रोहित शर्माने घटविले तब्बल २० किलो वजन

मुंबई : रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून, वनडे क्रिकेटमध्ये सक्रिय आहे. बंगळुरूतील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये ब्राँको टेस्ट उत्तीर्ण झाल्यानंतर त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याने २० किलो वजन कमी केले असल्याचे समोर आले आहे.

भारताचा एकदिवसीय क्रिकेट कर्णधार रोहित शर्माचा फिटनेस नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. एकीकडे ३८ वर्षीय रोहित शर्माच्या भविष्यावर प्रश्न उपस्थित होत असतानाच तो मात्र खेळण्याच्या दृष्टीने सर्व प्रयत्न करताना दिसत आहे. नुकताच त्याच्या एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो केवळ वनडे क्रिकेटमध्ये सक्रिय आहे. आता तो ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका खेळाताना दिसू शकतो. दरम्यान, त्यापूर्वी रोहित शर्मा आणि काही भारतीय खेळाडू बंगळुरूतील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये उपस्थित होते. यावेळी त्यांची ब्राँको टेस्ट घेण्यात आली होती. त्यात रोहित उत्तीर्ण झाला आहे. बीसीसीआयने काही दिवसांपूर्वीच खेळाडूंसाठी ब्रँको टेस्ट अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे काही भारतीय खेळाडू बंगळुरूमध्ये उपस्थित होते. दरम्यान, ही टेस्ट यशस्वी पूर्ण केल्यानंतर रोहित मुंबईला परत येत असतानाचा त्याच्या विमानतळावरील व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये रोहितने वजन कमी केल्याचे स्पष्ट दिसत आहे. तो स्लीम झाल्याचे दिसत आहे.

टीकाकारांना दिले फिटनेसवरुन उत्तर


काही महिन्यांपूर्वी रोहित शर्मा आपल्या फिटनेसवरून प्रचंड ट्रोल झाला होता. एका वेळी एअरपोर्टवर दिसलेल्या त्याचा पोटाचा घेर वाढल्यामुळे चाहत्यांनी त्याला चांगलंच सुनावलं होतं. त्याच्या ‘बेली फॅट’मुळे लोकांनी प्रश्न उपस्थित केले होते की, तो २०२७ च्या वनडे वर्ल्डकपसाठी तंदुरुस्त राहील का? अशा शंका उपस्थित झाल्यानंतर रोहितने मेहनतीने वजन कमी करून आणि ब्रॉन्को टेस्ट उत्तीर्ण करून टीकाकारांना थेट प्रत्युत्तर दिले आहे. यामुळे तो केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही आगामी सामन्यांसाठी सज्ज असल्याचे स्पष्ट झालं.
Comments
Add Comment

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण

सिडनी ODI मध्ये ऑस्ट्रेलिया ऑलआऊट

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. ही मालिका ऑस्ट्रेलियाने आधीच २ - ०

ऑस्ट्रेलियाच्या भारताविरुद्धच्या एकदिवसीय टी-२० संघात मोठे फेरबदल! ग्लेन मॅक्सवेल आणि बेन ड्वार्शुइस अखेरच्या टप्प्यात संघात परतणार

मुंबई: भारताविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेसह आगामी टी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात अनेक

षटकारांचा राजा उपाधीपासून रोहित सहा पावले दूर

मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा माजी कर्णधार रोहित