नदी परिसरात वापरलेल्या जिलेटिन कांड्या सापडल्याने खळबळ

नाशिक: नाशिक शहरातील मुंबई नाका परिसरामध्ये असलेल्या नंदिनी नदीच्या परिसरात वापरलेल्या जिलेटिनच्या कांड्या फेकून देण्यात आल्याची घटना घडली आहे. त्यामुळे याचा वापर कोणी केला आहे? आणि अशाप्रकारे स्फोटके सापडल्याने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलिसांनी संबंधीत ठिकाणी येऊन सर्व तपास केल्यानंतर, कोणताही संभाव्य धोका नसल्याचे सांगितले आहे.

सध्या गणेशोत्सव सुरू आहे आणि दुसरीकडे शुक्रवारी ईद-ए-मिलाद चा सण देखील साजरा होणार आहे.  या पार्श्वभूमी वरती आधीच पोलिस बंदोबस्त तैनात असताना अचानक पणे नाशिक शहरात स्फोटके सापडल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती देखील निर्माण झाली होती. मात्र पोलिस तपासणीनंतर असे निदर्शनास आले आहे की, या सर्व कांड्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जी साफसफाई मोहीम चालू होती त्यादरम्यान सदर ठिकाणी टाकण्यात आल्या होत्या. ज्याबद्दल माहिती मिळताच तातडीने पोलिसांना कळवण्यात आले होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरा मुंबई नाका परीसरात असलेल्या दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या मागील बाजूस असणाऱ्या नंदिनी नदीच्या किनारी या जिलेटीनच्या कांड्या संशयास्पदरित्या आढळून आल्या आहेत. या कांड्या वापरलेल्या असल्याने कोणताही धोका नाही.

दरम्यान, या कांड्या कुणी टाकल्या याची माहिती अद्याप मिळालेली नाही. तर घटनास्थळी बॉम्ब शोधक पथक दाखल झाले असून, संशयास्पद वस्तुंची तपासणी सुरू आहे. तसेच या कांड्यापासून कोणताही धोका नसल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे.
Comments
Add Comment

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

महापालिकेच्या मुलांना आता चॉकलेटस्वरुपातील एनर्जी बार

पोषक आहारांतर्गत खिचडीसह या एनर्जी बार दिले जाणार मुलांना एनर्जी बारसाठी १४१ कोटी रुपये खर्च केले जाणार

चंद्रपूर-यवतमाळ एसटीला अपघात

करंजी : करंजीजवळ महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या एसटी बसला झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आणि दहा जण गंभीर

सुशोभिकरणाच्या कामांसाठी पुन्हा प्रशासनाने केला हात ढिला

माटुंगा,वडाळ्यातील कामांसाठी प्रलंबित बिलांचा मार्ग मोकळा मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेने हाती

मुंबई महापालिकेत ढाकणे आले, सैनी गेले

अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांची नियुक्ती मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ अमित

दिल्ली विमानतळावरुन एकाच फॉर्च्युनरमधून मोदी आणि पुतिन रवाना

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन गुरुवारी संध्याकाळी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले. नवी