जरांगे विरुद्ध वादात निलेश राणे यांचा नितेश राणेंना थेट पाठिंबा
मुंबई: मनोज जरांगे हे आझाद मैदानात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ऐन गणेशोत्सवात आमरण उपोषणाला बसले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांनी जरांगेवर टिका केली, ज्यावर जरांगे यांची जीभ घसरली. नितेश राणे यांच्यावर सडकून टीका करताना जरांगे यांनी अपशब्द वापरत आंदोलनानंतर बघून घेईल अशी धमकी देखील दिली. आता या वादात नितेश राणे यांचे थोरले बंधू निलेश राणे यांनी देखील उडी घेतली आहे. "जरांगे शब्द जपून वापरा" असा थेट इशाराच निलेश राणे यांनी दिला. तसेच, राणे कोणालाही घाबरत नाहीत, असं म्हणत त्यांनी जरांगे यांना दम भरला आहे.
फेसबुक पोस्टद्वारे जरांगेचा घेतला समाचार
नितेश राणे यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मनोज जरांगे यांचा समाचार घेतला आहे. त्यांनी निलेश राणे यांना पाठिंबा दिला आहे. नितेश राणे एखाद्या विषयावर बोल्यानंतर त्यावर तुम्ही टीका करा पण वैयक्तिक टीका नको. नितेश काही टोकाचं बोलला नाही, किंवा वैयक्तिक बोलला नाही. असे निलेश राणे यांनी म्हंटले आहे. तसेच राणे परिवार कुठल्याही धमकीला कधीच घाबरत नाही. तुम्ही जसे मरायला तयार असता तसेच आम्ही राणे पण मरायला तयार असतो, असा थेट इशाराच निलेश राणे यांनी जरांगे यांना दिला आहे.
तसेच, आमच्या परिवाराच्या सदस्यावर कोणी हात टाकायच्या बाता करत असेल तर ते आम्ही कधीही सहन करणार नाही. भाषा जपून वापरली पाहिजे कारण आम्ही तुम्ही काही परके नाहीत, असा सल्लाही निलेश राणे यांनी जरांगे यांना दिला.
नितेश राणे नेमकं काय म्हणाले होते?
जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईवरून टीका केल्यानंतर त्याला नितेश राणे यांनी आक्षेप घेतला होता. तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनी जरांगे यांची आझाद मैदानावर भेट घेतल्यानंतर. जिहाद मानसिकतेचे लोक जरांगे यांच्या व्यासपीठावर कसे बसतात? असा सवाल केला होता. ज्यावर जरांगे यांनी नितेश राणे यांच्यावर सडकून टीका करताना अपशब्दांचा वापर केला. तिथूनच या जरांगे विरुद्ध राणे असे वादाचे स्वरूप निर्माण झाले.