अभिनेत्री प्रिया मराठेचे कर्करोगामुळे ३८ व्या वर्षी निधन

मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीतील अभिनेत्री प्रिया मराठेचे कर्करोगामुळे ३८ व्या वर्षी निधन झाले. कर्करोगाचे निदान झाल्यानंतर मागील अनेक दिवसांपासून प्रियावर उपचार सुरू होते. या उपचारांना प्रियाचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. अखेर प्रियाने ३८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

प्रिया मराठेने चार दिवस सासूचे, पवित्र रिश्ता, तू तिथे मी, स्वराज्यरक्षक संभाजी, या सुखांनो या, या मालिकांमध्ये अभिनय केला होता. प्रियाच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून कौतुकाची पावती मिळाली होती. यामुळे प्रियाच्या अकाली निधनाने चाहत्यांना धक्का बसला आहे.


प्रिया आजारी आहे, तिला कर्करोग झाला आहे याची माहिती अनेकांना नव्हती. यामुळे तिच्या निधनाची बातमी अनेकांसाठी मोठा धक्का ठरली आहे.


निवडक मराठी आणि हिंदी टीव्ही मालिका तसेच मोजक्या चित्रपटांमधून प्रियाने अभिनय केला होता. पवित्र रिश्ता या हिंदी टीव्ही मालिकेमुळे प्रिया घराघरात पोहोचली होती. या मालिकेत प्रियाने अंकिता लोखंडेच्या बहिणीची भूमिका साकारली होती. प्रियाने २०१२ मध्ये शंतनु मोघे याच्यासोबत लग्न केले. शंतनुने स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. मराठी अभिनय क्षेत्रातील एक सुंदर जोडपं म्हणून प्रिया आणि शंतनु यांच्याकडे चाहते बघत होते.


Comments
Add Comment

प्रियाकां चोप्राच्या बहिणीने स्वीकारला इस्लाम धर्म ?

मुंबई : हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये चमकलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्या दोन बहि‍णीही मनोरंजनविश्वात चमकत

‘व्ही. शांताराम’ यांचे जीवन मेगा बायोपिकच्या रूपात

भारतीय चित्रपटसृष्टीला नवी दृष्टी, नवे तत्त्वज्ञान आणि नवी सौंदर्यभाषा देणारे शांताराम राजाराम वणकुद्रे

महिला दिनी उलगडणार ‘तिघीं’च्या आयुष्यातलं ‘चौथं पान’!

सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित ‘तिघी’ हा हृदयस्पर्शी आणि नात्यांच्या उबदार धाग्यांनी

अलविदा ही मॅन

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झालं. वयाशी संबंधित आजारांमुळे काही दिवसांपासून ते

‘द केरळ स्टोरी’ फेम अदाला मोठा धक्का; लाडक्या आजीचे निधन, महिनाभर सुरू होते उपचार

मुंबई : लोकप्रिय अभिनेत्री अदा शर्मा सध्या वैयक्तिक आयुष्यात मोठ्या दुःखातून जात आहे. ‘द केरळ स्टोरी’मुळे

रणवीर सिंगचा ‘धुरंधर’ चित्रपट चर्चेत; रणवीर, माधवन, रामपाल कोणाची भूमिका साकारतायत?

मुंबई : बॉलिवूडचा ऊर्जावान अभिनेता रणवीर सिंगचा ‘धुरंधर’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट रिलिजच्या प्रतिक्षेत असून,