मराठा आरक्षणसाठी युवकाची आत्महत्या

मुंबई : मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगेंनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. तर त्यांच्यासोबत मराठा समाजाचे शेकडो बांधव मैदानावर हजर आहेत. शिवाय राज्यभरातूनही अनेकजण मुंबईत दाखल होत आहेत. या दरम्यान अंबाजोगाई तालुक्यातील सुगाव येथे शनिवारी एक धक्कादायक घटना घडली आहे.

या ठिकाणी एका तरुणाने मराठा आरक्षणाच्या मागणी करत थेट गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मनोज जरांगे यांनी आझाद मैदानावर सुरू केलेल्या बेमुदत उपोषणानंतरही, मराठा आरक्षणाबाबत कुठलाही तोडगा निघाला नसल्याने आलेल्या नैराश्यातून नितीन माणिकराव चव्हाण या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे सुगाव गावावर शोककळा पसरली आहे.
Comments
Add Comment

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Nagpur citizens : काठमांडूमधील नागपूरचे ११० नागरिक सुरक्षित; भारताकडे रवाना

नेपाळमधील काठमांडू येथे गेलेले नागपूर जिल्ह्यातील ११० नागरिक सुरक्षित नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी

Eknath Shinde : राखीच्या धाग्यातून महिलांना मोठी ग्वाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ‘लाडक्या बहिणीं’ना आश्वासन

राखीच्या धाग्यातून महिलांच्या सर्वांगीण विकासाचा शब्द - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही माविम आणि उमेद

Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबई-मडगांव दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार

Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्

Mumbai Indians : मुंबईत उतरलं ‘मुंबई इंडियन्स’चं खास विमान; Malaysia Airlinesच्या A330ची पहिली लँडिंग, क्रिकेट चाहत्यांना सुखद धक्का

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या निळ्या-गोल्डन रंगांनी सजलेलं Malaysia Airlinesचं खास Airbus A330-300 विमान बुधवारी, २६ ऑगस्ट रोजी मुंबईत

Devendra Fadnavis : 'एमपीएससी' पेपरफुटीप्रकरणी कोणालाही सोडणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)