेली नाही. कंपनीने यापूर्वी ४६ कोटींहून अधिक शेअर्सच्या प्रेफरन्सियल इश्यूला मंजुरी दिली होती. माहितीनुसार अभिनेता रणबीर कपूर हा प्रस्तावित गुंतवणूकदार होता.

Comments
Add Comment

आई-वडील, सासू-सास-यांसोबत वेळ घालवण्यासाठी मिळणार रजा!

गुवाहाटी: पालकांसोबत आणि सासरच्यांसोबत वेळ घालवण्यासाठी आसाम सरकारने नोव्हेंबर महिन्यात कर्मचाऱ्यांना २

राज्याचा परकीय गुंतवणुकीचा आलेख घसरला

कर्नाटकचा पहिला नंबर, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी मुंबई : परकीय थेट गुंतवणूक (एफडीआय) आकर्षित करण्यात नेहमीच

अंत्ययात्रेची तयारी झाली पण खोकल्याने वाचला तरुणाचा जीव!

नाशिक : अपघातामध्ये जखमी झालेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तरुण मृत झाल्याचा माहितीवरून परिवाराने

‘त्या’जाहिरातीनंतर वाद; यामागे 'गजवा-ए-हिंद' : भाजपचा आरोप

हलाल लाइफस्टाइल टाऊनशिपची जाहिरात विकासकाने हटवली नेरळ : नेरळ येथे एका गृहनिर्माण प्रकल्पाच्या जाहिरातीत हलाल

नवी मुंबईत सिडकोकडून २२ हजार घरांची जम्बो लॉटरी

मुंबई : म्हाडाप्रमाणे औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) कार्य करते. नवी मुंबईत सर्वसामान्य नागरिकांना हक्काचे घर

नेपाळमध्ये फेसबुक आणि यूट्यूबसह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी

काठमांडू : नेपाळमध्ये फेसबुक,व्हॉट्सअॅप आणि एक्ससह २६ सोशल मीडिया साइट्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.