मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत मोठी घोषणा

  36


मुंबई : जात प्रमाणपत्र देणे आणि त्याची पडताळणी करणे याकरिता २००१ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. २३ व त्याअंतर्गत कार्यपद्धती निश्चितीकरिता नियम तयार करण्यात आलेले आहेत. यामध्ये हैद्राबाद गॅझेटिअरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी गावपातळीवर समित्या गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने प्रसिद्ध केला आहे.


गावपातळीवर गठीत समितीमध्ये ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सहायक कृषी अधिकारी यांचा समावेश असेल. मराठा समाजातील भूधारक तसेच भूमिहीन, शेतमजूर किंवा बटईने शेती करत असलेल्या व्यक्तींकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांनी १३ ऑक्टोबर १९६७ पूर्वीचे वास्तव्य दाखविणारे प्रतिज्ञापत्र सादर करावे. तसेच, त्यांच्या कुळातील किंवा नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व त्यांनी अर्जदारासंबंधी प्रतिज्ञापत्र दिल्यास, स्थानिक समिती आवश्यक चौकशी करून अहवाल सादर करेल. सक्षम प्राधिकारी या चौकशीच्या आधारे अर्जदारास कुणबी जातीचा दाखला देण्याचा निर्णय घेतील. याबाबतची कार्यपध्दती शासन निर्णयात नमूद करण्यात आली आहे.


Comments
Add Comment

'मराठा आरक्षणाच्या जीआरविरोधात न्यायालयात जाणार'

मुंबई : जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने जारी

अनंत चतुर्दशीनिमित्त चर्नी रोड स्थानकावरील लोकल गाड्यांच्या वेळेत बदल

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या जलद लोकल गाड्या येत्या शनिवारी ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते रात्री १०:३० पर्यंत मुंबई

बापरे, 'झोमॅटो'वरुन ऑर्डर करणे होणार एवढे महाग

मुंबई : ऑनलाइन फूड डिलिव्हरी क्षेत्रातील आघाडीची कंपनी झोमॅटोने प्लॅटफॉर्म शुल्कात दोन रुपयांची वाढ केली आहे.

लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी भाषा केंद्र उभारणार

मुंबई : महाराष्ट्र सरकारने लंडनमधील महाराष्ट्र मंडळाची इमारत ५ कोटी रुपयांना लिलावात जिंकली असून, तेथे छत्रपती

मराठ्यांपाठोपाठ ओबीसींसाठीही उपसमितीची स्थापना

मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन आदेश मंगळवारी जारी करण्यात आला.

मॅरेथॉन स्पर्धेबाबत झाला महत्त्वाचा निर्णय

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त १७ सप्टेंबरपासून २ ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवडा देशभरात