...म्हणून एअर इंडियाच्या १६१ प्रवासी असलेल्या विमानाचे तातडीने लँडिंग


इंदूर : एअर इंडियाच्या इंदूर - दिल्ली विमानाने दिल्लीच्या दिशेने प्रवास सुरू केला. उड्डाण करुन विमान दिल्लीच्या दिशेने झेपावले आणि धक्कादायक घटना घडली. विमानाचे एक इंजिन बंद पडले. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी १६१ प्रवासी असलेले एअर इंडियाचे विमान आकाशात होते. पुढील संकट टाळण्यासाठी मार्ग बदलून तातडीने हे विमान इंदूर विमानतळावर उतरवण्यात आले. विमान व्यवस्थित उतरले आणि पुढचे संकट टळले. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. विमानाचे बंद पडलेले इंजिन दुरुस्त करण्याचे काम तंत्रज्ञ करत आहेत.


एअर इंडिया एक्सप्रेस AXB 1028 विमानाच्या वैमानिकाने एक इंजिन बंद पडल्याचे नियंत्रण कक्षाला कळवले. माहिती मिळताच अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि सीआयएसएफ पथकाने विमानतळावर धाव घेतली. सुदैवाने, विमान विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले.


याआधी १२ जून २०२५ रोजी गुजरातमध्ये अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या बोईंग ७८७ - ८ ड्रीमलायनर विमानाचा अपघात झाला होता. सर्व इंजिन बंद पडल्यामुळे उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही सेकंदात एअर इंडियाचे विमान एका इमारतीला धडक दिल्यानंतर मेडिकल हॉस्टेलवर कोसळले होते. या दुर्घटनेत एकूण २६० जणांचा मृत्यू झाला आणि ६८ जण जखमी झाले होते.


Comments
Add Comment

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव

अज्ञात वैमानिकाच्या पत्रात 'इंडिगो'वर ‘गैरव्यवस्थापन,’ आणि ‘अपमान’ केल्याचा आरोप

नवी दिल्ली : देशातील एक विमान सेवा कंपनी सध्या आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या संकटाचा सामना करत आहे. गेला

भारतातील सर्वात अनोखे शहर, आतापर्यंत २१ वेळा बदललं नाव

उत्तर प्रदेश  : भारतातील अनेक शहरे जगभरात प्रसिद्ध आहेत. लोकसंख्येच्या बाबतीत दिल्ली हे देशातील सर्वात मोठे शहर