शक्तिशाली भूकंपाने अफगाणिस्तान हादरले! अनेकांचा मृत्यू... दिल्ली-एनसीआरपर्यंत जाणवले धक्के

कराची: रविवारी ३१ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री पाकिस्तान सीमेजवळ पूर्व अफगाणिस्तानच्या आग्नेय भागात तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले आहे. हा भूकंप इतका शक्तिशाली होता की याचे झटके दिल्ली एनसीआरमध्ये देखील जाणवले आहे. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (यूएसजीएस) नुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.३ इतकी होती. ज्यात २० जणांचा मृत्यू तर १०० हून अधिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. बचावकार्य सुरू आहे. मात्र दुर्गम भागात  मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.


भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घराबाहेर पडले. एनसीआर रहिवाशांनी सांगितले की, भूकंपाचे जोरदार धक्के रात्री उशिरा जाणवले. इमारती हादरल्या, ज्यामुळे लोकं घराबाहेर मोकळ्या जागी पळाले.



भूकंपाचे केंद्र कुठे होते?


यूएसजीएसनुसार, भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानमधील जलालाबादच्या पूर्व-ईशान्येस २७ किमी अंतरावर ८ किमी खोलीवर होते. भारतीय वेळेनुसार रात्री १२.४७ वाजता हे धक्के जाणवले. सुमारे २० मिनिटांनंतर, भूकंपाचा आणखी एक धक्का जाणवला, ज्याची तीव्रता ४.५ इतकी होती. त्याचा केंद्रबिंदू १० किलोमीटर खोलीवर होता.



भूकंपाच्या हालचालींमध्ये चिंताजनक वाढ


अलिकडच्या काळात अफगाणिस्तान आणि त्याच्या शेजारील हिमालयीन प्रदेशात भूकंपाच्या हालचालींमध्ये चिंताजनक वाढ दिसून आली आहे. हा नवीनतम भूकंप या प्रदेशात होणाऱ्या भूगर्भीय हालचालींची आणखी एक आठवण करून देतो. शास्त्रज्ञ या वारंवार होणाऱ्या भूकंपांना भारतीय आणि युरेशियन टेक्टोनिक प्लेट्सच्या मंद पण सलग होणाऱ्या टक्करीशी जोडत आहेत. शास्त्रज्ञांच्या मते, लाखो वर्षांपूर्वी हिमालयाला आकार देणाऱ्या हिमालयाखाली पृथ्वीच्या आत असलेल्या दोन प्लेट्स अजूनही या भूभागाला अस्थिर करत आहेत.

Comments
Add Comment

थायलंडमधील रेल्वेवर क्रेन कोसळल्याने २२ जणांचा मृत्यू

बँकॉक : थायलंडमध्ये एक अतिशय भीषण रेल्वे दुर्घटना घडली आहे. थायलंडच्या ईशान्य प्रांतात एक अवजड क्रेन रेल्वेवर

कॅनडात १४० कोटींच्या सोन्याची चोरी

मास्टरमाईंड भारतात लपल्याचा दावा टोरंटो : टोरंटो पिअरसन आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या २ कोटी कॅनेडियन

इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर अमेरिकेचा २५ टक्के आयातकर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प व्हेनेझुएलाचे स्वयंघोषित कार्यकारी अध्यक्ष

वॉशिंग्टन  : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ

इराणमध्ये अस्थिरता कायम; आंदोलनातील मृतांचा आकडा पाचशे पार..

तेहरान : इराणमध्ये सुरू असलेली सरकारविरोधी आंदोलनं अद्यापही थांबलेली नसून, देशातील अनेक भागांमध्ये परिस्थिती

इराणच्या स्वातंत्र्यासाठी लढण्यास अमेरिका तयार : ट्रम्प

वॉशिंग्टन : इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प