पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात महापूर, २० लाख नागरिक झाले बेघर


पंजाब : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात महापूर आला आहे. या पुरामुळे २० लाख नागरिक बेघर झाले आहेत. प्रशासन नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या कामात गुंतले आहे. सरकारने सुरक्षित ठिकाणी नागरिकांसाठी तात्पुरते कॅम्प सुरू केले आहेत. या ठिकाणी बेघर झालेल्यांची सोय करण्यात आली आहे.


आतापर्यंत अनेक पूर आले पण पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या इतिहासातील हा सर्वात मोठा पूर आहे. यामुळे संपूर्ण प्रांताची व्यवस्था पुरती कोलमडली आहे. पहिल्यांदाच सतलुज, चिनाब आणि रावी या तीन नद्यांना एकाचवेळी पूर आला आहे. यामुळे महापुराचे संकट निर्माण झाले आहे. नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करताना प्रशासनाची पुरती दमछाक झाल्याचे चित्र आहे.


भारताने मागच्याच आठवड्यात हवामान खात्याने पावसाबाबत दिलेल्या अंदाजांच्या आधारे पाकिस्तानला महापुराच्या संकटाची माहिती देऊन सावध केले होते. पण पाकिस्तानने पुरेशी खबरदारी घेतली नाही. यामुळे पुराने पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.


पाकिस्तानच्या पंजाब प्रांताची एकूण लोकसंख्या १५ कोटी आहे. यापैकी २० लाख नागरिकांचे पुरामुळे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे. पाकिस्तानचा पंजाब प्रांत हा कृषीप्रधान आहे. पाकिस्तानमध्ये गव्हाचे सर्वाधिक उत्पादन याच पंजाब प्रांतात होते. याआधी २०२२ मध्ये पुरामुळे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील गहू शेतीला मोठा फटका बसला होता. आता महापुरामुळे पुन्हा एकदा गव्हाच्या वार्षिक उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. यंदा १ जुलै ते २७ ऑगस्ट दरम्यान पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात मागच्या वर्षींच्या तुलनेत २६.५ टक्के जास्त पाऊस पडला. मुल्तानमध्ये प्रशासनाने बांध फोडण्यासाठी पाच ठिकाणी स्फोटके बसवली आहेत. थोड्याच वेळात बांध फोडून पाणी शहरांपासून दूर दुसऱ्या दिशेने वळविण्याचा प्रयत्न सुरू आहे.


पुराचे संकट मोठे आहे. आता पाणी अडवणे अशक्य आहे पण पाणी दुसऱ्या दिशेला वळवून मोठ्या नागरी वस्तीला वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहे, अशी महिती प्रशासनाने दिली. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात महापुरामुळे आतापर्यंत ८४९ मृत्यू झाले असून ११३० जण जखमी झाले आहेत. सरकारी शिबिरांमध्ये लाखो नागरिकांचे स्थलांतर झाले आहे. आणखी काही जणांचे स्थलांतर करण्याचे काम सुरू आहे.


Comments
Add Comment

Iran - America War : जॉर्डनमधील हल्ल्यानंतर अमेरिकेचे इराणच्या लष्करी तळांवर हल्ले

वॉशिंग्टन : जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळावरील हल्ल्यानंतर अमेरिकेने इराणविरोधात मोठी लष्करी मोहीम सुरू केली

World Record Flight : हवेत सलग २४ तासांपेक्षा जास्त वेळ! क्वांटास एअरलाइन्सच्या विमानाने रचला ऐतिहासिक जागतिक विक्रम

तुलूझ : ऑस्ट्रेलियन विमान कंपनी ‘क्वांटास’ने (Qantas) नागरी विमान वाहतूक क्षेत्रात एक नवा इतिहास रचला आहे. एका विशेष

Japan : जपान मध्ये कचरा टाकणे UPSC पेक्षाही कठीण; भारतीय महिलेचा अनुभव ,जपानची अनोखी व्यवस्था पाहून भारतीय महिला चक्रावली

जपान : स्वच्छतेबाबत जगभरात जपानचं नाव आदराने घेतलं जातं. तिथे स्वच्छता ही केवळ सरकारी मोहीम नसून प्रत्येक

Pakistan : पाकिस्तानातही कॉकरोच पार्टी, पाकिस्तानच्या जेन - झीची 'ही' मागणी ऐकून शरीफ यांची झोप उडाली ; पाकिस्तानात खळबळ

Pakistan : दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन झाले, नीट पेपरफुटी विरोधात असलेले हे आंदोलन संपूर्ण

Iran vs US : इराणचा अमेरिकेवर मोठा हल्ला करणार? CENTCOMचा धक्कादायक दावा

वॉशिंग्टन : पश्चिम आशियात (West Asia) पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. अमेरिकेच्या (US) सेंट्रल कमांडने (CENTCOM) दावा केला आहे की,

Pakistan Occupied Kashmir : पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलकांवर गोळीबार; १९ जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी

इस्लामाबाद : पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी प्रशासनाविरोधात नागरिकांचा तीव्र उद्रेक झाला असून तेथील