Ganesh Visarjan 2025: अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जनादरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी BMC चे मुंबईकरांना आवाहन

महापालिका प्रशासनाच्यावतीने नागरिकांना भरती व ओहोटीदरम्यान सतर्क राहण्याचे आवाहन


मुंबई : येत्या शनिवारी ६ सप्टेंबर २०२५ रोजी अर्थात अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi 2025) च्या दिवशी मुंबईतील सर्व विसर्जनस्थळी नागरिकांनी पावित्र्य व मांगल्य जपावे. उत्सवादरम्यान गर्दीच्या तसेच विसर्जनस्थळी जबाबदारीने आणि सतर्कतेने वागावे. मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलीस दलाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

शनिवार ६ सप्टेंबर भरती ओहोटी वेळ:


यंदा अनंत चतुर्दशीच्या दिवशी (शनिवार ६ सप्टेंबर २०२५) समुद्रात सकाळी ११.०९ वाजता ४.२० मीटरची भरती येणार असून, सायंकाळी ५.१३ वाजता १.४१ मीटरची ओहोटी तसेच रात्री ११.१७ वाजता ३.८७ मीटर उंचीची भरती असणार आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवार, दिनांक ७ सप्टेंबर २०२५ रोजी पहाटे ५.०६ मिनिटांनी ०.६९ मीटरची ओहोटी, सकाळी ११.४० वाजता ४.४२ मीटरची भरती असेल. त्यामुळे विसर्जनासाठी चौपाट्यांवर येणाऱ्या नागरिकांनी भरती व ओहोटीदरम्यान सतर्क राहावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

"ब्लू बटन जेलीफीश’, ‘स्टिंग रे’ पासून सावध राहण्याचा इशारा


ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत मुंबई येथील समुद्राच्या किनारपट्टीवर ‘ब्लू बटन जेलीफीश’, ‘स्टिंग रे’ प्रजातीच्या माशांचा वावर अधिक दिसून येतो. विसर्जनादरम्यान मत्स्यदंश होऊ नये, याची काळजी नागरिकांनी घेण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मत्स्यदंशाची घटना घडल्यास चौपाटी परिसरात वैद्यकीय कक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे. तसेच १०८ रूग्णवाहिकादेखील तैनात करण्यात आली आहे.

विसर्जनासाठी २९० कृत्रिम तलाव, तुमच्या नजीकचे तलाव पहा-


मुंबईत पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव साजरा व्हावा, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने यंदा सुमारे २९० कृत्रिम तलाव तयार केले आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका संकेतस्थळावरील https://www.mcgm.gov.in/irj/go/km/docs/documents/HomePage%20Data/Whats%20New/ganpati_art_ponds.pdf या लिंकवर कृत्रिम तलावांची यादी उपलब्ध आहे. या यादीमध्ये संबंधित कृत्रिम तलावाची गुगल मॅप लिंकही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच, क्यूआर कोड स्कॅन करुन किंवा बीएमसी व्हॉटसअॅप चॅटबॉटवरुनही कृत्रिम तलावांसंबंधित माहिती जाणून घेता येईल.

विसर्जनादरम्यान भाविकांनी कोणती काळजी घ्यावी?


विसर्जनादरम्यान कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी महापालिकेच्या वतीने काही निर्देश देण्यात आले आहेत. जसे की-

  • विसर्जनावेळी भाविकांनी समुद्राच्या खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न करु नये.

  • मूर्ती विसर्जनाकरीता महानगरपालिकेमार्फत नेमलेल्या प्रशिक्षित मनुष्यबळाची मदत घ्यावी.

  • काळोख असणाऱ्या ठिकाणी श्रीगणेशमूर्ती विसर्जनाकरीता जाणे टाळावे.

  • महानगरपालिकेने पोहण्याकरीता निषिद्ध केलेल्या क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न करू नये.

  • कुणी बुडत असल्याचे निदर्शनास आल्यास त्वरित अग्निशमन दलाचे जवान, पोलिस किंवा जीवरक्षकांना कळवावे.

  • कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नका किंवा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.

  • भाविकांनी लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. त्यांना पाण्यात जाऊ देऊ नये.

Comments
Add Comment

Mumbai News: मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील साठा ७.०८ टक्क्यांवर

मुंबई : मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांतील पाणीसाठा अद्याप चिंताजन

Bhendi Bazaar Fire : दक्षिण मुंबईत मध्यरात्री खळबळ! भेंडी बाजारजवळ बीएमसीच्या भूमिगत केबलला आग; परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार परिसरात रविवारी उशिरा रात्री भूमिगत बीएससी (BSC) केबलला अचानक आग लागल्याने

मढ-वर्सोवा पूलाच्या बांधकाम आता जोरात; विविध पर्यावरणीय परवानगी प्राप्त

कांदळवन विभागाला भरणार साडेबारा कोटींचे शुल्क मुंबई : मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या के/पश्चिम व पी/उत्तर

मुंबईत पाच ठिकाणी स्थापन करणार वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्र

मुंबई : मुंबईतील विविध प्रदूषकाचे नमूने गोळा करून विश्लेषण करणे तसेच प्रत्येक तासाला विविध प्रदूषक घटकांची

नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; कारच्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai : नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी झालेल्या एका भीषण अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी

Mumbai Municipal Corporation : मुंबई महापालिका उभारणार नवे सभागृह, ३५० आसनक्षमता, अधिकारी, पत्रकारांसाठी विशेष व्यवस्था

३५० आसनक्षमता, अधिकारी, पत्रकारांसाठी विशेष व्यवस्था मुंबई  : मुंबई महापालिकेचे सध्याचे ब्रिटिशकालीन सभागृह