मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकाची अखेर घसरणीत झाली आहे. सकाळच्या सत्रात शेअर बाजारात वाढ झाली असली तरी अस्थिरतेचा धोका कायम होता. मिड व स्मॉल कॅप समभागातील वाढ अखेरच्या सत्रात मात्र लार्जकॅप समभागातील घसर णीमुळे पथ्यावर पडली नाही. अंतिमतः बाजारात घसरणच झाली. बाजार बंद होताना सेन्सेक्स २०६.६१ अंकाने कोसळत ८०१५७.८८ पातळीवर व निफ्टी ४५.४५ अंकाने कोसळत २४५७९.६० पातळीवर स्थिरावला आहे. आज अखेरच्या सत्रात बँक निर्देशांकात ही घसरण झाल्याने बाजारात सपोर्ट लेवल मिळू शकली नाही.सेन्सेक्स बँक निर्देशांकात ४०९.०५ अंकांनी व बँक निफ्टी ३४१.४५ अंकाने कोसळला आहे. सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.२७%,०.६४% घसरण झाली आहे. निफ्टी मिडकॅप व स्मॉल कॅपमध्ये अनुक्रमे ०.२२%,०.२७% वाढ झाली आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात आज जीएसटीचा पगडा कायम राहिला आहे .अखेरीस क्षेत्रीय निर्देशांकात सकाळप्रमाणेच संमिश्र प्रतिसाद कायम राहिला आहे. सर्वाधिक वाढ एफएमसीजी (१.१२%), मिडिया (०.९८ %), मेटल (०.८५%), रिअल्टी (०.७२%) निर्देशांकात झाली असून सर्वाधिक घसरण खाजगी बँक (०.७०%), फायनांशियल सर्विसेस २५/५० (०.५६%), मिडस्मॉल आयटी टेलिकॉम (०.५९%) निर्देशांकात झाली आहे.
आज दिवसभरात अस्थिरतेचे वलय कायम असल्याने अखेर ब्लू चिप्स कंपनीच्या स्क्रिपमध्ये आज घसरण झाली आहे. बडे शेअर एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, एसबीआय कार्ड, एम अँड एम यांसारख्या शेअर्समध्ये नुकसान झाल्याने बा जार निर्देशांक घसरणीस पात्र ठरला आहे. दुसरीकडे रिलायन्स इंडस्ट्रीज, एमआरएफ, नेस्ले इंडिया, सिमेन्स अशा शेअर्समध्ये वाढ झाल्याने अतिरिक्त घसरण रोखण्यासाठी मदत झाली. आज दिवसभरात अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) हा -१ पातळीवरुन ०.९५% म्हणजेच जवळपास १% पर्यंत उसळल्याने बाजारातील समीकरणे अखेरच्या सत्रात बदलली आहेत.
प्रामुख्याने उद्यापासून म्हणजेच ३,४ सप्टेंबरला जीएसटी काऊन्सिलची बैठक होणार आहे ज्यामध्ये वस्तूवरील जीसटी कपातीविषयी आणखी माहिती प्रकाशित होणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी या घडामोडीकडे लक्ष केंद्रित केल्याने बाजारात त्यांनी वेट अँड वॉचचे धोरण अवलंबले आहे. याखेरीज डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील संबंध आणखी ताणले जाऊ शकतात अशा आशयाचा बातम्या प्रसारमाध्यमांनी दिल्यामुळे गुंतवणूकदारांवर व निर्यातदारांवर दबाव निर्माण झाला आहे. याखेरीज अमेरि केतील आगामी पीएमआय (Purchasing Manager Index PMI) कडे गुंतवणूकदारांनी लक्ष केंद्रित केले आहे. रशिया व अमेरिका यांच्यातील शीतयुद्ध पुन्हा एकदा सुरु झाल्याने आज तेलाच्या निर्देशांकातही दबाव निर्माण झाला होता. जागतिक सोन्याच्या नि र्देशांकात आज वाढ झाली असून डॉलरच्या तुलनेत रुपयाची आणखी घसरण झाल्याने रूपया निचांकी पातळीवर पोहोचला आहे. डॉलर निर्देशांकात वाढ झाल्याने अस्थिरतेपाई आज पुन्हा एकदा परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (Foreign Institutional Investors FII) आपली गुंतवणूक काढून घेतल्याची शक्यता नाकारता येत नाही.
सोमवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी इक्विटीजमध्ये १४३० कोटींची रोख विक्री केली, परंतु घरगुती गुंतवणूकदारांकडून ४३४५ कोटी गुंतवणूक केली गेली. डेरिव्हेटिव्ह डेटाने २४५०० सपोर्टवर मजबूत पुट रायटिंग आणि २५००० रेझिस्टन्सवर हेवी कॉल ओआय दाखवला आहे. पीसीआर (Pull to Call Ratio PCR) आज १.१२ पर्यंत वाढला ज्यामुळे बाजारात फंडामेंटल मजबूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीही यापूर्वीच विश्लेषकांनी सावध आशावादाच्या पार्श्वभूमीवर ऑटो, एफएमसीजी आणि ग्राहकोपयोगी वस्तूंवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला होता. नेमके तसेच बाजारात घडत आहे. याशिवाय विकली एक्सपायरीचा पार्श्वभूमीवर बाजारात सेल ऑफची शक्यता नाकारता येत नाही. अशा बहुरंगी बहुढंगी कारणांमुळे आज बाजारात घसरण झाली.
आज बीएसईत (BSE) ४२८५ समभागातील (Stocks) २५३१ समभागात वाढ झाली असून १६१४ समभागात घसरण झाली आहे. एनएसईत (NSE) ३१३२ समभगापैकी १९२९ समभागात वाढ झाली असून १११७ समभागात घसरण झाली आहे. विशेषतः एनएस ईत आज १५१ शेअर अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत. आज संध्याकाळपर्यंत सोन्याच्या जागतिक गोल्ड फ्युचर निर्देशांकात १.०८% इतकी मोठी वाढ झाली आहे. कच्च्या तेलाच्या WTI Futures निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ३.००% इतकी प्रचंड मोठी वाढ झाली असून कच्च्या तेलाच्या Brent Future निर्देशांकात २.७२% इतकी मोठी वाढ झाली आहे.
आजच्या युएसमधील सुरूवातीच्या कलात डाऊ जोन्स (०.६२%), एस अँड पी ५०० (०.६४%), नासडाक (१.१५%) या तिन्ही बाजारात घसरण झाली आहे. तसेच युरोपियन बाजारातील तिन्ही एफटीएसई (०.४४%), सीएससी (०.०७%), डीएएक्स (१.४२%) बाजा रात घसरण झाली आहे. आशियाई बाजारातील गिफ्ट निफ्टी सपाट असून निकेयी (०.०७%) स्ट्रेट टाईम्स (०.५२%), जकार्ता कंपोझिट (०.८४%) बाजारात वाढ झाली असून हेंगसेंग (०.५२%), शांघाई कंपोझिट (०.४५%), तैवान वेटेड (०.२३%) निर्देशांकात घसरण झाली आहे.
अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ श्री रेणका शुगर (१२.६८%), सम्मान कॅपिटल (११.११%), रेमंड लाईफस्टाईल (६.५४%), एमआरएफ (६.२५%), जेके टायर (६.०३%), सीएट (५.३९%), केईसी इंटरनॅशनल (५.३८%), रेल विकास (५.१२%), बलरामपूर चिनी (४. ६५%), बीईएमएल (४.७३%), एनएमडीसी (४.५७%), अपोलो टायर्स (४.३२%), सन टीव्ही नेटवर्क (४.१४%), डाबर इंडिया (४.००%), टाटा कंज्यूमर (२.३३%), नेस्ले इंडिया (२.२६%), सिमेन्स (१.६४%), नेटवेब टेक्नॉलॉजी (१.५१%), टाटा स्टील (१.४२%), रिलायन्स इंडस्ट्रीज (१.००%) समभागात वाढ झाली आहे.
अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण गॉडफ्रे फिलिप्स (४.८३%), सारडा एनर्जी (४.०३%), जीएनफसी (४.०६%), सुंदरम फायनान्स (३.२३%), लेमन ट्री हॉटेल (२.९१%), एम अँड एम (२.४४%), एसबीआय कार्ड (२.१५%), एमसीएक्स (१.८९%), आयनॉक्स इंडिया (१.५६%), वर्धमान टेक्सटाईल (१.४५%), कोटक महिंद्रा बँक (१.३३%), आयसीआयसीआय बँक (१.१९%), एचडीएफसी बँक (०.६२%) समभागात झाली आहे.
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,'जीएसटी कौन्सिल बैठकी आणि एफ अँड ओ एक्सपायरीच्या आधीच्या सावधगिरीमुळे देशांतर्गत शेअर बाजा रांनी सुरुवातीच्या वाढीला मागे टाकले, नफा बुकिंगमध्ये घट झाली. बँकिंग शेअर्स घसरणीचे नेतृत्व करत होते. इथेनॉल नियम शिथिल केल्यामुळे साखरेचे शेअर्स तेजीत होते, तर निर्यात-केंद्रित कंपन्यांनी अमेरिकेच्या नकारात्मक टीकेनंतर तेजीत वाढ केली, ज्या मुळे व्यापार आशावाद पुन्हा निर्माण झाला. तथापि, गुंतवणूकदार सावध राहिले आहेत, जागतिक अनिश्चिततेमुळे जवळच्या काळात देशांतर्गत वापरावर लक्ष केंद्रित केले जाईल.'
आजच्या बाजारातील परिस्थितीवर तांत्रिक विश्लेषण करताना एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक नागराज शेट्टी म्हणाले आहेत की,' सोमवारी २४३०० पातळीच्या आधार पातळीच्या जवळून तीव्र वाढ झाल्यानंतर, मंगळवारी निफ्टी उच्च अस्थिरतेमध्ये कमकुवत स्थितीत घसरला आणि कमकुवत नोटवर बंद झाला. दैनिक चार्टवर एक लहान लाल मेणबत्ती तयार झाली ज्यामध्ये लांब वरचा सावली होती. तांत्रिकदृष्ट्या, ही बाजाराची कृती २४७०० पातळीच्या तात्काळ अडथळ्याच्या जवळून वि क्रीचा दबाव उदयास येत असल्याचे दर्शवते.
निफ्टीचा अल्पकालीन अपट्रेंड अबाधित आहे आणि २४३००-२४२०० पातळीचे महत्त्वाचे खालचे समर्थन अल्पकालीन अस्थिरतेमध्ये संरक्षित केले जाऊ शकते. या समर्थनांपर्यंत कोणतीही घसरण पुढील १-२ सत्रांसाठी खरेदीची संधी असण्याची अपेक्षा आहे. तथा पि २४७५० पातळीच्या प्रमुख प्रतिकारापेक्षा जास्त निर्णायक वाढ नजीकच्या काळात अधिक शॉर्ट कव्हरिंग उघडण्याची शक्यता आहे.'
आजच्या बाजारातील निफ्टी पोझिशनवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक रूपक डे म्हणाले आहेत की,' २१ ईएमए (Exponential Moving Average EMA) वर निफ्टीला जोरदार नकार मिळाला, ज्यामुळे इंट्राडेम ध्ये मोठी घसरण झाली. बाजार २४८५० पातळीच्या वर परत येईपर्यंत विक्री-वाढीच्या स्थितीतच राहतो. दैनिक आरएसआय (Relative Strength Index RSI) ५० च्या खाली वाचनासह मंदीच्या क्रॉसओवरमध्ये आहे. अल्पावधीत, हा ट्रेंड कमकुवत राहण्याची शक्यता आहे. खालच्या टोकाला, आधार (Support) २४५०० पातळीवर आहे, तर वरच्या टोकाला (Upside Level) प्रतिकार (Resistance) २४७०० आणि २४८५० पातळीवर आहेत.'
आजच्या बाजारातील रूपयावर प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,' भारताच्या जीएसटी कपातीच्या निर्णयाबाबतच्या आशावादामुळे वापराला पाठिंबा मिळण्याची आणि चालू असले ल्या टॅरिफ दबावाचा नकारात्मक परिणाम अंशतः भरून काढण्याची अपेक्षा असल्याने रुपया ०.०५ च्या वाढीसह ८८.१६ वर किंचित सकारात्मक व्यवहार करत होता. तथापि, डॉलर ९८.३० वर स्थिर राहिला, ज्यामुळे उदयोन्मुख चलनांवर एकूण दबाव कायम रा हिला, तर कच्च्या तेलाचाही ६५.९५ वर सकारात्मक व्यवहार झाला, ज्यामुळे रुपयामध्ये काही जवळच्या काळात कमकुवतपणा येऊ शकतो. एफआयआय अजूनही सावध असल्याने आणि त्यांची विक्रीची भूमिका कायम ठेवत असल्याने, अस्थिरता राहण्याची अपेक्षा आहे. जवळच्या काळात, रुपयाची व्यापार श्रेणी ८७.८५ - ८८.४० दरम्यान दिसू शकते.'
आजच्या बाजारातील सोन्याच्या हालचालींवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'सोन्याचा भाव अस्थिरतेने $३४८१ वर व्यवहार झाला, ज्यामध्ये किरकोळ वाढ दिसून आली कारण उच्च झोनमध्ये नफा बुकिंग सुरू झाली. एमसीएक्स (MCX) वर, सोन्याने १०५३४० रूपयांचा उच्चांक नोंदवला आणि नंतर नफा बुकिंगवर १०४५०० रूपयांपर्यंत घसरले, हे मुख्यत्वे रुपयाच्या मजबूतीमुळे आणि $३५०० च्या जवळ COMEX मध्ये थोडासा प्रतिकार झा ल्यामुळे झाले. या आठवड्यातील US डेटा, ISM सेवा, व्यापार संतुलन आणि बिगर-शेती वेतनांसह, भावनेला मार्गदर्शन करण्यासाठी महत्त्वाचा असेल, कारण फेड धोरण अपेक्षा दृष्टिकोनाच्या केंद्रस्थानी राहतील. COMEX वर $३५१० किंवा MCX वर १०५५०० रूपयांच्या वर सतत ब्रेक तेजी वाढवू शकतो, तर $३४५०/$१०४००० तात्काळ आधार म्हणून काम करतात.'
त्यामुळे आज बाजारातील अस्थिरता संध्याकाळपर्यंत कायम राहिल्याने बाजारात गुंतवणूकदारांचे आज पुन्हा एकदा नुकसान झाले आहे. दरम्यान अनेक गुंतवणूकदारांनी नफा बुकिंग केल्याचीही शक्यता असून उद्या जीएसटी काऊन्सिलची बैठक शेअर बाजारा साठी नवा ट्रिगर असणार असून गुंतवणूकदारांनी निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात बारकाईने गुंतवणूक केल्यास त्यावर लाभ होऊ शकतो.