गणेशोत्सवात पैठणी सिल्कचा डौल!

सौंदर्य तुझं : प्राची शिरकर


गणेशोत्सव म्हटलं की महाराष्ट्रात घराघरांत आनंदाचं वातावरण असतं. बाप्पाची आराधना, सजावट, आरत्या आणि प्रसाद यासोबतच स्त्रियांचा पोशाखही या उत्सवाचं मोठं आकर्षण असतो. अशातच पैठणी ही महाराष्ट्राची अभिमानास्पद साडी. तिचा उगम पैठण नगरीत झाला आणि मोर, कमळ, काशीबाई पाट अशा नक्षीकामामुळे ती आज जगभर प्रसिद्ध आहे. पारंपरिक लग्नसमारंभ, पूजाविधी, दीर्घकालीन संग्रह, गणेशोत्सव या सर्वांसाठी पैठणी साडी नेहमीच खास मानली जाते. महाराष्ट्राची शान मानली जाणारी पैठणी सिल्क साडी तर या परंपरेतलं सर्वात चमकदार पान आहे. शतकानुशतकं हातमागावर विणली जाणारी ही साडी आजही तिच्या नाजूक झरीकाम, पदरावरील सुंदर बुट्टे आणि रंगीबेरंगी डिझाईन्समुळे स्त्रियांच्या मनावर राज्य करते. यंदा मात्र एक खास गोष्ट दिसून येतेय, गणेशोत्सवात बहुतेक महिलांनी परिधान करण्यासाठी पैठणी सिल्क साडीची निवड केली आहे. पैठणी सिल्कमध्ये आता नवीन डिझाइन्स, रंग आपल्याला पाहायला मिळतात. आज या लेखातून आपण जाणून घेऊया स्त्रियांवर बहरणारं पैठणी सिल्कचं सौंदर्य...


पैठणी परंपरेचा वारसा
पैठणी ही केवळ एक साडी नाही, तर महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे. नाजूक झरीकाम, चमकदार रंग, पदरावरील मोर व फुलांची नक्षी, आणि हातमागाची कलाकुसर या सगळ्यामुळे पैठणीचं सौंदर्य अगदी वेगळं भासतं. त्यामुळे उत्सवाच्या मंगल वातावरणात पैठणी नेसल्यावर स्त्रियांचं व्यक्तिमत्त्व अधिक खुलून दिसतं. गणपतीत पैठणी परिधान करण्यामागे दडलेलं सांस्कृतिक सौंदर्य.



शुभत्व आणि ऐश्वर्याचा प्रतीक :
गणपती हा मंगलकार्यांचा देव मानला जातो. त्यामुळे गणपती दर्शनासाठी, आरतीसाठी किंवा मानाच्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी पैठणी परिधान केली जाते.
फोटोजेनिक लूक :
गणपतीत प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद होतो. पैठणी साडीतील रंगीत बॉर्डर आणि सोनेरी झरी प्रकाशात खुलून दिसतात.



परंपरा आणि आधुनिकता :
पारंपरिक साडी असूनही आजच्या कटिंग, ब्लाउज डिझाईन आणि फ्युजन ड्रेपिंगमुळे पैठणी आधुनिक रुपातही दिसते.


१. सोबर मेकअप
पैठणी साडी रंगीत आणि झगमगाट असते. त्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो दिसावा यासाठी साधा बेस ठेवणे उत्तम. स्किन टोननुसार
फाऊंडेशन आणि हलका हायलायटर वापरावा.



२. डोळ्यांचा मेकअप
साडीनुसार गोल्डन, ग्रीन, पर्पल किंवा पिंक शेड्स आयशॅडोमध्ये वापरता येईल. काजळ आणि आयलाईनरने डोळ्यांना उठाव द्यावा. पारंपरिक लूकसाठी विंग्ड आयलाईनर छान उठून दिसेल. थोडासा शिमरी आयशॅडो पापण्यांवर लावल्यास साडीला मॅच होतो.


३. ओठांचा मेकअप
पैठणीचा झगमगाट लक्षात घेता रेड, मरून, डार्क पिंक शेड्स उत्तम पैठणीवर उठून दिसतात. जर डोळ्यांचा मेकअप जड असेल, तर ओठ हलक्या न्यूड शेडमध्ये ठेवावेत.


४. ब्लश आणि हायलायटर
हलका पिच, कोरल किंवा रोज ब्लश गालांवर सुंदर दिसतो. हायलायटर गालावर, नाकावर आणि कपाळावर हलकासा लावला तर तुमचा लूक चमकेल.



अशी करा केशरचना



१. जुडा : •पैठणीसोबत पारंपरिक गजरा लावलेला जुडा सर्वात सुंदर दिसतो. मेसी बनमध्येही गजरा लावल्यास क्लासी आणि ट्रेंडी लूक मिळतो.
२. वेण्या : •फिशटेल वेणी, साइड ब्रेड किंवा पारंपरिक लांब वेणी पैठणीशी जबरदस्त दिसते. वेणीला मोगऱ्याचा गजरा गुंडाळल्यास अधिकच पारंपरिक लूक येतो.
३. ओपन हेअर : •जर कार्यक्रम हलकाफुलका असेल, तर कर्ल्स किंवा वेव्ह्स केलेले ओपन हेअर सुंदर दिसतात. •माथापट्टी किंवा लहान दागिन्यांनी सजवल्यास लूक अजून
उठावदार होतो.
४. मॉडर्न टच : •आजकाल लो बन विथ हेअर ॲक्सेसरीज, ट्विस्टेड पोनीटेल किंवा हाफ अप-हाफ डाउन स्टाईल्स पैठणीसोबत घेतल्या जातात. •यामुळे पारंपरिकता आणि आधुनिकता यांचा छान मिलाफ दिसतो.


अभिमानाची परंपरा : गणेशोत्सवात पैठणी नेसणं ही केवळ परंपरा नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अभिमानही आहे. जुन्या पिढीकडून नवी पिढीकडे वारशासारखी पोहोचणारी पैठणी ही आज आधुनिकतेतही आपली चमक कायम ठेवते.


 

Comments
Add Comment

नाचणीचे बिस्कीट

सुग्रास सुगरण : गायत्री डोंगरे दिवाळीचा फराळ म्हटलं की गोड, तूप, साखर आणि सुगंध यांचा संगम आठवतो. पण आजच्या

योगियांची दिवाळी

मी योगिनी : डॉ. वैशाली दाबके दीपावलीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा. ही दीपावली सर्वांना आरोग्यदायी आणि मनाला

रंगभूमीची तेजस्विता

कर्तृत्ववान ती राज्ञी  : ‘पद्मश्री नयनाताई अपटे-जोशी’ भारतीय कला-संस्कृतीचा पट जितका रंगीबेरंगी आहे, तितकाच

गर्भावस्थेतील मातृ स्थूलता आणि तिचा परिणाम

स्त्री आरोग्य : डॉ. स्नेहल पाटील गर्भावस्था ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची अवस्था असते. या

तिच्या मनातील पाडवा

सौंदर्य तुझं : प्राची शिरकर फक्त प्रेम, सन्मान आणि आपुलकीचा दिवाळी म्हणजे आनंद, प्रकाश, प्रेम आणि एकत्रतेचा सण. या

तरुणाईची ‘नेल एक्सटेन्शन’ची फॅशन!

आजच्या तरुणाईमध्ये नेल एक्सटेन्शन हा फॅशन आणि सौंदर्याचा नवा ट्रेंड झपाट्याने लोकप्रिय होत आहे. आकर्षक आणि