खवय्यांसाठी वाईट बातमी - Zomato कडून आपल्या प्लॅटफॉर्म फीमध्ये २०% वाढ

प्रतिनिधी:अगदी सणासुदीच्या काळात तुमची झोमॅटो ऑर्डर महाग होणार आहे. कारण कंपनीने गणपती, दिवाळी, दसरा, नवरात्र अगदी याच मोसमात आपल्या प्लॅटफॉर्म फी मध्ये वाढ करण्याचे ठरविल्याने ग्राहकांच्या खिशाला नवा चाट पडणार आहे. माहिती नुसार, कंपनीने आपल्या प्लॅटफॉर्म फी मध्ये १० रूपयांवरुन १२ रूपयांना वाढ करण्याचे ठरवले आहे त्यामुळे ग्राहकांच्या एकूण बिलात आता २०% पर्यंत वाढ होऊ शकते. कंपनीने यावर अजूनही अधिकृत घोषणा केली नसली तरी कंपनीने अतिरिक्त शुल्क आ कारण्यास यापूर्वीच आठवड्याच्या सुरुवातीला अंमलबजावणी सुरू केली असल्याचे ग्राहक म्हणत आहेत.


प्रतिस्पर्धी स्विगीचा फी मध्ये अद्याप कुठलाही बदल झाला नसून यावर कुठलीही प्रतिक्रिया झोमॅटोसह स्विगीने दिली नाही. दुसरीकडे बहुतांश ब्रोकरेज कंपन्यांनी इटर्नल (Zomato) कंपनीच्या शेअरला होल्डचा सल्ला दिला असून या ब्रोकरेज कंपन्यांच्या मते शे अर्समध्ये भविष्यात फायदा होऊ शकतो. तरीही आज इटर्नल (Zomato) शेअर ०.७८% उसळला असून प्रतिस्पर्धी कंपनी स्विगीचा शेअर ०.३६% उसळला आहे. आगामी सणासुदीच्या काळात तसेच वाढलेल्या क्रयशक्तीमुळे उपभोगात (Consumption) वाढ होण्याची शक्यता असल्याने या सेक्टरला मोठ्या प्रमाणात मागणी राहू शकते याचं कारणांमुळे या सेक्टरसह स्विगी व झोमॅटोसह इतर फूड डिलिव्हरी कंपन्यांनी आज शेअर बाजारात समाधानकारक कामगिरी केली आहे.


सीईओ दीपिंदर गोयल यांच्या नेतृत्वाखाली झोमॅटोने मार्जिन सुधारण्यासाठी आणि नफ्याकडे वाटचाल करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून वेळोवेळी आपल्या व्यासपीठावरील फी मध्ये वाढ केली आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये प्रथम २ रूपयांपर्यंत  शुल्क लागू केले. तेव्हापासून, झोमॅटोने अनेक वेळा शुल्क वाढवले आहे. २०२३ मध्ये ते ३ रूपयापर्यंत वाढवण्यात आले नंतर १ जानेवारी २०२४ रोजी ४ रूपयांपर्यंत वाढवण्यात आले. ३१ डिसेंबर २०२३ रोजी, शुल्क तात्पुरते ९ रूपयांपर्यंत वाढवण्यात आले, नंतर ऑक्टोबर २०२४ मध्ये ते ७ रूपयावर निश्चित केले गेले. त्याच महिन्याच्या शेवटी, झोमॅटोने उत्सवाच्या हंगामात ते आणखी वाढवून १० पर्यंत वाढवण्यात आले आणि त्याला उत्सवकालीन प्लॅटफॉर्म शुल्क असे कंपनीकडून संबोधले गेले होते. जलद व्यापार आणि बाहेर जाणाऱ्या व्यव सायांमध्ये सतत गुंतवणूक केल्याने इटर्नलने जून तिमाहीत २५ कोटींचा एकत्रित निव्वळ नफा नोंदवला. कंपनीने मागील वर्षीच्या कालावधीत २५३ कोटींचा निव्वळ नफा नोंदवला होता.

Comments
Add Comment

Hdfc Bank: देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकेचा मजबूत तिमाही निकाल बँकेच्या निव्वळ नफ्यात ११% वाढ

मोहित सोमण: देशातील सर्वात मोठी खाजगी बँक म्हणून ओळखली जाणारी एचडीएफसी बँक (HDFC Bank) आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे.

मनपा निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकल्यानंतर २४ तासांच्या आत मंत्रिमंडळाची बैठक, झाले महत्त्वाचे निर्णय

मुंबई : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचा निकाल शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर झाला. या निकालानुसार

44-Hour Water Block : मुंबईतील धारावीसह पूर्व आणि पश्चिम उपनगर येत्या मंगळवारपासून ४४ तासांचा पाणी ब्लॉक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई : महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्‍या मेट्रो लाईन ७ अ प्रकल्पाच्या

लवकरच बांगलादेशी आणि रोहिंग्यांविरोधात कारवाई होणार, मंत्री नितेश राणेंनी दिली माहिती

मुंबई : राज्यातील २९ पैकी २३ महापालिकांवर महायुतीचा झेंडा फडकला आहे. मुंबईसह २१ महापालिकांमध्ये भाजप तर ठाणे आणि

Nitesh Rane : 'हा' तर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचा करिश्मा!"- महायुतीच्या विजयानंतर नितेश राणेंकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) महायुतीने मिळवलेल्या

३०००० कोटी मालमत्तेतील वाद शिगेला? करिष्मा कपूरला दोन आठवड्यात खुलासा करण्याचे न्यायालयाकडून आदेश

नवी दिल्ली: करिष्मा कपूर व प्रिया कपूर यांच्यातील मालमत्तेतील वाद आता नव्या उंचीवर पोहोचवण्याची शक्यता वर्तवली