म्हाडा नाशिक मंडळातर्फे ४७८ सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर

ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रियेला सुरुवात


मुंबई : नाशिकमध्ये घर शोधत असणाऱ्यांना आता सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) नाशिक शहर परिसरातील गंगापूर शिवार, देवळाली शिवार, पाथर्डी शिवार, म्हसरुळ शिवार, नाशिक शिवार व आगर टाकळी शिवार २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील विविध गृहप्रकल्पांतर्गत सोडत जाहीर केली आहे. ४७८ सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडतीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल (भा.प्र.से.) यांच्या हस्ते आज गुरुवारी 'गो-लाईव्ह' कार्यक्रमांतर्गत करण्यात आला.

वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या कार्यक्रमाला मंडळाचे मुख्य अधिकारी शिवकुमार आवळकंठे, मुख्य अभियंता धीरजकुमार पंदिरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी संजीव जयस्वाल यांनी नाशिक मंडळाच्या सोडतीत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांना आवाहन केले की, म्हाडाच्या सोडतीसाठी तयार करण्यात आलेल्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरूनच व म्हाडा लॉटरी ॲपवरुन इच्छुक अर्जदारांनी अर्ज करावा. नाशिक मंडळाची ही या वर्षातील तिसरी सोडत असून यापूर्वी मंडळाने ३७९ सदनिका, १०५ दुकाने आणि ३२ भूखंडांचे यशस्वी वितरण केले असल्याचेही जयस्वाल यांनी सांगितले.

सोडतीसाठी दिनांक ०४ सप्टेंबर, २०२५ रोजी दुपारी ०१.०० वाजेपासून ऑनलाईन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली असून, दिनांक ०३ ऑक्टोबर, २०२५ रोजी रात्री ११. ५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करता येणार आहे. दिनांक ०४ ऑक्टोबर, २०२५ रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS/NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांच्या अंतिम यादीची प्रसिद्धी दिनांक १७ ऑक्टोबर, २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर केली जाणार आहे. सोडतीचा दिनांक व स्थळ संकेतस्थळावर कळविले जाणार आहे.

नाशिक मंडळाच्या या सोडतीत २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गतच्या एकूण ४७८ सदनिकांचा समावेश असून या सर्व सदनिका अल्प उत्पन्न गटातील अर्जदारांसाठी उपलब्ध आहेत. सोडतीअंतर्गत देवळाली शिवारात २२ सदनिका, गंगापूर शिवारात ५० सदनिका, पाथर्डी शिवार ६४ सदनिका, म्हसरुळ शिवार १९६ सदनिका, नाशिक शिवार १४ सदनिका, आगर टाकळी शिवार १३२ सदनिका तर नाशिक शिवारात १४ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
Comments
Add Comment

'असे हलके वागणारे माझे नाहीत!' गोंधळ घालणाऱ्या समर्थकांवर पंकजा मुंडे कडाडल्या

भगवान गडाचा वारसा हिरावून घेणाऱ्यांवर पंकजा मुंडेंचा हल्लाबोल बीड:

'जातीपातीचे राक्षस' संपवा! दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंचं आक्रमक आणि भावनिक आवाहन

'मी गोपीनाथ मुंडेंची बेटी आहे,' म्हणत पंकजा मुंडेंनी जागवल्या आठवणी जा

RSS : कोण शत्रू, कोण मित्र ? हे पहलगामच्या घटनेने शिकवले'

नागपूर : ऐतिहासिक रेशीमबाग मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव झाला. या उत्सवात बोलताना

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव, माजी राष्ट्रपतींची उपस्थिती

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने यंदा नागपूरमध्ये भव्य विजयादशमी

दुकाने, हॉटेल्ससह इतर आस्थापने २४ तास खुली राहणार!

मुंबई : राज्यभरातील दुकाने २४ तास खुली ठेवण्यास परवानगी असणार आहे. राज्यातील महायुती सरकारने हा निर्णय घेतला आहे.

शिंदेंचं एक पाऊल मागे! निवडणुकीत शिवसेना धाकटा भाऊ होणार, शिंदेंना कमी जागा मिळणार?

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे डावपेच आणि रणनीतीमुळे एकनाथ शिंदे पुन्हा एकदा बॅकफूटवर गेलेत.