Brainbees Solutions कंपनीचा शेअर १२% पार

मोहित सोमण:ब्रेनबीज सोलूशन लिमिटेड (Brainbees Solutions Limited) कंपनीचा शेअर आज १२.३५% उसळला आहे. आज सकाळच्या सत्रात सुरुवातीला शेअर १० ते ११% उसळला होता.दुपारी १.२९ वाजेपर्यंत कंपनीचा शेअर १२.३५% उसळला. त्या मुळे कंपनीच्या शेअरची किंमत ३९६.८५ रूपयांवर गेली आहे. काल अर्थमंत्री निर्मला सीतारामन व शिष्टमंडळाने आर्थिक धोरणाचा भाग म्हणून जीएसटीत कपात केली. ब्रेनबीज सोलूशन ही प्रामुख्याने ई कॉमर्स कंपनी असल्यामुळे गुंतवणूकदारांनी या शेअरला मोठा प्रतिसाद दिला आहे. वाढत्या मागणीमुळे कंपनीच्या शेअर नव्या आकड्यांवर पोहोचला आहे.


गेल्या पाच दिवसांपासून कंपनीच्या शेअर्समध्ये १०.३०% वाढ झाली असून एक महिन्याच्या कालावधीत शेअर ९.९५% वाढला आहे. सरकारने जीएसटी कपातीतील धोरणात जीवनावश्यक वस्तूंखेरीज १५०० रूपयांच्या पादत्राणे, २००० रूपयांच्या पोशाखावर यां च्यावरील शुल्कात मोठी कपात केल्याने जीएसटी दर ५% वर आले आहेत जे आधी १२% होते‌. याच धर्तीवर कंपनी आई व अर्भकांसाठी विविध प्रकारची उत्पादने ई कॉमर्स संकेतस्थळावरून विकते. त्याची मुख्य कंपनी FirstCry.com कंपनीचा स्वतः चा आण खी एक Pine Kids नावाचा ब्रँड आहे. याशिवाय कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओ कंज्यूमर ड्युरेबल्स प्रकारच्या इतर वस्तू विकल्या जातात.


कंपनीचे सध्या बाजार भांडवल (Market Capitalisation) २०३१२.३८ कोटी रुपये आहे. गेल्या सहा महिन्यांपासून कंपनीच्या स्क्रिपमध्ये ७.६८% वाढ झाली आहे. मात्र इयर टू डेट (YTD) मध्ये ३९.४८% घसरण झाली आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनु सार, १५ ऑक्टोबर २०२४ रोजी या शेअरने ५२ आठवड्यांचा उच्चांक ७३४ आणि ७ एप्रिल २०२५ रोजी ५२ आठवड्यांचा नीचांक २८६.०५ गाठला होता.Brainbees Solutions कंपनीने इयर ऑन इयर बेसिसवर पहिल्या तिमाहीत ४६.४२ कोटींचा निव्वळ तोटा नोंदवला होता. मागील वर्षीही कंपनीला ५६.७ कोटींचा निव्वळ तोटा झाला होता.

Comments
Add Comment

लालबागचा राजा ते चिंतामणी... कोणत्या वेळेला कोणते गणपती निघणार? जाणून घ्या वेळ आणि मार्ग

मुंबई: आज पहाटेपासूनच लालबागचा राजा, मुंबईचा राजा तसेच मुंबईतील इतर प्रतिष्ठित मंडळामध्ये गणेश विसर्जनाच्या

अरुण गवळीमुळे बदलणार दक्षिण मुंबईतील राजकीय समीकरणे!

मुंबई : एकवेळ मुंबईच्या गुन्हेगारी विश्वातले मोठ नाव असलेला गँगस्टर अरुण गवळी बुधवारी दगडी चाळीतील त्याच्या घरी

आई-वडील, सासू-सास-यांसोबत वेळ घालवण्यासाठी मिळणार रजा!

गुवाहाटी: पालकांसोबत आणि सासरच्यांसोबत वेळ घालवण्यासाठी आसाम सरकारने नोव्हेंबर महिन्यात कर्मचाऱ्यांना २

राज्याचा परकीय गुंतवणुकीचा आलेख घसरला

कर्नाटकचा पहिला नंबर, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी मुंबई : परकीय थेट गुंतवणूक (एफडीआय) आकर्षित करण्यात नेहमीच

अंत्ययात्रेची तयारी झाली पण खोकल्याने वाचला तरुणाचा जीव!

नाशिक : अपघातामध्ये जखमी झालेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तरुण मृत झाल्याचा माहितीवरून परिवाराने

‘त्या’जाहिरातीनंतर वाद; यामागे 'गजवा-ए-हिंद' : भाजपचा आरोप

हलाल लाइफस्टाइल टाऊनशिपची जाहिरात विकासकाने हटवली नेरळ : नेरळ येथे एका गृहनिर्माण प्रकल्पाच्या जाहिरातीत हलाल