शेअर बाजारात सकाळी घसरण ! जीएसटी बैठकीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष सेन्सेक्स १२४.०३ व निफ्टी ४३.७० अंकाने घसरला

मोहित सोमण:आज सकाळी गिफ्ट निफ्टीतील मार्जिनल वाढीनंतर शेअर बाजार सपाट अथवा किरकोळ वाढीकडे कल दर्शवत असला तरी मात्र अस्थिरता कायम असल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष आजच्या जीएसटी काऊन्सिल बैठकीकडे लागल्याने आज बहुतां श गुंतवणूकदाराकडून सकाळच्या सत्रात वेट अँड वॉचचे धोरण अवलंबले जाऊ शकते. सकाळी सत्राच्या सुरुवातीला सेन्सेक्स १२४.०३ अंकांने घसरला असून निफ्टी सुरूवातीच्या कलात ४३.७० अंकाने घसरला आहे. सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.१९%,०.१९% वाढ झाली असून निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये मात्र अनुक्रमे ०.०३%,०.०१% घसरण झाली आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात सुरुवातीला ६७.६३ अंकांने व बँक निफ्टीत ८५.२० अंकाने घसरण झाली आहे.सुरूवातीच्या कलात निफ्टी क्षेत्रीय निर्दे शांकात (Nifty Sectoral Indices) यामध्ये सर्वाधिक वाढ मेटल (१.०६%), पीएसयु बँक (०.३८%), तेल व गॅस (०.४८%) निर्देशांकात झाली आहे. सर्वाधिक घसरण रिअल्टी (०.३७%), मिडस्मॉल आयटी टेलिकॉम (०.५४%) निर्देशांकात झाली आहे.


आज शेअर बाजारात विशेषतः आज व उद्या जीएसटी काऊन्सिल बैठकीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे ज्याचा परिणाम निफ्टी क्षेत्रीय विशेष समभागात होईल मात्र सर्वसामान्य नागरिकांना देखील अपवाद वगळता सगळ्या गरजेच्या वस्तूत कपात होणार असल्याने गुंतवणूकदारांचे मनोबल वाढले आहे. याखेरीज आज सकाळी थोड्याच वेळात एचएसबीसीचा सर्विस पीएमआय डेटा प्रकाशित होणार असल्याने ऑगस्टमधील सेवा क्षेत्रातील आकडेवारीकडे गुंतवणूकदारांचे प्रमुख लक्ष लागले आहे. जागतिक पातळी वरील गोल्ड सह तेलाच्या निर्देशांकातही अस्थिरता वाढल्याने त्याचा परिणाम भारतीय बाजारात सातत्याने होत आहे. अमेरिकेतील टॅरिफ वाढ अध्यायाचा पुढील भाग म्हणून आगामी दिवसात डोनाल्ड ट्रम्प यांच्या ५०% शुल्क आकारण्याच्या ठाम निर्णयानंतर भार तीय शिष्टमंडळ व युएस शिष्टमंडळ तडजोड करतील का याकडे लक्ष लागले आहे. गुंतवणूकदार फेडरल व्याजदरात कपात होईल का यावरील फेड गव्हर्नर जेरोमी पॉवेल यांच्या नव्या वक्तव्याची वाट पाहत असल्याने या ट्रिगर देखील या आठवड्यात बाजारात म हत्वाचा असेल. कालही युएस बाजारातील डाऊ जोन्स (०.३२%), एस अँड पी ५०० (०.६९%), नासडाक (०.८२%) या तिन्ही बाजारात घसरण झाली असून आशियाई बाजारातील सुरूवातीच्या कलात गिफ्ट निफ्टी (०.०९%) सह तैवान वेटेड (०.३२%), सेट कंपो झिट (०.६६%), जकार्ता कंपोझिट (०.९३%) बाजारात वाढ झाली असून घसरण निकेयी २२५ (०.७२%), हेंगसेंग (०.४३%), शांघाई कंपोझिट (०.९६%), स्ट्रेट टाईम्स (०.३२%) निर्देशांकात घसरण झाली आहे.


सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ टीबीओ टेक (१२.१२%), पीएनसी इन्फ्राटेक (३.३२%), 3M India (२.९३%), ज्योत सीएनसी ऑटो (२.७९%), एचडीएफसी बँक (२.३९%), सन टीव्ही नेटवर्क (२.२२%), येस बँक (२.२०%), निवा बुपा हेल्थ (२.१४%), हिंदाल्को इंडस्ट्रीज (१.९५%), कमिन्स इंडिया (१.७८%), एमसीएक्स (१.७२%), श्री रेणुका शुगर (१.६३%) समभागात झाली आहे.सकाळच्या सत्रात सर्वाधिक घसरण इंडस टॉवर (४.५१%), किर्लोस्कर ऑईल (३.०५%), झेंसर टेक्नॉलॉजी (२.४१%), गोदरेज अँग्रोवेट (२.१ ७%), फिनिक्स मिल्स (२.०९%), झेडऐफ कमर्शिअल (१.९९%), सीएट (१.७९%), आदित्य बिर्ला फॅशन (१.६७%), एमआरएफ (१.३६%), ग्राविटा इंडिया (१.३६%), बीएसई (१.१७%), इन्फोसिस (०.८७%) समभागात झाली आहे.


आजच्या सकाळच्या कलांवर प्रतिक्रिया देताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले आहेत की,'जागतिक अनिश्चितता वाढत असताना, बाजारपेठेतही उच्च अस्थिरता अनुभवायला मिळणार आहे. भविष्या त बाजारावर परिणाम करणाऱ्या सकारात्मक आणि नकारात्मक बातम्या येऊ शकतात. नकारात्मक बाजूने, भारताने ट्रम्पच्या आदेशांना नकार दिल्याने भारतावर लादलेला २५% दंडात्मक कर मागे घेण्याची शक्यता कठीण होत चालली आहे. याचा अर्थ अल्पावधीत आपल्या निर्यात आणि संबंधित नोकऱ्यांना त्रास होत राहील. सकारात्मक बाजूने, ७.८% च्या पहिल्या तिमाहीतील जीडीपी वाढीचा आकडा अर्थव्यवस्थेतील वाढीचा वेग दर्शवितो. जीएसटीमधील येणाऱ्या सुधारणांमुळे हे वेग वाढेल. या सर्वांचा नि व्वळ परिणाम म्हणजे आर्थिक वर्ष २६ आणि आर्थिक वर्ष २७ साठी उत्पन्न वाढीमध्ये वाढ होऊ शकते. यामुळे भारतातील एफआयआय खरेदीदार बनण्याची शक्यता आहे ज्यामुळे बाजारात तेजी निर्माण होईल. ही एक संभाव्य परिस्थिती आहे जी काही आठव ड्यांत दिसून येऊ शकते.तसेच जर अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्पच्या शुल्काबाबत अमेरिकन प्रशासनाच्या अपीलला नकार दिला तर परिस्थिती नाटकीयरित्या बदलू शकते. येणारे दिवस अस्थिर आहेत. गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करत राहावे आणि हळूह ळू उच्च दर्जाचे, योग्य मूल्य असलेले उत्पन्न मिळवावे.'


आजच्या सकाळच्या सत्रातील निफ्टी पोझिशनवर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य बाजार रणनीतीकार आनंद जेम्स म्हणाले आहेत की,'काल आम्ही वरच्या उद्दिष्टाच्या अंदाजानुसार २४६९७-८०९ बँडमध्ये पहिला अर्धा भाग घालवल्यानंतर, घसरण झाली, ज्यामुळे नकाराचे संकेत मिळाले. म्हणूनच, निफ्टी २४५५० च्या वर बंद होण्याच्या दिशेने संपला असला तरी, आम्ही कालइतके आशावादी नाही. २४६७० पातळीच्या वर परत येण्याने आम्हाला पुन्हा वरच्या आशेबद्दल रस असेल, प रंतु २४२००-२४०७५-२३८६० पातळीचे नकारात्मक उद्दिष्ट पुन्हा रडारवर आले आहे, ज्यामुळे पूर्वीपेक्षा जास्त सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे.'


त्यामुळे आज शेअर बाजारात सावधगिरीचा इशारा मिळत असताना जीएसटी काऊन्सिल बैठकीकडे लक्ष लागल्याने घरगुती गुंतवणूकदारांचा कल अखेरच्या सत्रात निश्चित होऊ शकतो यावेळी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (Foreign Institutional Inves tors FII) यांची भूमिका देखील बाजारात महत्त्वाची ठरू शकते.

Comments
Add Comment

महेश मांजरेकर याचं तब्बल २९ वर्षांनी रंगभूमीवर पुनरागमन; 'या' नाटकात करणार काम

मुंबई : मराठी रंगभूमीवर पुन्हा एकदा हास्य आणि भावनांचा संगम घेऊन ‘शंकर जयकिशन’ हे नाटक रसिकांच्या भेटीला येत आहे.

WinZO गेमिंग कंपनीच्या संस्थापकांना ईडीकडून अटक

प्रतिनिधी: मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली गेमिंग प्लॅटफॉर्म WinZO च्या संस्थापक जोडीला अंमलबजावणी संचनालयाने (Enforcement

खेळताना ट्रॅक्टरवर चढला, चुकून गिअर पडला अन् ; बार्शीत ४ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शेळगावमध्ये गुरुवारी दुपारी ४ वर्षांच्या मुलाचा ट्रॅक्टरसह

भारतीय क्रिकेटपटू पुजाराच्या मेहुण्याची आत्महत्या! बलात्काराचा आरोप अन् एका वर्षात जीवन संपवले, जाणून घ्या सविस्तर

राजकोट: भारतीय क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील नातेसंबंधामुळे चर्चेत आला आहे.

युएस एफडीएकडून आलेल्या निकालानंतर ग्लेनमार्क फार्मा शेअरला गुंतवणूकदारांचा तुल्यबळ प्रतिसाद, २% शेअर उसळला

मोहित सोमण:ग्लेनमार्क फार्मा या भारतातील मोठ्या फार्मा कंपनीच्या शेअर्समध्ये आज चांगली वाढ झाली आहे. सत्र

Pune News : १ तास कुलूप लावून... हिंजवडीत निष्काळजीपणाचा कळस; सेविका अन् मदतनीसांनी २० चिमुकल्यांना अंगणवाडीत कोंडलं;

पुणे : पुण्यातील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी (Hinjawadi, Pune) परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना