वाचावे असे...

  19

तीन वाचनीय पुस्तकांचा परिचय देते आहे. वाचा जरूर प्रिय वाचकांनो...
स्वरचंद्रिका
पद्मजा फेणाणी-जोगळेकर ही कित्येक श्रोत्यांची लाडकी गायिका आहे. स्वरचंद्रिका पद्मश्री पद्मजाचा सुंदर सांगितिक प्रवास ज्यात पुस्तकात आला आहे, त्याचे नावच मुळी ‘स्वरचंद्रिका’आहे. या पुस्तकाचे संपादन डॉ. संगीता गोडबोले यांनी केले आहे. फारच सुरेख वाचनीय. सुमधुर मुखपृष्ठावर आकर्षक पद्मजा लक्ष वेधून घेते. यात वेगवेगळ्या प्रसिद्ध व्यक्ती पद्मजाच्या संगीतावर बोलतात. यात भारतरत्न बिस्मिल्ला खाँ साहेब, पद्मभूषण हालिम जाफर खान, श्री. सी. रामचंद्र, पद्मविभूषण गंगुबाई हनगल, पंडित बबनराव हळदणकर, पद्मविभूषण बी. के. गोयल अशा ४२ दिग्गजांचा समावेश आहे. (अपघाताने माझाही - मी त्यांच्या आसपासही नसता-समावेश आहे.) त्यातले १-२ वाचनीय किस्से सांगते.


मी उदयाचलात (विक्रोळी-पूर्व येथील गोदरेज व्यवस्थापनाची शाळा) २७ वर्षे नोकरी केली. विलास डफळापूरकर नावाचा संगीत शिक्षक (अतिशय गुणी होता तो.) उदयाचलात संगीत शिकवे. माझी त्याची सायकाळी ५-५०ची लोकल. तो डोंबिवलीला उतरे. मी मुलुंडला. सायंकाळी आम्ही विक्रोळी पूर्वेस जे मोहिनी विलास हॉटेल होते तेथे चहा-गप्पा करीत असू. मैफल छान जमे. रमे. सांगितिक रंगे.
‘काही तरी घरगुती जिव्हाळ्याचे गाणे लिहा बाई.’ त्याने आग्रह केला.
“आई-मुलीचे लिहू?”
“हं. चालेल.”
आणि मग, ‘काय सांगू शेजीबाई... माझ्या माहेराचा थाट...
दारी माझ्या झुलतो गं सुंगधाला पारिजात पारिजात.”... हे साधे सुंदर गीत मी लिहिले. त्याला विलासने सुंदर चाल लावली नि ते पद्मजाने गाइले. ते इतके गाजले की अमेरिकेत सॅक्रामँटो इथे मुलीने-पद्मजाने-गाइले तेव्हा आईच्या (त्यांच्या त्यांच्या) आठवणीने मुसुमुसु झाल्या. मी ते ऐकून हळवी हळवी झाले. हा अनुभव या पुस्तकात आहे. मी रामचंद्र, पं. हृदयनाथ मंगेशकर, पंडित रामनारायण, डॉ. अशोक हळदणकर अशी एकसे एक ४७ माणसे पद्मजाबद्दल लिहितात. मग आणखी ५० माणसे (सारे थोर साहित्यिक) तिचे गुणवर्णन करतात. खास मोठ्ठा होतो हो वाचतांना ! भरतकुमार राऊत, सुरेखा शहा, प्रशांत गौतम, मोहिनी निमकर असे ५० दिग्गज पद्मजाबद्दल आत्मरत होत लिहितात. तेव्हा जीव सुपा यवढा होतो. देशीविदेशी सारे पद्मजाबद्दल भरभरून लिहितात. मित्रवर्य गौरवितात तेव्हा धन्यता वाटते. जरूर जरूर वाचा हे पुस्तक ! श्रीमंत व्हाल.


गांधारी
हे पुस्तक स्नेहलता स्वामी यांचे आहे. महाराष्ट्र राज्य ग्रंथ निवड समितीने शासनमान्य यादीसाठी निवडलेले हे पुस्तक ज्ञा.मा. क्र. १५९६/२०२१ अशी नोंद टिपते. दिलीपराज या प्रसिद्ध प्रकाशन संस्थेने हे प्रकाशित केले आहे. नव्या वाटांचा शोध घेणारी गांधारी यात लेखिकेने वर्णिली आहे. अनेक पौराणिक व्यक्तिरेखांवर आजवर खूप लेखकांनी लिहिले आहे. पण ‘गांधारी’ उपेक्षित राहिली होती. स्नेहलता स्वामींनी पुस्तक लिहून हा आयाम दूर केला आहे. स्त्रीची बंडखोरी-तीही पुराणकाळात ही कल्पनाच अत्याधुनिक आहे. स्नेहलता स्वामींनी या व्यक्तिरेखेस जिवंत केले आहे. अवश्य वाचा. - ‘गांधारी’


दक्षिणपर्व
हे महापराक्रमी शिवरायांचे, छत्रपतीवरले पुस्तक. दक्षिणेत महाराजानी काय नि कसा पराक्रम गाजवला हे पर्व उपेक्षित होते. त्यावर कमी लिहिले गेले होते. स्नेहलता स्वामी यांनी ही उणीव भरून काढली आहे. मुखपृष्ठ प्रत्ययकारी आहे. प्रकाशक आहेत नामवंत हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे साप्ताहिक विवेक प्रकाशन म्हणजे पुस्तकाच्या ‘तोडीची’ कल्पना वाचकांस येईल.
शिवराय हे जिजाऊचे खरे तर अपत्य! पण ते अवघ्या जगाचे झाले. त्यांचा रामदासांनी गौरव केला.
‘शिवरायांचे आठवावे रूप
शिवरायांचा आठवावा प्रताप !


भूमंडळी !’
अशा शब्द लेण्यात. शिवराय खरोखर अमर व्यक्तिमत्त्व आहेत. अवश्य वाचा. श्रीमंत व्हाल! हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे साप्ताहिक विवेक प्रकाशनाचे हे अजोड पुस्तक ‘दक्षिणपर्व’...

Comments
Add Comment

डाकिया डाक लाया...

डॉ. साधना कुलकर्णी पत्रव्यवहार हा अनेकांच्या हृदयातला एक हळवा, नाजूक आणि भावनाप्रधान असा कोपरा असतो. आजही

कविवर्य मंगेश पाडगावकर

कोकणी बाणा : सतीश पाटणकर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे नाव आदराने घेतले

सामाजिक एकाकीपणा आणि आधुनिक समाज

ओंजळ : पल्लवी अष्टेकर आजच्या धावपळीच्या युगात, जेव्हा आपण इंटरनेटच्या माध्यमातून जगाशी जोडलेलो आहोत, त्याच वेळी

‘विकत घेतला शाम...’

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे सुमारे ६५ वर्षांपूर्वी आलेला एक सिनेमा आजही अनेकांच्या लक्षात आहे. राजाभाऊ

श्रीहरीचा अंश असलेल्या पृथूची कथा

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे ध्रुवानंतर आठव्या पिढीत अंग नावाचा राजा झाला. त्याच्या पत्नीचे नाव सुनिथा

श्री गणेशाचे स्वरूप

अष्टसिद्धी विनायक तेजोमय चैतन्यरूप  ऊर्जेचा स्रोत अद्भुत ओंकार हे स्वरूप  वरील चार ओळींमधून मी गणेशाचे स्वरूप