ISPL 2025 : ISPL चं ऐतिहासिक पाऊल : टेनिस-बॉल क्रिकेटसाठी राष्ट्रीय स्पर्धात्मक आराखडा आणि झोनल पॅनल रचना लागू

मुंबई : भारतातील टेनिस-बॉल क्रिकेटला व्यावसायिक रूप देणाऱ्या इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (ISPL) ने मोठा निर्णय घेतला आहे. देशभरातील स्थानिक पातळीवरील क्रिकेटला थेट राष्ट्रीय स्तराशी जोडण्यासाठी ISPL ने लीग संलग्नता मॉडेल आणि झोनल पॅनल स्ट्रक्चर जाहीर केलं आहे. या निर्णयामुळे क्रिकेटपटूंना गल्लीतल्या मैदानापासून ते राष्ट्रीय मान्यतेपर्यंत पोहोचण्याचा स्पष्ट मार्ग उपलब्ध होणार आहे.

झोनल पॅनलची रचना


या नवीन मॉडेलनुसार देश आठ झोनमध्ये विभागला जाणार असून प्रत्येक झोनमध्ये ISPL मान्यताप्राप्त पॅनल (किंवा फेडरेशन) काम पाहणार आहे. हे पॅनल्स त्या-त्या प्रदेशातील स्पर्धांचं मार्गदर्शन, खेळाडूंचं निरीक्षण, विकास आणि निवड प्रक्रिया सांभाळतील.

अशी असेल झोनल विभागणी


पश्चिम (माझी मुंबई): महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश

उत्तर (स्रीनगर के वीर): जम्मू-कश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा

पूर्व (टायगर्स ऑफ कोलकाता): पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार आणि ईशान्येकडील सर्व राज्यं

दक्षिण-पूर्व (चेन्नई सिंगम्स): तमिळनाडू, किनारी आंध्र प्रदेश, पुदुच्चेरी

दक्षिण-मध्य (फाल्कन रायझर्स हैदराबाद): तेलंगणा, आंध्र प्रदेश (मध्य), छत्तीसगड

दक्षिण-पश्चिम (बंगलोर स्ट्रायकर्स): कर्नाटक, केरळ

उत्तर-पश्चिम (अहमदाबाद): गुजरात, राजस्थान

मध्य-उत्तर (दिल्ली): दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंड


स्पर्धा व बक्षिसं


आता देशभरात होणाऱ्या स्पर्धांना ISPL कडून संलग्नता मिळवता येणार आहे. संलग्न स्पर्धांना ISPL ब्रँडिंग, स्काऊटिंग नेटवर्क आणि खेळाडू विकासाची संधी मिळेल. विजेत्या संघाला थेट ₹५ लाखाचं बक्षीस मिळणार तर उपविजेत्या संघाला ₹३ लाखाचं बक्षीस मिळणार आहे. तसेच प्रत्येक खेळाडूच्या कामगिरीचं मूल्यमापन ठराविक पॉइंट सिस्टीमनुसार केलं जाईल. Season 4 पासून ISPL लिलावासाठी फक्त पॉइंट्सच्या आधारेच खेळाडू निवडले जाणार असून थेट नोंदणीची प्रथा बंद होईल.

दिग्गजांचं मत काय?


सचिन तेंडुलकर (ISPL कोर कमिटी सदस्य) : “गावागावातून येणारी प्रतिभा शोधणं हीच खरी ताकद आहे. ISPL च्या या आराखड्यामुळे प्रत्येक खेळाडूला मोठ्या स्तरावर पोहोचण्याची संधी मिळेल.”

आशीष शेलार : “ISPL चं झोनल मॉडेल पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि प्रादेशिक विकासाला चालना देणारं आहे.”

सुरज समत (ISPL कमिशनर) : “या नव्या आराखड्यामुळे टेनिस-बॉल क्रिकेटचं भवितव्य अधिक मजबूत होईल.”

मिनल अमोल काले : “ही फक्त एक लीग नाही, तर गवताच्या पातळीवरील क्रिकेटपटूंना सक्षम करणारी चळवळ आहे.”

वाढतं यश आणि स्टार फ्रँचायझी


सध्या ISPL मध्ये आठ फ्रँचायझी टीम्स आहेत. त्यात अमिताभ बच्चन (माझी मुंबई), अक्षय कुमार (स्रीनगर के वीर), सैफ-करीना (टायगर्स ऑफ कोलकाता), सूर्या (चेन्नई सिंगम्स), ऋतिक रोशन (बंगलोर स्ट्रायकर्स), रामचरण (फाल्कन रायझर्स हैदराबाद), सलमान खान, अजय देवगण आणि इतर बॉलिवूड सुपरस्टार्सचा समावेश आहे. ISPL चं आकर्षण एवढं वाढलं आहे की सीझन २ मध्ये ३० लाख नोंदणी झाल्यानंतर सीझन ३ साठी तब्बल ४२ लाखांपेक्षा जास्त नोंदणी झाल्या आहेत.
Comments
Add Comment

संघाला तारणाऱ्या ऋतुराज गायकवाडचे द्विशतक थोडक्यात हुकले

श्रेयस अय्यर २५ तर, जैस्वाल अवघ्या चार धावांवर बाद मुंबई : दुलीप ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धा सध्या सुरू असून

आयपीएल अध्यक्षपदासाठी संजय नाईक आणि राजीव शुक्ला यांच्यात चुरस!

मुंबई (प्रतिनिधी) : बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा या महिन्याच्या अखेरीस होत आहे. बीसीसीआय आणि आयपीएल

आशिया कपमध्ये कोण असणार भारताचा स्पॉन्सरर ?

मुंबई : आशिया कप स्पर्धेपूर्वी संसदेत एक बिल पास झाले आणि बीसीसीआयच्या जर्सी स्पॉन्सरला गाशा गुंडाळावा लागला.

आर. प्रज्ञानंद फिडे क्लासिकल बुद्धिबळ क्रमवारीत चौथ्या स्थानी

मुंबई  : सिंकफिल्ड बुद्धिबळ करंडकात दुसरे स्थान मिळवलेल्या भारताच्या आर. प्रज्ञानंद याने फिडे क्लासिकल

रोहित शर्माने घटविले तब्बल २० किलो वजन

मुंबई : रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून, वनडे क्रिकेटमध्ये सक्रिय

टी-२० वर्ल्डकपआधी ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने अचानक केली निवृत्तीची घोषणा

मुंबई: ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटला रामराम ठोकला आहे.