ठाण्यात ८० हजार कुटुंबांचे धोकादायक इमारतींत वास्तव्य

  61

इमारती रिकाम्या करण्यास रहिवाशांचा विरोध


ठाणे : विरारमध्ये इमारत कोसळून १७ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. ठाण्यातही धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतीमध्ये नागरिकांचे वास्तव्य असून अशा इमारतीमध्ये अजूनही तब्बल ८० हजार कुटुंबे राहत आहेत. एकदा राहते घर सोडले की हक्काचा निवारा गमावून बसण्याच्या भीतीपोटी रहिवासी इमारती रिकाम्या करण्यास तयार नाहीत. या इमारती रिकाम्या करताना पालिका प्रशासनाची मात्र चांगलीच दमछाक होत आहे.


विरारच्या घटनेनंतर ठाण्यातील अतिधोकादायक व धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ठाणेकरांवर मृत्यूची टांगती तलवार कायम असून ३ लाख २७ हजार २९० ठाणेकरांचा मुक्काम मृत्यूच्या छायेत आहे. ठाणे महापालिका हद्दीत ९३ इमारती अति धोकादायक तर २०० धोकादायक आहेत.


ठाण्यात गेल्या अनेक वर्षांपासून धोकादायक, अति धोकादायक आणि बेकायदा इमारतींचा प्रश्न लटकलेला आहे. अशातच शहरातील शेकडो धोकादायक इमारतीमध्ये लाखो ठाणेकर जीव मुठीत घेऊन संसाराचा गाडा हाकत आहेत. एकीकडे क्लस्टर योजनेचे स्वप्न दाखवण्यात आले असताना अद्याप क्लस्टर योजनेची इमारत पूर्ण झालेली नाही. त्यामुळे हक्काचे घर मिळेल या आशेने इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये धडकी भरत आहे.


प्रशासनाकडून दरवर्षी धोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध करण्यात येते. त्यानुसार ९ प्रभाग समितीमधील अतिधोकादायक व धोकादायक इमारतीची यादी पालिकेने शनिवारी जाहीर केली आहे.

Comments
Add Comment

Lift Collapse: कल्याणमध्ये सहाव्या मजल्यावरून लिफ्टचा अपघात, आठ जणांपैकी चारजण गंभीर जखमी, तर दोघांचे पाय...

कल्याण: महाराष्ट्रातील कल्याण पश्चिम येथील रॉयस बिल्डिंगमध्ये सहाव्या मजल्यावरून लिफ्ट पडल्याने मोठी

Raj Thackeray on Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज ठाकरे यांचे सूचक वक्तव्य, म्हणाले...

ठाणे: मराठा आरक्षणाच्या विषयावरुन मुंबईत मनोज जरांगे पाटील यांचं आझाद मैदानावर आंदोलन सुरु आहे. आज त्यांच्या

गणेशमूर्तींचा बोटीने प्रवास, भिवंडीकरांचा कोंडीवर उपाय

भिवंडी (प्रतिनिधी) : वाहतूक कोंडीचे विघ्न बाप्पांच्या मार्गातही येत आहे. वाहतूक कोंडीचा त्रास ठाणे जिल्ह्यातील

Eknath Shinde: रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्या बाईकस्वाराच्या मदतीला धावले उपमुख्यमंत्री, ताफा थांबवून केली मदत

ठाणे: आज सगळीकडे गणेशोस्तवाची धूम सुरू असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यासमोर एक अपघात घडला. एक

आनंदाची बातमी शिळफाटा-कल्याण ते रांजनोली वाहतूककोंडी सुटणार

ठाणे : शिळफाटा-कल्याण ते रांजनोली या पट्ट्यात वाहतूक कोंडी ही रोजची समस्या झाली आहे. यावर उपाय करण्यासाठी

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या