मोहित सोमण: या आठवड्यात शेअर बाजाराचे मोठे नुकसान झाले. गेल्या तीन दिवसात ११ लाख कोटींचे गुंतवणूकदारांचे नुकसान झाले आहे. संपूर्ण आठवड्याच्या विचार केल्यास शेअर बाजारात तब्बल २% पर्यंत नुकसान झाले आहे. परिणामी गुंतवणूकदा रां च्या लाखो कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. अमेरिककडून भारतावरील ५०% पर्यंत टॅरिफ वाढ, जागतिक अस्थिरता, भूराजकीय दबाव, भारतीय शेअर बाजारातील परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (Foreign Institutional Investors FII) काढून घेत लेली गुंतवणूक अशा विविध कारणांमुळे शेअर बाजार घसरला.आकडेवारीनुसार संपूर्ण आठवड्यात सेन्सेक्सचा (Sensex) विचार केल्यास, पाच दिवसात सेन्सेक्स २.२१% घसरला आहे. म्हणजेच १०८३ अंकाने घसरला आहे. निफ्टी (Nifty) मध्ये विचार केल्यास निफ्टीत २.०९% घसरण झाली आहे. ५२१.४० अंकाने निफ्टी पाच दिवसात घसरला. संपूर्ण महिन्यांच्या विचार केल्यास सेन्सेक्स ०.३४% घसरला असून निफ्टी ५० हा ०.३०% घसरला आहे. इंडसइंड बँक, एनटीपीसी, टाटा मोटर्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, अदानी एंटर प्राईजेस, अपोलो हॉस्पिटल, इन्फोसिस सारख्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले. याखेरीज औथुम इन्व्हेस्ट, वारी एनर्जीज, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, होंडाई मोटर्स, आयशर मोटर्स या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांना समाधानकारक परतावा मिळाला. प्रोव्हिजनल आकडेवारीनुसार, जुलै महिन्यात एकूण ३३१८०५.२२ कोटींची निव्वळ खरेदी घरगुती गुंतवणूकदारांनी केली असून ३२१८२७.७५ कोटींची निव्वळ खरेदी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी केली. त्यामुळे गेल्या महिन्यात घरगुती गुंतवणूकदारांनी निव्वळ खरेदी ६०९३९.१६ कोटी केली असून परदेशी गुंतवणूकदारांनी एकूण निव्वळ ४७६६६.६८ कोटीची रोख विक्री केली आहे.
बँक सेन्सेक्समध्ये येस बँक, कोटक बँक, एसबीआयएन या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर आयसीआयसीआय बँक, आयडीएफसी बँक, एचडीएफसी बँक, इंडसइंड बँक, फेडरल बँक या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. बँक निफ्टीत तर गेल्या आठवड्यात २. ७१% घसरण झाली असून एक महिन्याच्या कालावधीत ४.५६% इतके नुकसान झाले आहे. बँक निफ्टीत सर्वाधिक घसरण बँक ऑफ बडोदा, आयसीआयसी आय बँक, अँक्सिस बँक, पीएनबी, एचडीएफसी बँक, इंडसइंड बँक, कॅनरा बँक या शेअर्समध्ये गुंतवणू कदारांना नुकसान झाले आहे.शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये २% हून अधिक घसरण झाली ज्याचा मोठा फटका निर्देशांकात बसल्याने गुंतवणूकदारांचे कंबरडे मोडले आहे. सेन्सेक्स ८१००० व निफ्टी २४५ ०० पेक्षाही खाली उतरल्याने ही धोक्याची पातळी शेअर बाजाराने ओलांडली. मोठ्या शेअरसोबत विशेष समभागांचा उल्लेख केल्यास मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये मोठी घसरण झाली. ज्यामुळे बाजाराला सपोर्ट लेवल गाठता आली नाही. आठवड्यात बीएसई मिड कॅपमध्ये गुंतवणूकदारांचे २.७२% नुकसान झाले असून बीएसई स्मॉलकॅप समभागात ०.२९% घसरण झाली आहे. एनएसईत मिडकॅपमध्ये आठवड्यात ३.४६% घसरण झाली आहे तर स्मॉलकॅपमध्ये आठवड्याभरात ३.३३% घसरण झाली आहे.
आठवड्याच्या सुरुवातीला सकारात्मक मान्सून अंदाज, जीएसटी सुसूत्रीकरणाची आशा आणि अमेरिकन बाँड उत्पन्नात घट झाल्यामुळे दिलासा मिळाला होता. तसेच सप्टेंबरमध्ये फेडच्या संभाव्य दर कपातीच्या अंदाजामुळे बाजारातील भावनाही सकारात्मक हो त्या मात्र त्यानंतर हा तेजीचा कल अल्पकाळ राहून सलग चौथ्यांदा बाजारात काल घसरण झाली.अचानक एक दिवस डोनाल्ड ट्रम्प यांनी कार्यकारी आदेशावर सह्या केल्या कारण अमेरिकेच्या येणाऱ्या टॅरिफ निर्णयाकडे लक्ष लागले होते. भारतावर टॅरिफ लागू हो ताच गुंतवणूकदारांनी शेअर बाजाराला नकारात्मक प्रतिसाद दिला. युएस बाजारातील जीडीपीत अपेक्षित वाढी पेक्षा अधिक वाढ झाली असली तरी ती केवळ घटलेल्या आयातीमुळे होती तर दुसरीकडे अमेरिकेतील अर्थतज्ज्ञांनी युएस बाजारातील वाढलेली महागा ई, बेरोजगारी यावर लक्ष केंद्रित केले होते. अमेरिकेतील डॉलर निर्देशांकात सातत्याने वाढ होताना फेड व्याजदरात कपातीवरून युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व गव्हर्नर कुक यांच्यातील कलगीतुरा रंगल्याने बाजारात आणखी नुकसान होत राहिले. याशिवाय युए स बाजारातील तंत्रज्ञान व आयटी शेअर्समध्ये होत असलेल्या घसरणीसह भारतीय बाजारातील कराच्या अनिश्चिततेमुळे बड्या शेअर्समध्ये असलेली गुंतवणूक परदेशी गुंतवणूकदारांनी काढून घेतली. ज्यामुळे दोन दिवसांची रॅली सलग तीन सत्रांमध्ये घसरणीत बद लली. गुंतवणूकदारांनी, विशेषतः धातू, आयटी, रिअल्टी आणि ऑटो शेअर्समधील ०.५ टक्के ते १.५ टक्क्यांपर्यंत तोटा गुंतवणूकदारांना सहन करावा लागला.
दुसरीकडे इतर निर्देशांकांनी कमकुवतपणा दर्शविला होता. पाच दिवसांत निफ्टी मिडकॅप १०० मध्ये ०.५७ टक्क्यांनी घसरण झाली, तर निफ्टी स्मॉलकॅप १०० मध्ये ०.३९ टक्क्यांनी घसरण झाली. तथापि, कॅपिटल गुड्स, मिडिया, एफएमसीजी, कंझ्युमर ड्युरेब ल्स, सारख्या क्षेत्रांनी ०.४ टक्के ते १ % वाढ नोंदवल्याने बाजारातील अतिरिक्त घसरण रोखली गेली. तथापि आयटीतील अस्थिरता, मेटल, फार्मासह १०० ते २००% टॅरिफची धमकी ट्रम्प यांनी दिल्याने मेटल व फार्मा समभागातही नुकसान होत राहिले. मात्र सरका री आकडेवारीनुसार, भारताच्या पहिल्या तिमाहीत अभूतपूर्व सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) वाढ नोंदवली गेली आहे. ही वाढ पहिल्या तिमाहीत ७.८% वर नोंदवली गेली असून सरकारने केलेल्या भांडवली खर्चासह, वाढलेल्या मागणी व उत्पादनामुळे झाल्याचे स्पष्ट दिसत होते.
तज्ञांच्या मते, आगामी कालावधीत भविष्याकडे पाहता संमिश्र कल दिसून येतो, जीएसटी दर कपात, सरकारी खर्च आणि सणासुदीच्या मागणीमुळे स्टॉक-विशिष्ट कृती होण्याची शक्यता आहे. एफएम सीजी, सिमेंट, पायाभूत सुविधा आणि ग्राहकोपयोगी वस्तू यासा रख्या क्षेत्रांना नजीकच्या काळात फायदा होऊ शकतो. मात्र इतर समभागात अनिश्चितता कायम आहे. अस्थिरतेचा फटका बाजारात बसत असताना अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) हा देखील गेल्या पाच दिवसात २.२०% उसळल्याने बाजार अखेर च्या सत्रापर्यंत खालावत राहिला. संपूर्ण महिन्याचा विचार केल्यास अस्थिरता निर्देशांक ६.४४% वर राहिला आहे. आगामी आठवड्यातील चढउताराचा धोका शेअर बाजारात कायम आहे. तज्ञांच्या मते हा साईट इफेक्ट आगामी आठवड्यातही कायम राहू शकतो. अजूनही ट्रम्प यांना अमेरिकेतील न्यायालयाने फटकारले टॅरिफ असंविधानिक आणि बेकायदेशीर म्हटल्याने अस्थिरता कायम आहे. अजून आयात निर्यातीतील संभाव्य नुकसानीची आकडेवारी समोर आली नसल्याने गुंतवणूकदारांत, निर्यातदारांना चिंता कायम राहू शकते. असे असले तरी भारतीय मजबूत फंडामेंटलमुळे क्षेत्रीय विशेष समभागात मात्र परतावा गुंतवणूकदारांना मिळू शकतो. त्यामुळेच गुंतवणूकदारांनी धोकाप्रवण क्षेत्रातील गुंतवणूक रोखून ठेवल्यास त्याचा लाभ भविष्यात होऊ शकतो तर लघू काळातील व दीर्घकालीन गुंतवणूकीवर आधारित योग्य समभागात (Stocks) मध्ये गुंतवणूक करणे लाभदायक ठरेल.
दरम्यान अस्थिरतेवर भाष्य करताना नुवामा अल्टरनेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह रिसर्चच्या अहवालात म्हटले गेले आहे की निफ्टी फ्युचर्स सप्टेंबर मालिकेची सुरुवात ४१,४०० कोटी रुपयांच्या उच्च ओपन इंटरेस्ट बेसवर करेल, ऑगस्ट मालिकेच्या सुरुवातीला ४०,८०० कोटी रुपयांच्या तुलनेत येस सिक्युरिटीजच्या अहवालात म्हटले आहे की, निर्देशांक कमकुवत असूनही, इंडिया VIX ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर होता, जो आत्मसंतुष्टता किंवा आक्रमक डाउनसाइड हेजिंगचा अभाव अधोरेखित करतो.'
एकूणच बाजार आऊटलूकवर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,'जागतिक आणि देशांतर्गत वाढत्या प्रतिकूल परिस्थितीमुळे विक्रीत सातत्य राहिल्याने भारतीय शेअर बाजार या आठव ड्यात घसरणीला सुरुवात झाली. प्रस्तावित जीएसटी सुसूत्रीकरण, अनुकूल मान्सूनचा अंदाज आणि सप्टेंबरमध्ये अमेरिकन बाँड उत्पन्न कमी करणे आणि फेडकडून दर कपातीची शक्यता यासारख्या जागतिक संकेतांमुळे बाजार सकारात्मक झाला, ज्यामुळे आ यटी स्टॉकमध्ये वाढ झाली आणि भावना वाढल्या. तथापि, अमेरिकन पेनल्टी टॅरिफ डेडलाइनच्या आधी सावधगिरी बाळगण्यात आली, ज्यामुळे व्यापक विक्री आणि जोखीम टाळण्यास सुरुवात झाली. त्यानंतर भारतीय वस्तूंवर शुल्क लादल्याने आत्मविश्वास आ णखी कमी झाला, ज्यामुळे सर्व क्षेत्रांमध्ये नफा बुकिंग वाढली. मोठ्या कॅपिटलमध्ये घट झाली, तर मध्यम आणि स्मॉल कॅपिटलमध्ये वाढलेल्या मूल्यांकनांवर तीव्र तोटा झाला आणि अनिश्चितता वाढली. स्थिर मागणीच्या अपेक्षांमुळे एफएमसीजी आणि उपभोग-कें द्रित स्टॉक सापेक्ष उज्ज्वल ठिकाणे होते.
पुढे पाहता, सरकारी खर्च आणि धोरणात्मक उपाययोजनांद्वारे चालविल्या जाणाऱ्या मजबूत Q1 GDP प्रिंटमुळे भारताची लवचिकता बाह्य प्रतिकूल परिस्थितींविरुद्ध बफर प्रदान करू शकते, जरी आर्थिक चिंता कायम आहेत. टॅरिफ वादांचे निराकरण बाजाराच्या भावनांसाठी एक प्रमुख उत्प्रेरक (Catalyst) म्हणून काम करू शकते, जरी परस्पर २५% टॅरिफ जवळच्या ते मध्यम कालावधीत कायम राहण्याची अपेक्षा आहे. सध्या, वस्त्रोद्योग, उपकरणे उत्पादक, धातू, वाहन आणि सीफूड या क्षेत्रांवर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे, तर आयटी आणि फार्मा या क्षेत्रांवर शुल्काचा थेट परिणाम न होताही भावनिक दबाव येऊ शकतो.दरम्यान, बाजारपेठांमध्ये मिश्रित पक्षपात होण्याची शक्यता आहे, वापर-चालित आणि देशांतर्गत विकास-केंद्रित क्षेत्रे जसे की एफएमसीजी, टिकाऊ वस्तू, विवेकाधीन, सिमेंट आणि पायाभूत सुविधा - जीएसटी कपात, दृढ मागणी आणि उच्च सरकारी खर्चाचा फायदा घेण्यासाठी चांगल्या स्थितीत आहेत. तथापि, व्यापार चर्चेतील मर्यादित प्रगती अनिश्चितता वाढवत आहे आणि गुंतवणूकदारांच्या आत्मविश्वासावर भार टाकत आहे. सध्याच्या परिस्थितीत मल्टी-कॅप मालमत्ता वाटप धोरण वर्चस्व गाजवण्याची अपेक्षा आहे. पुढील अंतर्दृष्टीसाठी गुंतवणूकदार पीएमआय प्रिंट्स, बेरोजगार दावे, वेतन आणि बेरोजगारीच्या आकडेवारीसह आगामी देशांतर्गत आणि यूएस मॅक्रो डे टावर देखील बारकाईने लक्ष ठेवतील.'
त्यामुळे आगामी काळात गुंतागुंतीच्या राजकीय आर्थिक परिस्थितीत गुंतवणूकदारांना गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो. तसेच गुंतवणूकदारांनी आपल्या पोर्टफोलिओत गुंतवणूक करताना अतिरिक्त धोका पत्करण्याचे टाळल्यास ते अधिक व्यवहारिक व संयुक्तित ठरेल.