नागपूर : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांची १८ वर्षांनंतर नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून मिळालेल्या जामिन आदेशानंतर बुधवारी दुपारी त्यांची सुटका झाली. गवळी यांच्या सुटकेमुळे नागपूरसह मुंबईत आणि राजकीय वर्तुळात हलचल निर्माण झाली आहे. सुटकेच्या वेळी मीडियाचा प्रचंड जमाव तुरुंगाबाहेर गोळा झाला होता. मात्र पोलिसांनी सुरक्षा कारणास्तव गवळी यांची सुटका थेट मागच्या गेटने केली. त्यामुळे मीडियाला चकवा देत त्यांना बाहेर काढण्यात आले. या प्रकारामुळे पत्रकार व नागरिकांमध्ये उत्सुकता अधिकच वाढली.
सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
अरुण गवळी यांना सर्वोच्च न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला होता. त्यानुसार नागपूर मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांची मुक्तता केली. गवळी यांना हा दिलासा मिळाल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
नगरसेवक हत्याप्रकरणी भोगत होता शिक्षा
गवळीला शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. गेल्या १८ वर्षांपासून तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. आता जामिनावर सुटका झाल्यानंतर गवळीच्या भविष्याच्या हालचालींकडे सर्वांचे लक्ष वेधले जात आहे. अरुण गवळी हा केवळ अंडरवर्ल्डपुरता मर्यादित नसून, त्यांनी राजकारणातही पाऊल टाकले होते. त्यामुळे त्यांच्या सुटकेनंतर मुंबईच्या राजकीय व गुन्हेगारी वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. गवळीच्या पुढील कृतींवर आणि हालचालींवर राज्यातील सुरक्षा यंत्रणांचे बारकाईने लक्ष असेल.
परळी : परळी रेल्वे स्थानक परिसरात अवघ्या चार वर्षांच्या बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात दुःख, संताप आणि ...
कुख्यात गॅंगस्टर अरुण गवळी अखेर तुरुंगातून बाहेर
कुख्यात गॅंगस्टर अरुण गवळी सुटकेनंतर नागपूरहून विमानाने थेट मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. विमानतळ परिसरात गोंधळ होऊ नये म्हणून कडेकोट सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मुंबईत २००७ मध्ये शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या भरदिवसा घाटकोपर येथील निवासस्थानी झालेल्या निर्घृण हत्येप्रकरणी अरुण गवळी याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. त्यानंतर तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. गेल्या १८ वर्षांपासून गवळी जामिनासाठी सतत कायदेशीर प्रयत्न करत होता. अखेर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी त्याला जामीन मंजूर केला. या निर्णयानंतर त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला. नागपूर तुरुंगातून बाहेर पडतानाच त्याच्यावर पुन्हा एकदा प्रचंड प्रकाशझोत पडला आहे. कुख्यात गॅंगस्टर असूनही गवळीने राजकारणात प्रवेश केला होता आणि त्याचा प्रभाव काही भागांत दिसून येत होता. त्यामुळे त्याच्या सुटकेनंतर पुन्हा एकदा मुंबईतील राजकीय आणि गुन्हेगारी वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. पुढील काळात गवळी कोणत्या मार्गाने वाटचाल करतो, याकडे राज्यातील गुप्तचर यंत्रणांसह सर्वांचे लक्ष लागले आहे.
भरदिवसा शिवसेना नगरसेवकाची हत्या
मुंबईतील घाटकोपर येथे २००७ साली शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांची त्यांच्या राहत्या घरी भरदिवसा निर्घृण हत्या करण्यात आली होती. या थरारक हत्याकांडामुळे संपूर्ण मुंबई हादरली होती आणि याच प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली होती. गेल्या १८ वर्षांपासून गवळी नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. अनेक वर्षांच्या कायदेशीर लढ्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने अखेर त्याला जामीन मंजूर केला. या निर्णयामुळे त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला असून समर्थकांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी त्यासंदर्भातील अटी आणि शर्ती निश्चित करण्याची जबाबदारी मुंबई सत्र न्यायालयावर सोपवण्यात आली होती. या न्यायालयाने ठरवलेल्या अटी-शर्ती औपचारिकरित्या नोंदवल्यानंतरच गवळीच्या मार्गातला शेवटचा कायदेशीर अडसर दूर झाला. मुंबई सत्र न्यायालयातून आलेल्या जामिनासंदर्भातील आदेशाची प्रत नागपूर मध्यवर्ती कारागृह प्रशासनाला मिळाल्यावर औपचारिक कार्यवाही पूर्ण करण्यात आली. त्यानंतर अखेर आज अरुण गवळीची सुटका करण्यात आली.