दुबई : भारतात ३० सप्टेंबरपासून महिला वनडे विश्वचषक सुरु होत आहे. आयसीसीने या स्पर्धेसाठी बक्षीस रकमेची घोषणा केली आहे. यावेळी विश्वचषक जिंकणाऱ्या संघावर भरपूर पैशांचा पाऊस पडणार आहे. महिला विश्वचषक जिंकणाऱ्या संघासाठी आयसीसीने ४.४८ दशलक्ष डॉलर्स (३९.४ कोटी) बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. जी २०२२ मध्ये खेळल्या गेलेल्या वनडे विश्वचषकापेक्षा ४ पट जास्त आहे. २०२२ चा महिला विश्वचषक ऑस्ट्रेलियाने जिंकले होते.
२०२३ च्या पुरुष वनडे विश्वचषकापेक्षा बक्षीस रक्कम खूपच जास्त आहे. आठ संघांच्या या स्पर्धेची एकूण बक्षीस रक्कम १३.८८ दशलक्ष डॉलर्स आहे. जी २०२२ मध्ये न्यूझीलंडमध्ये झालेल्या गेल्या महिला विश्वचषकाच्या ३.५ दशलक्ष डॉलर्सच्या रकमेपेक्षा २९७ टक्के जास्त आहे. या महिला विश्वचषकाची एकूण बक्षीस रक्कम २०२३ च्या आयसीसी पुरुष विश्वचषकाच्या बक्षीस रकमेपेक्षाही जास्त आहे. २०२३ च्या वनडे विश्वचषकासाठी एकूण बक्षीस रक्कम १० दशलक्ष डॉलर्स होती.
सर्वच संघांना मिळणार बक्षीस
यावेळी उपविजेत्या संघाला २.२४ दशलक्ष डॉलर्स मिळतील. तर उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या दोन्ही संघांना १.१२ दशलक्ष डॉलर्स मिळतील. तर गट-टप्प्यात प्रत्येक सामना जिंकणाऱ्या संघांना ३४,३१४ डॉलर्स मिळतील. तर पाचव्या आणि सहाव्या स्थानावर असलेल्या संघांना ७,००,००० डॉलर मिळतील, तसेच सातव्या आणि आठव्या स्थानावर असलेल्या संघांना २,८०,००० डॉलर्स मिळतील. त्याच वेळी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाला २,५०,००० डॉलर्स मिळतील.
बक्षीसाच्या रकमेत चार पट होणार वाढ
बक्षीस रकमेची घोषणा करताना आयसीसीचे अध्यक्ष जय शहा म्हणाले की, ही घोषणा महिला क्रिकेटच्या प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा आहे. बक्षीस रकमेत ही चार पट वाढ महिला क्रिकेटसाठी एक ऐतिहासिक क्षण आहे आणि त्यांच्या दीर्घकालीन विकासासाठी आमची स्पष्ट वचनबद्धता दर्शवते. आमचा संदेश सोपा आहे, महिला क्रिकेटपटूंना हे माहित असले पाहिजे की जर त्यांनी हा खेळ व्यावसायिकपणे खेळण्याचा निर्णय घेतला तर त्यांना पुरुषांइतकेच वागणूक दिली जाईल.
आयसीसी महिला वर्ल्ड कप २०२५ चे वेळापत्रक
मंगळवार, ३० सप्टेंबर : भारत विरुद्ध श्रीलंका - बंगळुरू
बुधवार, १ ऑक्टोबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड - इंदूर
गुरुवार, २ ऑक्टोबर : बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान - कोलंबो
शुक्रवार, ३ ऑक्टोबर : इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका - बंगळुरू
शनिवार, ४ ऑक्टोबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका - कोलंबो
रविवार, ५ ऑक्टोबर : भारत विरुद्ध पाकिस्तान - कोलंबो
सोमवार, ६ ऑक्टोबर : न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका - इंदूर
मंगळवार, ७ ऑक्टोबर : इंग्लंड विरुद्ध बांगलादेश - गुवाहाटी
बुधवार, ८ ऑक्टोबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान - कोलंबो
गुरुवार, ९ ऑक्टोबर : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - विशाखापट्टणम
शुक्रवार, १० ऑक्टोबर : न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश - विशाखापट्टणम
शनिवार, ११ ऑक्टोबर : इंग्लंड विरुद्ध श्रीलंका - गुवाहाटी
रविवार, १२ ऑक्टोबर : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - विशाखापट्टणम
सोमवार, १३ ऑक्टोबर : दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश - विशाखापट्टणम
मंगळवार, १४ ऑक्टोबर : नवीन झीलंड विरुद्ध श्रीलंका – कोलंबो
बुधवार, १५ ऑक्टोबर : इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान – कोलंबो
गुरुवार, १६ ऑक्टोबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश – विशाखापट्टणम
शुक्रवार, १७ ऑक्टोबर : दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका – कोलंबो
शनिवार, १८ ऑक्टोबर : न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान – कोलंबो
रविवार, १९ ऑक्टोबर : भारत विरुद्ध इंग्लंड – इंदूर
सोमवार, २० ऑक्टोबर : श्रीलंका विरुद्ध बांगलादेश – कोलंबो
मंगळवार, २१ ऑक्टोबर : दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान – कोलंबो
बुधवार, २२ ऑक्टोबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड – इंदूर
गुरुवार, २३ ऑक्टोबर : भारत विरुद्ध न्यूझीलंड – गुवाहाटी
शुक्रवार, २४ ऑक्टोबर : पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका – कोलंबो
शनिवार, २५ ऑक्टोबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका – इंदूर
रविवार, २६ ऑक्टोबर : इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड – गुवाहाटी
रविवार, २६ ऑक्टोबर : भारत विरुद्ध बांगलादेश – बंगळुरू
बुधवार, २९ ऑक्टोबर : उपांत्य सामना १ – गुवाहाटी/कोलंबो
गुरुवार, ३० ऑक्टोबर : उपांत्य सामना २ – बंगळुरू
रविवार, २ नोव्हेंबर : अंतिम सामना – कोलंबो/बंगळुरू