भारतीय स्पर्धा आयोगाने मान्यता दिल्यानंतर येस बँकेचा शेअर ३.६३% उसळला !

मोहित सोमण: भारतीय स्पर्धा आयोगाने (Competition Commission of India CCI) येस बँकेतील २४.९९% भागभांडवल खरेदी करण्यासाठी जपानच्या सुमीटोमो मितसुई बँकिंग कॉर्पोरेशनला (Sumitomo Mitsui Banking Corporation) परवानगी दिल्यानंतर येस बँकेचा शेअर ३.६३% उसळला आहे. दुपारी १.५२ वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये ३.६३% उसळी घेतल्याने सध्या शेअर २०.२६ रूपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहे.उपलब्ध माहितीनुसार, येस बँकेच्या शेअरची किंमत एका महिन्यात ५% वाढली आणि तीन महिन्यांत १६% घसरली असून हा शेअर इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) शेअर स्थिर राहिला आहे. एका वर्षात तो १८% घसरला आहे. गेल्या दोन वर्षांत, येस बँकेचे शेअर १३% वाढले आहेत, तर पाच वर्षांत ते ३५% वाढले आहेत.


मागील महिन्यातच सेंट्रल बँक असलेल्या आरबीआयने (RBI) या प्रस्तावाला मान्यता दिली होती. येस बँकेच्या एकूण भागभांडवलात २४.९९% पूर्णपणे भरलेले भागभांडवल (Paidup Capital) व वोटिंग राईट्सह मान्यता दिली होती. त्यामुळे आता या खरेदीसाठी एसएमबीसीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. एसएमबीसी (Sumitomo Mitsui Banking Corporation) हा जपानमधील दुसऱ्या क्रमांकाची बँकिग संस्था गणली जाते. त्यामुळे हे भारतातील मोठा व्यवहार मानला जात आहे. याशिवाय येस बँकेच्या भागभांड वल खरेदीमुळे कंपनीला भारतातील आपल्या क्षेत्रीय विस्तारासाठी जापनीज संस्थेला संधी मिळाली आहे.


एसएमबीसी ही सुमितोमो मित्सुई फायनान्शियल ग्रुप, इंक. (एसएमएफजी) ची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. एसएमएफजी हा जपानमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा बँकिंग गट आहे, ज्याची डिसेंबर २०२४ पर्यंत एकूण मालमत्ता २ ट्रिलियन डॉलर्स होती आणि जागतिक स्तरावर त्याची उपस्थिती मजबूत आहे.'प्रस्तावित संयोजन सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशन (एसएमबीसी) द्वारे येस बँकेच्या शेअर भांडवलाच्या आणि मतदानाच्या अधिकारांच्या संपादनाशी संबंधित आहे'असे भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसी आय) आपल्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. ९ मे २०२५ रोजी येस बँकेने स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) कडून १३.१९% हिस्सा आणि अ‍ॅक्सिस बँक, बंधन बँक, फेडरल बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि कोटक महिंद्रा बँक यासह इतर सात भागधारकांकडून ६.८१% हिस्सा खरेदी करून कर्जदात्यामध्ये २०% हिस्सा घेण्याच्या एसएमबीसीच्या प्रस्तावित संपादनाची माहिती माध्यमांना दिली होती. या व्यवहारानंतर एसएमबीसी मुंबईस्थित येस बँकेचा सर्वात मोठा भा गभांडवल धारक बनणार आहे. मंगळवारी, बीएसईवर येस बँकेच्या शेअरची किंमत ०.०५% वाढून १९.५६ वर बंद झाली. आज मात्र बँकेच्या शेअरमध्ये ३% पेक्षा अधिक वाढ झाली आहे.

Comments
Add Comment

'फडणवीस सरकारने शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पाळले, उद्धव सरकारने शेतकऱ्यांना कवडीचीही मदत दिली नव्हती'

मुंबई : अर्थसंकल्प आणि शेती यातील शून्य ज्ञान असलेले संजय राऊत शुक्रवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पावर टीका करत

Iran Israel War : इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी फेटाळून लावली अमेरिकेची बिनशर्त आत्मसमर्पणाची मागणी

पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी अमेरिकेच्या

दुबई विमानतळ बंद, विमानवाहतूक ठप्प

दुबई : अमेरिका - इस्रायल विरुद्ध इराण असे युद्ध पश्चिम आशियात सुरू आहे. इराणने अमेरिकेच्या सैन्याचे तळ ज्या

T20 World Cup 2026 : जाणून घ्या न्यूझीलंडच्या कर्णधाराला भारतीय संघाबद्दल काय वाटते

- अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंडच्या कर्णधाराने केले जसप्रीत बुमराहचे कौतुक मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक

‘वन नेशन-वन रेशन’मध्ये महाराष्ट्र अव्वल

- १८.९७ लाख परप्रांतीयांनी घेतले धान्य; शिवभोजन थाळीचाही ४ कोटींचा टप्पा पार मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Mumbai Metro : महिला दिनी मेट्रोची ‘कमान’ महिलांच्या हाती

मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) कडून एक विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे.