Ajit Pawar : कारवाई थांबवा! अवैध कामावर छापा टाकणाऱ्या महिला अधिकाऱ्याला उपमुख्यमंत्री पवारांचा दम, नेमकं काय घडलं?

  50

कोल्हापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे त्यांच्या थेट आणि धडाडीच्या कामकाजासाठी ओळखले जातात. प्रशासनात त्यांचा दबदबा असल्याचे सर्वत्र मानले जाते. मात्र, बुधवारी घडलेल्या एका प्रकारामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. करमाळा विभागातील पोलिस उपअधीक्षक अंजली कृष्णा यांच्याशी अजित पवारांचा झालेला फोनवरील संवादाचे रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाले. आरोप असा आहे की, या संभाषणादरम्यान अंजली कृष्णा यांनी सुरुवातीला अजित पवारांना ओळखले नाही. यामुळे संतापलेल्या पवारांनी त्यांना फोनवर खडेबोल सुनावलेच, पण थेट व्हिडिओ कॉल करून दमदाटी केली. अचानक आलेल्या या कॉलमुळे अंजली कृष्णा गोंधळून गेल्या आणि त्या घाबरत बांधावरच बसल्या, असे सांगितले जाते. हा प्रकार सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुर्डू गावात घडला, जिथे अंजली कृष्णा कारवाईसाठी पोहोचल्या होत्या. दरम्यान, हे कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने वाद पेटला आहे. शेतकरी संघटनेनं आरोप केला आहे की, अजित पवारांनी बेकायदेशीर कामांना पाठबळ देत महिला अधिकाऱ्याचा अपमान केला आहे.


अजित पवारांना ओळखलं नाही...


सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुर्डू गावात रस्त्याच्या कामासाठी सुरू असलेल्या मुरूम उत्खननाच्या तक्रारीनंतर पोलिस उपअधीक्षक अंजली कृष्णा घटनास्थळी दाखल झाल्या. या कारवाईदरम्यान त्यांची ग्रामस्थांशी शाब्दिक वादावादी झाली. त्याच वेळी काँग्रेसचे आमदार बाबा जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना थेट फोन लावून तो अंजली कृष्णा यांच्याकडे दिला. फोनवर पवारांनी स्वतःची ओळख करून देत कारवाई तत्काळ थांबविण्याचे आदेश दिले. मात्र, अंजली कृष्णा यांनी त्यांचा आवाज ओळखला नाही. यामुळे नाराज झालेल्या पवारांनी कठोर शब्दांत म्हणाले – "मैं डीसीएम अजित पवार बोल रहा हूं, कारवाई बंद करो, मेरा आदेश है."

अंजली कृष्णा यांनी पवारांना थेट उत्तर देत, "मेरे फोन पर कॉल करो" असे सांगितल्यावर अजित पवार अधिकच संतापले. त्यांनी कठोर शब्दांत इशारा देत म्हटले – "तुम पे अ‍ॅक्शन लुंगा, इतनी डेरिंग है तुम्हारी? मेरा चेहरा तो पहचानोगी ना?" यानंतर पवारांनी वेळ न दवडता व्हिडिओ कॉल सुरू केला. हा कॉल लागताच अंजली कृष्णा थेट बांधावर बसलेल्या अवस्थेत पवारांशी संवाद साधताना दिसल्या. या संभाषणादरम्यान पवारांनी स्पष्टपणे कारवाई तात्काळ थांबविण्याचे निर्देश दिले. इतकेच नव्हे, तर "माझा फोन आलाय, हे तहसीलदारांना सांगा," असे सांगून त्यांनी अधिकार्‍यांनाही आपला आदेश कळविण्याचे निर्देश दिल्याचे ऐकू आले.

दरम्यान, उपस्थित ग्रामस्थांनी सुरु असलेले मुरूम उत्खनन हे ग्रामपंचायतीच्या परवानगीने होत असल्याचा दावा केला. मात्र, त्यांनी आपल्या म्हणण्याचा कोणताही ठोस पुरावा किंवा कागदपत्रं दाखवली नाहीत. त्यामुळे परवानगी वैध असल्याचे सिद्ध न झाल्याने पोलिस उपअधीक्षक अंजली कृष्णा, या महिला आयपीएस अधिकाऱ्यांनी उत्खननाविरुद्धची कारवाई सुरूच ठेवली.
Comments
Add Comment

...म्हणून मुंबईत कबड्डीपटूने केली आत्महत्या

मुंबई : वांद्रे परिसरात आई आणि भावासोबत राहणाऱ्या २० वर्षीय कबड्डीपटूने टोकाचे पाऊल उचलले. गंभीर आजारी असलेल्या

महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार, मुंबईसह या जिल्ह्यांना हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. बंगालच्या उपसागरात वायव्येला तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले

दादर स्टेशनच्या पार्किंगमध्ये आग, अनेक दुचाकी झाल्या खाक

मुंबई : मुंबईतील मध्यवर्ती आणि प्रचंड गर्दी असलेले रेल्वे स्टेशन म्हणजे दादर. या दादर स्टेशनच्या आवारातील

नागपूरच्या एक्सप्लोसिव्ह कंपनीत भीषण स्फोट, १ मृत्यू तर १७ जण जखमी, ४ कामगारांची प्रकृती चिंताजनक

नागपूर: नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव जवळील सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीत मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास

'मराठा आरक्षणाच्या जीआरविरोधात न्यायालयात जाणार'

मुंबई : जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने जारी

अनंत चतुर्दशीनिमित्त चर्नी रोड स्थानकावरील लोकल गाड्यांच्या वेळेत बदल

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या जलद लोकल गाड्या येत्या शनिवारी ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते रात्री १०:३० पर्यंत मुंबई