प्रतिनिधी: टोयोटा किर्लोस्कर मोटर (Toyota Kirloskar Motor TKM)ने ऑगस्ट २०२५ मध्ये एकूण ३४२३६ युनिट्सची विक्री केली असून गेल्या वर्षी याच कालावधीच्या तुलनेत ११% वाढ नोंदवली आहे. कंपनीने ऑगस्ट २०२४ मध्ये ३०८७९ युनिट्सची विक्री केली होती. यामध्ये देशांतर्गत बाजारपेठेत विकल्या गेलेल्या २९३०२ युनिट्स आणि निर्यात केलेल्या ४९३४ युनिट्सचा समावेश आहे.कंपनीने गेल्या वर्षी जानेवारी ते ऑगस्ट या वर्षातील पहिल्या ८ महिन्यांच्या कालावधीत २१२७८५ युनिट्स युनिट्सची विक्री केली होती. यात यावर्षी १४% वाढ झाली असून समान कालावधीत २४१६९६ युनिट्सची विक्री नोंदवण्यात आली आहे.
याविषयी प्रसारमाध्यमांशी व्यक्त होताना टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या युज्ड कार बिझनेसच्या विक्री व सेवेचे उपाध्यक्ष वरिंदर वाधवा म्हणाले आहेत की,'आम्ही ऑगस्ट २०२५ मध्ये ३४२३६ युनिट्सची विक्री केली, बाजारपेठेत आमची स्थिर उपस्थि ती कायम ठेवली आहे आणि आमच्या कार व सर्विसेसवर ग्राहकांनी सातत्याने दाखवलेल्या विश्वासामधून प्रेरणा मिळाली आहे. सप्टेंबर महिना एकूण उद्योगासाठी महत्त्वपूर्ण टप्पा असेल आणि आम्ही बाजारपेठेत उदयास येणाऱ्या ट्रेण्ड्सचे बारकाइने निरीक्षण क रू.टोयोटामध्ये आम्ही नाविन्यता आणण्यावर आणि सणासुदीच्या काळात मूल्यवर्धित सेवा सादर करण्यावर लक्ष केंद्रित करतो, तसेच आम्हाला ग्राहक समाधानामध्ये वाढ होण्याची आणि खरेदी निर्णय अधिक सोपा व अधिक आनंददायी करण्याची आशा आहे.'
कंपननीने ऑगस्ट महिन्यात विशेष कामगिरीची नोंद केली असून यात मेक-इन-इंडिया कटिबद्धतेला अधिक दृढ करण्यासाठी आणि निर्यातीला चालना देण्यासाठी टीकेएमने कामराजर पोर्ट लिमिटेड (केपीएल) सोबत व्हेर्फेज रेट कराराचे नूतनीकरण केले. तसेच १२ लाखांहून अधिक ग्राहकांसह टोयोटा इनोव्हाने भारतात २० गौरवशाली वर्षे पूर्ण केली. लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्ही अर्बन क्रूझर टायझर नवीन ब्लूइश ब्लॅक एक्स्टीरिअर रंगामध्ये सादर करण्यात आली, तसेच सर्व व्हेरिएण्ट्समध्ये प्रमाणित म्हणून सहा एअरबॅ ग्ज भर करण्यात आल्या. टीकेएमने त्यांची आयकॉनिक लक्झरी हायब्रिड इलेक्ट्रिक सेदानची स्पोर्टीयर आणि अधिक गतीशील अभिव्यक्ती कॅमरी हायब्रिड इलेक्ट्रिक वेईकल - स्प्रिंट एडिशन ऑगस्ट महिन्यात लाँच केली आहे.