लग्नानंतर गणपतीसाठी माहेरी आलेली अल्पवयीन मुलगी प्रियकरासोबत पळाली, पोलिसांसमोर कारवाईचे आव्हान

मनमाड : विवाहानंतर पहिल्यांदाच माहेराहून रेल्वेने सासरी परतणाऱ्या विवाहितेने सासू सासऱ्यांना गुंगारा देत प्रियकरासमवेत पळ काढला. या प्रकरणी मनमाड लोहमार्ग पोलिसांनी संशयित प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला असून, चौकशीत ही विवाहिता अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी वाशिम जिल्ह्यात शेतमजुरी करणाऱ्या पित्याने व माडसांगवी येथील सासऱ्यांनी लोहमार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.


सदर मुलीचा विवाह नाशिक तालुक्यातील माडसांगवी येथील युवकाशी झाला. विवाहानंतर पहिल्या सणाला माहेरी आलेल्या विवाहितेस सासरी परत नेण्यासाठी तिचे सासू-सासरे विदर्भ एक्स्प्रेसने नाशिककडे येत होते. मनमाड येथे गाडी थांबल्यावर आपण बाथरूममध्ये जाऊन कपडे बदलून येते, असे सांगून ही नवविवाहिता बेपत्ता झाली.


या प्रकरणी तिच्या सासऱ्यांनी मनमाड पोलीस ठाण्यात सूनबाई हरवली असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ तपास करीत तिच्यासह एका युवकास पोलीस ठाण्यात आणले. चौकशीत मुलगी व युवकाचे प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले, तसेच ही मुलगी अल्पवयीन असल्याचेही निदर्शनास आले.


तर मुलीच्या पित्याने मनमाडला धाव घेत आपल्या मुलीस लग्नाचे आमिष दाखवित युवकाने पळवून नेल्याची फिर्याद दाखल केली. या प्रकरणी मनमाड लोहमार्ग पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Comments
Add Comment

शेत रस्त्याच्या वादात मिळणार 'मोफत' पोलीस संरक्षण

उपविभागीय अधिकाऱ्यांनाही अधिकार सोपविण्याची तरतूद विलंब टाळण्यासाठी इमेल द्वारे पाठविण्यात येणार नोटीस •

मुद्रांक शुल्क वादाबाबत उच्च न्यायालयाऐवजी थेट राज्य शासनाकडे अपील

विधानसभेत सुधारणा विधेयक एकमताने मंजूर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत मांडले

 भोगवटादार वर्ग-२ जमिनींवरील 'गहाण शुल्क' वसुलीला कायदेशीर संरक्षण २००९ पासूनची आकारणी वैध ठरणार

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत मांडलेले विधेयक संमत 'महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (दुसरी

"उद्धव ठाकरे अधिवेशनासाठी नाही, तर सहलीला आलेत"; परिणय फुकेंचा घणाघात

नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपुरात राजकीय वातावरण तापले आहे. उद्धव ठाकरे यांनी विधानसभा

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातून गावांच्या समृद्धीची दिशा मिळेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान शीर्षक गीत लोकार्पण कार्यक्रम नागपूर : राज्यात मागील काही दिवसात झालेल्या

सभागृहात मंत्री येत नसतील, तर त्यांच्यावर बिबटे सोडा - सुधीर मुनगंटीवार

नागपूर : गेल्या दोन दिवसांपासून विधानसभेत मंत्री आाणि संबंधित विभागांचे सचिव उपस्थित नसल्याचा मुद्दा