मुंबई : मुंबईत दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात आणि भक्तिभावाने साजरा केला जात आहे. उद्या, शनिवार ६ सप्टेंबर रोजी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी शहरभरात गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. विशेषत: स्वराज्यभूमी गिरगाव चौपाटी येथे भव्य विसर्जन मिरवणुका निघणार असून, लालबागचा राजा तसेच इतर मोठ्या मंडळांच्या गणपती मूर्तींचं विसर्जन येथेच पार पाडलं जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांनी शहरातील वाहतूक व्यवस्थेत व्यापक बदल केले आहेत. भायखळा, नागपाडा, काळबादेवी आणि डी. बी. मार्ग वाहतूक विभागांतर्गत येणाऱ्या रस्त्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान रस्ते मोकळे ठेवण्यासाठी तात्पुरती वाहतूक व्यवस्था लागू केली गेली आहे. गर्दीचे प्रमाण लक्षात घेता काही मार्गांवर वाहतूक वळवण्यात येणार आहे, तर काही ठिकाणी पार्किंगला पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे की, विसर्जनाच्या दिवशी शक्यतो सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा आणि वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सूचनांचं पालन करावं. यामुळे विसर्जन सोहळा सुरळीत पार पडेल आणि नागरिकांचा त्रासही कमी होईल.
नागरिकांसाठी BEST आणि लोकल ट्रेनचा पर्याय
मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच शनिवार, ६ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून पुढील दिवशी पहाटे ६ वाजेपर्यंत शहरातील अनेक महत्त्वाचे रस्ते पूर्णपणे बंद राहणार आहेत. विसर्जन मिरवणुका आणि गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात नागरिकांची गैरसोय कमी करण्यासाठी विशेष वाहतूक उपाययोजना आखण्यात आली आहे. मुंबईकरांना खासगी वाहनांऐवजी जास्तीत जास्त प्रमाणात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. BEST बससेवा आणि लोकल ट्रेन यांचा वापर नागरिकांसाठी सोयीस्कर ठरेल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. विशेष म्हणजे, विसर्जनाच्या दिवशी मुंबईकरांना सोयीसाठी मध्य, हार्बर आणि पश्चिम अशा तिन्ही मार्गांवरील लोकल ट्रेन सेवा रात्रभर अखंड सुरू राहणार आहे. यामुळे मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या भाविकांना आणि अन्य नागरिकांना घरी परतण्यास कोणताही अडथळा येणार नाही.
सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार अखेर व्हायरल झालेल्या वादग्रस्त व्हिडिओवर बोलले आहेत. हा प्रकार सोलापूर ...
गणेश विसर्जन काळात मुंबईत जड वाहनांना बंदी
गणेश विसर्जन मिरवणुकांमुळे होणारी प्रचंड गर्दी आणि वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी वाहतूक विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ६ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजल्यापासून ते ७ सप्टेंबरच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत (संपूर्ण ४१ तास) बृहन्मुंबई परिसरात अवजड वाहनांना प्रवेश पूर्णपणे बंद राहणार आहे.
या निर्बंधामुळे मोठ्या ट्रक, कंटेनर, ट्रेलर आणि इतर जड वाहनांना शहरात प्रवेश मिळणार नाही. यामुळे विसर्जन मार्गांवरील वाहतुकीची गती सुरळीत राहील आणि मिरवणुका तसेच भाविकांच्या हालचालीला अडथळा येणार नाही, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, उत्तर मुंबईतून दक्षिण मुंबईकडे किंवा दक्षिण मुंबईतून उत्तर मुंबईकडे प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना पर्यायी मार्ग म्हणून कोस्टल रोड (धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मार्ग) वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. यामुळे मुख्य रस्त्यांवरील ताण कमी होईल आणि वाहतुकीचं नियोजन अधिक प्रभावी ठरेल.
वाहनचालकांनी फ्री वे (विलासराव देशमुख पूर्व मुक्त मार्ग) / अटल सेतु मार्गे प्रवास करताना पुढील मार्गाचा अवलंब करावा
फ्री वे (विलासराव देशमुख पूर्व मुक्त मार्ग) / अटल सेतु वरून प्रवास सुरू करा
पी. डिमेलो मार्ग → कल्पना जंक्शन (उजवे वळण)
भाटीया बाग जंक्शन (उजवे वळण) → सी.एस.एम.टी. जंक्शन (डावे वळण)
महापालिका मार्ग → मेट्रो जंक्शन (उजवे वळण)
श्यामलदास मार्ग → श्यामलदास जंक्शन (डावे वळण)
प्रिंसेस स्ट्रीट → कोस्टल रोड (धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मार्ग) उत्तर वाहिनी
उत्तर मुंबई → दक्षिण मुंबई (फ्री वे / अटल सेतु मार्गे)
कोस्टल रोड दक्षिण वाहिनी → प्रिंसेस स्ट्रीट (उजवे वळण)
श्यामलदास जंक्शन → श्यामलदास मार्ग
मेट्रो जंक्शन (डावे वळण) → महापालिका मार्ग
सी.एस.एम.टी. जंक्शन (उजवे वळण) → भाटीया बाग जंक्शन (डावे वळण)
कल्पना जंक्शन → पी. डिमेलो मार्ग
फ्री वे (विलासराव देशमुख पूर्व मुक्त मार्ग) / अटल सेतु दक्षिण वाहिनी
प्रमुख विसर्जन स्थळे (मुंबई)
गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क चौपाटी, जुहू चौपाटी, मालाड मालवणी टी-जंक्शन, पवई (गणेश घाट)
कुलाबा वाहतूक विभागातील बंद असलेले रस्ते
१. नाथालाल पारेख मार्ग
भाई बंदरकर चौक (बधवार पार्क जंक्शन) → सय्यद मोहम्मद जमादार चौक (इंदु क्लिनिक जंक्शन) पर्यंतचा मार्ग वाहतुकीकरीतादोन्ही वाहिन्यांवर बंद राहील.
पर्यायी मार्ग : भाई बंदरकर चौक → कॅ. प्रकाश पेठे मार्ग → झुलेलाल मंदिर चौक (पांडे लेन जंक्शन) → पुढे इच्छित स्थळ
कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग
संत गाडगे महाराज चौक (धनपाल नाका) → झुलेलाल मंदिर चौक (पांडे लेन जंक्शन) पर्यंतचा मार्ग वाहतुकीकरीतादोन्ही वाहिन्यांवर बंद राहील.
पर्यायी मार्ग : संत गाडगे महाराज चौक → साधु टि.एल. वासवानी मार्ग → वर्ल्ड ट्रेड सेंटर → उजवे वळण मेकर टॉवर → उजवे वळण जी.डी. सोमानी मार्ग → झुलेलाल मंदिर चौक (पांडे लेन जंक्शन) → पुढे इच्छित स्थळ
मरीन ड्राईव्ह वाहतूक विभाग
१. नेताजी सुभाषचंद्र बस मार्ग
उत्तर संभाजी महाराज वाहिनीवरील सागरी वाहतूक आवश्यकतेनुसार वळविण्यात येईल.
पर्यायी मार्ग : इस्लाम जिमखाना → छत्रपती मार्ग → कोस्टल रोड मार्गे वाहतूक वळविली जाईल.
आझाद मैदान वाहतूक विभाग
१. महानगरपालिका मार्ग
सी.एस.एम.टी. जंक्शन → वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्शन) पर्यंतचा मार्ग वाहतुकीकरीतादोन्ही वाहिन्यांवर बंद राहील.
पर्यायी मार्ग : ६ सप्टेंबर रोजी वाहतूक सी.एस.एम.टी. जंक्शन वरून → डि.एन. रोड → एल.टी. मार्ग → मेट्रो जंक्शन (वासुदेव बळवंत फडके चौक) अशी वळवली जाईल.
काळबादेवी वाहतूक विभागातील बंद रस्ते
१. जे. एस. एस. रोड – संगीतकार अब्दुल करीम खान चौक (अल्फ्रेड जंक्शन) ते समतानंद अनंत हरी गद्रे चौक (पोर्तुगीज चर्च) हा रस्ता गरजेनुसार वाहतुकीस बंद राहील.
पर्यायी मार्ग – वाहतुक महर्षी कर्वे मार्ग व एन एस रोड मार्गे वळविण्यात येईल.
२. विठ्ठलभाई पटेल मार्ग कस्तुरबा गांधी चौक (सी पी टॅक सर्कल) ते भगवान श्री चंद्रप्रभा चौक (हॉटेल नित्यानंद जंक्शन) हा रस्ता वाहतुकीस बंद राहील.
पर्यायी मार्ग – वाहतुक काळबादेवी रोड व महर्षी कर्वे मार्गने वळविण्यात येईल.
३. बाबा साहेब जयकर मार्ग – डॉ. चंद्रकला हाटेबाई चौक (घोडागाडी जंक्शन) ते डॉ. यशवंत सामंत चौक (खत्तर गल्ली नाका) दरम्यानची वाहतुक दिनांक ०६/०९/२०२५ रोजी अनंत चतुर्थी दिवशी वाहतुकीस बंद राहील.
पर्यायी मार्ग – वाहतुक काळबादेवी रोड व महर्षी कर्वे मार्गने वळविण्यात येईल.
४. राजा राम मोहन रॉय रोड चारुशीला गुप्ते चौक (चन रोड स्टेशन जंक्शन) ते पदमश्री गोवर्धन बाप्पा चौक (प्रार्थना समाज जंक्शन) हा रस्ता गरजेनुसार वाहतुकीस बंद राहील.
पर्यायी मार्ग – वाहतुक महर्षी कर्वे मार्गने वळविण्यात येईल.
काळबादेवी वाहतूक विभागातील बंद रस्ते व पर्यायी मार्ग
१. जे. एस. एस. रोड : संगीतकार अब्दुल करीम खान चौक (अल्फ्रेड जंक्शन) → समतानंद अनंत हरी गद्रे चौक (पोर्तुगीज चर्च) गरजेनुसार वाहतूक बंद राहील.
पर्यायी मार्ग : महर्षी कर्वे मार्ग किंवा एन.एस. रोड मार्गे वाहतूक वळविण्यात येईल.
२. विठ्ठलभाई पटेल मार्ग : कस्तुरबा गांधी चौक (सी.पी. टॅक सर्कल) → भगवान श्री चंद्रप्रभा चौक (हॉटेल नित्यानंद जंक्शन) पूर्णपणे वाहतुकीस बंद.
पर्यायी मार्ग : काळबादेवी रोड आणि महर्षी कर्वे मार्ग वापरावा.
३. बाबा साहेब जयकर मार्ग : डॉ. चंद्रकला हाटेबाई चौक (घोडागाडी जंक्शन) → डॉ. यशवंत सामंत चौक (खत्तर गल्ली नाका) ६ सप्टेंबर २०२५, अनंत चतुर्थी दिवशी पूर्ण दिवस बंद राहील.
पर्यायी मार्ग : काळबादेवी रोड व महर्षी कर्वे मार्ग वापरावा.
४. राजा राम मोहन रॉय रोड : चारुशीला गुप्ते चौक (चन रोड स्टेशन जंक्शन) → पदमश्री गोवर्धन बाप्पा चौक (प्रार्थना समाज जंक्शन) गरजेनुसार वाहतुकीस बंद
पर्यायी मार्ग – वाहतुक महर्षी कर्वे मार्गने वळविण्यात येईल.