जीएसटी कपात होताच Auto FMCG Consumers Durable शेअर्समध्ये मागणीचा पाऊस

मोहित सोमण: जीएसटी २.० कपातीच्या घोषणेनंतर आज शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात ऑटो व एफएमसीजी कंज्यूमर ड्युरेबल्स शेअर्समध्ये वाढ झाली आहे. सकाळी ऑटो शेअर्समध्ये एम अँड एम, टाटा मोटर्स, मारूती सुझुकी, टीव्हीएस मोटर्स, आयशर मोटर्स, हिरो मोटोकॉर्प अशा महत्वाच्या हेवीवेट शेअर्समध्ये वाढ झाली असून एफएमसीजी शेअर्समध्ये आयटीसी, हिंदुस्थान युनिलिव्हर, डाबर अशा शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. केंद्र सरकारने ऑटोमोबाईल क्षेत्रातील सामान्य श्रेणीतील (दोनचाकी, चारचा की, तीनचाकी, व्यवसायिक वाहने) यांच्या उत्पादनात २८% वरुन १८% कर लावण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने या क्षेत्रातील मागणीत वाढ होऊ शकते परिणामी आज गुंतवणूकदारांनी या शेअर्समध्ये विश्वास व्यक्त करत आपली गुंतवणूक वाढवल्यामुळे आज शेअर मोठ्या प्रमाणात वाढले. कंज्यूमर ड्युरेबल्स व एफएमसीजी (Fast Moving Consumers Goods FMCG) उत्पादनात १२ व १८% स्लॅबवरून ५% कर लावण्याचा निर्णय घेतल्याने या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. आगामी सणासुदीच्या काळात मो ठ्या प्रमाणात या वस्तूंच्या उपभोगात वाढ अपेक्षित आहे. सकाळच्या सत्रात ऑटो निर्देशांक ३% हून अधिक पातळीवर उसळला असून एफएमसीजी (१%), कंज्यूमर ड्युरेबल्स (०.५४%) पर्यंत उसळला होता.


याशिवाय केंद्र सरकारने निर्यातक्षम वस्तूंवरही आगामी काळात प्रोत्साहन देण्याची शक्यता आहे. एक्सपोर्ट प्रमोशन काऊन्सिलद्वारे युएसमध्ये वाढलेल्या निर्यातीतील टॅरिफचा फटका बसल्याने व्यापारांना दिलासा मिळू शकतो ज्यामध्ये त्यांच्या ड्युटीतही घसरण होण्याची शक्यता आहे.माहितीनुसार,सुधारित करप्रणाली रचनेनुसार,चार मीटरपेक्षा कमी लांबीच्या लहान गाड्या व पेट्रोल इंजिन १२०० सीसीपर्यंत मर्यादा असलेल्या गाड्या व आहे डिझेल इंजिनबाबतीत १५०० सीसी पर्यंत आहे ज्यावर आता १८% जीएसटी आका रला जाणार आहे जो पूर्वीच्या २८% वरून ३१% केला गेला होता. चार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या मोठ्या एसयूव्हींवर ४०% कर आकारला जाईल, जो पूर्वीच्या ४३% वरुन ५०% केला गेला आहे. सवलतीच्या ५% जीएसटी दराचा फायदा इलेक्ट्रिक वाहनांना लागू के ला जाईल. इलेक्ट्रिक वाहनावरील सेस (Cess) रद्द करण्यात आला आहे ज्यामुळे या गाड्या स्वस्त होणार आहेत.


३५० सीसी पेक्षा कमी इंजिन क्षमता असलेल्या दुचाकी वाहनांवर आता १८% कर आकारला जाईल, जो २८ टक्क्यांवरून कमी झाला आहे. ३५० सीसी पेक्षा जास्त क्षमतेच्या दुचाकींवर ४०% जीएसटी आकारला जाईल. तसेच, ट्रक, बस आणि रुग्णवाहिका यासार ख्या व्यावसायिक वाहनांवर २८ टक्क्यांवरून १८% जीएसटी आकारला जाईल. ट्रॅक्टर आणि कृषी यंत्रसामग्रीवरील कर १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत कमी केला जाईल, ज्यामुळे शेतकऱ्यांना ही आवश्यक साधने अधिक परवडतील आणि ग्रामीण मागणी वाढेल अशी अपेक्षा आहे.दुपारी १ वाजेपर्यंत महिंद्रा अँड महिंद्रा (६.१३%), टीव्हीएस मोटर्स (१.५५%),टाटा मोटर्स (०.१८%), मारूती सुझुकी (-१.२३%), हिरो मोटोकॉर्प (०.७३%), आयशर मोटर्स (१.५२%) समभागात वाढ झाली आहे. दुपारी १ वाजेपर्यंत एफएमसीजी शेअर्सपैकी आयटीसी (१.२८%), एचयुएल (०.८०%), ब्रिटानिया इंडस्ट्रीज (२.९०%), डाबर (२.१५%), मारिको (०.६७%), नेस्ले इंडिया (१.७२%) समभागात मोठी वाढ झाली आहे.

Comments
Add Comment

मुंबई लोकल ट्रेनमध्ये महिलांचा गरबा

मुंबई: बोरिवली आणि चर्चगेट दरम्यान मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये महिलांनी गरबा खेळतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला

पंतप्रधानांनी केली अणुऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी

बांसवाडा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानच्या या आदिवासी-बहुल प्रदेशात २८०० मेगावॅटच्या अणुऊर्जा

राज्य सरकारचा पूरग्रस्तांना मोठा दिलासा: मृतांच्या कुटुंबियांना ४ लाख, गुरांसाठीही मदत

मुंबई: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर,

मान्सूनचा मुक्काम लांबणीवर!

मराठवाड्यासह विदर्भात अस्मानी संकट आणखी गडद होणार मुंबई : पावसाने राज्यभरात धुमाकूळ घातलेला असतानाच जाता-जाता

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरसावला लालबागचा राजा

मुंबई : महाराष्ट्रासह देशात अनेक ठिकाणी नवरात्रौत्सवाचा उत्साह आहे, त्याचवेळी पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग

शाहरुख व गौरी खानविरुद्ध मानहानीचा खटला, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' वेब सीरिज वादाच्या भोवऱ्यात!

मुंबई: प्रसिद्ध चित्रपट अभिनेता शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांच्या विरोधात मुंबईचे माजी पोलीस अधिकारी